एक चिंगारी!

ज्योतिषशास्त्रात काही प्रश्न असे असतात, जे केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी विचारले जात नाहीत. ते प्रश्न आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात, एका अशा क्षणाकडे, ज्याने संपूर्ण आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकलेली असते.

१२ सप्टेंबर २०२५. या दिवशी राजशेखर, (नाव बदलले आहे) माझ्याकडे ज्योतिष  मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा उमदा तरुण आज एक यशस्वी उद्योगपती आहे. त्याची स्टार्ट-अप कंपनी space research साठी लागणाऱ्या अत्यंत उच्च दर्जाच्या, highly specialised equipments चे उत्पादन करते. आणि आज ही उत्पादने थेट अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये निर्यात होतात.

राजशेखर आपली कहाणी सांगत होता…

संघर्ष… मेहनत… यश…

आणि अचानक ……..

तो थांबला. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आणि मग तो म्हणाला …..

“You know… हे सगळं एका घटनेपासून सुरू झालं होतं. ती फक्त एक घटना नव्हती… ती माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा life-changing event होता .”

“मला आजही तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो… ९ ऑगस्ट २०१८.”

मग त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं ,,,

“तुम्ही सांगू शकता का ९ ऑगस्ट २०१८ ला माझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? ती घटना कोणत्या स्वरूपाची होती?”

हा प्रश्न वेगळा होता. हा भविष्य काळातील एखाद्या घटने बाबत विचारलेला प्रश्न नव्हता.

हा प्रश्न होता भूतकाळातल्या एका घटने बाबतचा आणि तोही अशा घटनेचा ज्याने संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं.

हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. आणि… मी ते आव्हान स्वीकारलं.

सामान्यतः लोक ज्योतिषाकडे येतात भविष्यासाठी. घटना घडेल का? कधी घडेल?

पण इथे परिस्थिती वेगळी होती. घटना आधीच घडलेली होती. तारीख माहिती होती. ९ ऑगस्ट २०१८.

आजचा अप्रश्न वेगळाच होता, या अशा विशेष परिस्थितींमध्ये मी प्रामुख्याने Western Astrology तंत्रांचा वापर करतो. विशेषतः Secondary Progressions. ही पद्धत घटनांच्या कालनिर्णयासाठी अधिक सविस्तर , अचूक आणि स्पष्ट संकेत देते,  असा माझा अनुभव आहे. 

९ ऑगस्ट २०१८ साठी राजशेखरचा Secondary Progressed Chart तयार केला. तोच चार्ट आपल्या स्क्रीनवर दिसत आहे.

Secondary Progression मध्ये मंदगती ग्रह फारसे हलत नाहीत. पण चंद्र, रवी, बुध, शुक्र, मंगळ आणि लग्न, दशम, सप्तम, चतुर्थ बिंदू
वेगाने बदलतात.

म्हणून हे बदल बारकाईने तपासणे ही विश्लेषणाची पहिली पायरी असते.

या अंगाने हा Secondary Progressed Chart तपासला असता पाच अत्यंत महत्त्वाचे योग दिसून आले.


१) प्रोग्रेस्ड दशम बिंदू जन्मस्थ प्लुटो च्या अगदी तंतोतंत युती मध्ये आहे, दोघांत अवघ्या ४ आर्क मिनिटांचे अंतर आहे. इतकेच नव्हे तर प्रोग्रेस्ड दशम बिंदू  आणि प्रोग्रेस्ड प्लुटो देखील अगदी तंतोतंत युती मध्ये आहेत.

२) प्रोग्रेस्ड चंद्र  आणि जन्मस्थ युरेनस च्या अगदी तंतोतंत केंद्र योगा मध्ये आहे,  दोघांत अवघ्या ५ आर्क मिनिटांचे चे अंतर आहे. 

३) प्रोग्रेस्ड दशम बिंदू  आणि प्रोग्रेस्ड प्लुटो हे दोघे, जन्मस्थ शनीच्या अगदी तंतोतंत लाभ योगात आहेत.

४) प्रोग्रेस्ड शुक्र आणि जन्मस्थ प्लुटो अगदी तंतोतंत केंद्र योगा मध्ये आहेत.

१) या दिवशी राजशेखर ने नोकरीचा राजीनामा दिला असेल किंवा त्याला सक्तीने राजीनामा द्यायला लावला असेल.

२) त्या पूर्वी राजशेखर चे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बिनसले असावे, खूप खडाजंगी झाली असेल, कदाचित राजशेखर वर चुकीचे आरोप केले गेले असतील त्या रागाच्या भरात त्याने राजीनामा दिला असावा.

३) या सर्व घटनां मागे एक स्त्री असेल.

४) त्यानंतर राजशेखर ने दुसऱ्या नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असावा.

५) सरकारी कंत्राटांच्या माध्यमातून व्यवसायाची सुरवात झाली असावी. 


मी हे सर्व राजशेखरला सांगितलं.

तो ऐकत होता…आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

स्वतःला काहीसे सावरून तो म्हणाला …

“सर… कमाल आहे! त्या दिवशी अगदी असंच घडलं. माझ्याकडून बळजबरीने राजीनामा लिहून घेतला गेला.”

“आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या मागे आमच्या कंपनीची महिला MD होती.”

“त्या दिवशी ठरवलं रस्त्यावर चणे-फुटाणे विकेन, पण पुन्हा नोकरी करणार नाही.”

“अनेक प्रयत्न केले, खूप धडपडलो, नंतर अचानक एका ओळखीतून लहानसं सरकारी कंत्राट मिळालं. ते काम चांगलं केलं
आणि पुढे कामें मिळत गेली, मग स्वतः:चे युनिट सुरू केले, नंतर जे घडले तो इतिहास आहे.”

+++

Similar Posts

6 Comments

    1. अती उत्तम आणि सहज पणे आपण विश्लेषण केले आहे…hatsoff

      ग्रह योग ही खरोखरच गुरू किल्ली आहे, किंबहुना भविष्य कथनाचा आत्मा आहे.

      God bless you 💐

  1. सर आपण ग्रेट आहात…. 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *