आपल्या मित्रपरिवांरात, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेन मध्ये , कॉलेजच्या कट्टयावर, ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये , कोठेही झटपट लोकप्रिय व्हा ! ग्रंथ जमवायला नको, अभ्यास करायला नको, कुंडली मांडायची तर अजिबात गरज नाही, फकत पाच मीनीटांत तुम्हीही १०० % अचुक सांगणारा , झटपट ज्योतिषी बनु शकता, ते सुध्दा अगदी खात्रीने!
विश्वास नाही ना बसत? तर मग वाचा पुढे……
साहित्य आणि कृती
साधारण पस्तीस वा जास्त वय असलेली व्यकती निवडा.
प्रथम इकडचे तिकडचे बोलुन त्या व्यकतीला (सावज!) आपल्या जाळयात ओढा. इथे ती व्यकती ‘स्त्री’ असेल तर मात्र जरा सांभाळुन , निदान सुरवातीच्या काळात , पुरेसा अनुभव येत नाही तो पर्यंत तरी अशी सावजें टाळा नाहीतर जोडे खायची वेळ येईल!
सावज जाळयात आले की चेहेरा गंभीर करा. उगाचच आकाशाकडे बघुन काहीतरी पुटपुटण्याचे नाटक करा, सावजाला वाटले पाहिजे की जणुकाही आकाशस्थ दैवी शकतींना तुम्ही आवाहन करता आहात.
एक दिर्घ श्वास घ्या. (हा कसा घ्यायचा ते जाणण्यासाठी रामदेव बाबांचा कोणताही कार्यक्रम बघा).
सुरवातीला काहीही फालतु प्रश्न विचारा जसे: “तुमचा आवडता पक्षी, फुल, फळ, गाव, रंग, सिनेमा नट / नटी, संख्या, कार” इ. काहीही उत्तरे मिळतील पण प्रत्येक उत्तरा नंतर “ हम्म”, “आल लक्षात माझ्या”, “मला वाटलंच होते”, “माझा अंदाज चुकणार नाही” अशा प्रतिक्रिया दया.
आता आणखी जास्त गंभीर दिसण्याचे नाटक करा, (मनमोहन सिंगांसारखा) आणि प्रश्न विचारा “हरीण, कासव, ससा,साळिंदर यापैकी कोणता प्राणी पाळायला आवडेल” , सावज काहीतरी उत्तर देईलच, ते महत्वाचे नाही, त्यावर पुन्हा एकदा गंभीर दिसण्याचे नाटक करा, बोटांवर थोडी आकडेमोड केल्याचे नाटक करा, पुन्हा एकदा आकाशाकडे बघुन आकाशस्थ दैवी शकतींना आवाहन करता आहात असे दाखवा.
आता सावज तुमच्या पूर्ण टप्प्यात आले आहे, बार टाकायला हरकत नाही.
आता सुरवात करा………..
“तुम्ही फार काळजी करता, आजुबाजुला घडणार्या गोष्टीं उगाचाच मनाला लावुन घेता..”
(हा ओपनिंग पंच स्त्रीयांच्या बाबतीत अत्यंत प्रभावी ठरतो असा माझा अनुभव आहे!)
“तुम्हीं सर्वांसाठी झिजता, पदरमोड करता पण लोकांना त्याची किंमत नाही.”
(हा तर मास्टरपीसच आहे, अजमल कसाब सुध्दा याला नाही म्हणाला नसता!)
“तुम्ही जरूरी पेक्षा जास्तच विचार करता. काही वेळा चिकित्सा करण्यातच आपण इतकी वेळ दवडला आहे की त्यामुळे हातातोंडाशी आलेली संधी निसटून जाण्याचे बरेच अनुभव आपल्याला आले असणार.”
(अत्यंत प्रभावी परिणाम होणारी सावजें: स्त्रीया, बँकवाले, सरकारी कर्मचारी, सि.ए.)
“दुसर्यांच्या ईच्छा आकांक्षा व अपेक्षांचे ओझे विनाकारण खांद्या घ्यायचा आपला स्वभाव आहे”
“इतरांच्या मताचे दडपण आपल्याला सतत असते, तुम्हाला नाही म्हणणे जमत नाही त्यामुळेच लोकांनी विशेषत: जवळच्या नातेवाईक, कुटुंबातल्या व्यक्तींनी केलेल्या भावनिक आवाहनांना आपण चटकन बळी पडता.”
“स्वत:चीच कारण नसताना ,नको इतकी चिकित्सा करण्याचा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळेच काही गोष्टी तुम्ही फारच मनाला लावुन घेता, लोकांना त्याची काहीच पर्वा नसते पण तुम्हाला मात्र त्याचा त्रास होत असतो.”
“ वरकरणी जरी “मला जगाची पर्वा नाही” असे जरी तुम्ही दाखवत असला तरी ‘लोकांनी आपले कौतुक करावे, आपण प्रसिध्द व्हावे’ अशी आत्यंतीक तळमळ तुमच्यात आहे.”
(अत्यंत प्रभावी परिणाम होणारी सावजें: कारखानदार, राजकारणी, मार्केटिंग वाले, आय.टी वाले.)
“लोकांना जरी तुम्ही कर्मकठोर, न्याय निष्ठुर , कडक वाटत असलात तरी आपण मुळात: कनवाळु आहात ,पण ही बाजू लोकांच्या लक्षातच येत नसल्याने तुमच्या बद्दल निष्कारण गैरसमज निर्माण होत राहतात व त्याचा त्रास तुम्हाला वेळोवेळी होत असतो.”
(अत्यंत प्रभावी परिणाम होणारी सावजें: कारखानदार, बडे ऑफीसर.)
“आलतु फालतु गोष्टिंत कारण नसताना गुंतुन पडल्याने , आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित न करता आल्याने, तुम्हाला तुमच्यात असलेल्या अनेक चांगल्या गुणांचा वापरच करता आला नाही.”
“आपल्या नातेवाईक व मित्रपरिवारात असे एक तरी व्यकती असेल की जिच्याशी तुमचे संबंध जरा ताणलेलेच आहेत आणि याचे कारण निव्वळ गैरसमज! पण काळजी करु नका, लौकरच हे गैरसमज दूर होतील”
(हा सर्व वयाच्या व आकाराच्या स्त्रीयांच्या बाबतीत अत्यंत प्रभावी ठरतो असा माझा अनुभव आहे!)
“वरकरणी तुम्ही दाखवत नसलात तरी कोणत्यातरी गोष्टि बद्दल अनामिक भिती, कोणत्यातरी गोष्टि बद्दल खंत, कोणत्यातरी गोष्टि बद्दल कमालीची निराशा तुमच्या मनात सतत घर करुन आहे.”
“तुमच्यात असलेल्या अनेक चांगल्या गुणांचा वापर तुम्ही कधी केलाच नाही, संधीच्या कोणत्याच लाटे वर स्वार होता न आल्याने, पायाखालची वाळू सरकावी तसे आयुष्या हातातून निसटून गेल्याची मोठी टोचणी आपल्याला आहे.”
(हा खास ठेवणीतला पंच, ज्यांच्या वयाची ५० पूर्ण झालेली आहेत , त्यांच्या साठी )
“तुम्ही जरी वरकरणी दाखवत नसलात तरी आत्ता हया क्षणी सुध्दा आापल्या मनात कोणत्यातरी बाबीं वरुन जबरदस्त वैचारिक संघर्ष चालू आहे.”
“अपेक्षांचे ओझे आणि वैयकतीक स्वातंत्र्याच्या संघर्ष हयात आपल्य मोठी मानसिक फरपट होताना मला दिसत आहे. मनात मोठा वैचारिक गुंता निर्माण झालेला मला दिसत आहे.”
“वयाच्या ३ र्या वा ४ थ्या वर्षी आग, पाणी वा तिक्ष्ण शस्त्र या व्दारे तुम्हाला लहानशी दुखापत झाली होती, खरेतर मोठी दुर्घटनाच व्हायची पण एका वडिलधार्या व्यकतीच्या सतर्कतेमुळे ती वेळ टळली.”
(ही टोपी ज्यांच्या वयाची ५० पूर्ण झालेली आहेत , त्यांना फिट्ट बसते, कारण इतकया लहाणपणचे काही आठवत नाही आणि असे काही झाले होते का ते विचारायला कोणी वडिलधार्या व्यक्ती आत्ता हयात नसतात)
“सध्याच्या ग्रहमानांचा विचार करता, पुढचा काही कालावधीत आपल्याला आर्थिक फसवणूकी चा धोका दिसतो, एखादि वस्तू खरेदि करताना बाजारभावा पेक्षा जास्त किंमत देणे, पुरेपुर दाम मोजून खरेदि केलेल्या वस्तूत वा सेवेत त्रुटी असल्याने आर्थिक नुकसान व मानसिक त्रास, आर्थिक गुंतवणुकी च्या बाबतीत चुकीचा सल्ला वा विश्वासाघात, अशा घटना घडण्याची शकयता”
(हा पंच साधारण दसरा दिवाळीच्या आधी व फेब्रुवारी मार्च महिन्यात जास्त प्रभावी ठरतो!)
“आपल्याच दाट परिचयाची वा जवळच्या नात्यातली व्यकती गोड बोलून , भुरळ पाडून पैसे उधार घेउून जाईल अर्थात ते पैसे कधिच परत मिळणार नाहीत , मिळालेच तर कमालीच्या विलंबाने वा खुप त्रास होउून मिळतील.”
“आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या असत्या आणि ज्या गोष्टि करायला हव्या होत्या त्या न करता आल्याची मोठी टोचणी तुमच्या मनात आहे.”
भविष्यकथन किंवा सायकोअनॅलायसिस पूर्ण.
आता तुमच्या सावजाचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा!
शुभं भवतु
Too good! Some knowledge of Palmistry is also really useful. You can try our FREE Android app for Palmistry to add these special effects: https://play.google.com/store/apps/details?id=com.iquestionbanks.palmistry&hl=fr
Or try on 24by7exams.com
Thanks buddy, will check. Palmistry will add more Zing !
Suhasji,
I read your artical ” Zhatpat Jyotishi Bana ” of year 2014. Are you astrologer or psychologist ??!!!
Yes, now I can also become astrologer very fast !!!!!
Warm regards,
Sudhanva
श्री. सुधन्वाजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. मी हा लेख जरा विनोदाच्या अंगाने लिह्ला असला तरी प्रत्यक्षात असेच घडत असते . ज्योतिषशास्त्रातले ओ कि ठी कळत नसताना सुद्धा फक्त देखावा करुन , जाहीरात करुन लोकांना फसवण्याचा धंदा कसा चालतो हे मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी बघितले आहे.
या लोकांकडे तुडुंब गर्दी आणि आमच्या माझ्या सारख्या मर मर अभ्यास करुन , व्यासंग करुन , प्रत्येक पत्रिकेचा अभ्यास करुन , शास्त्राशी प्रामाणीक राहूत , व्यवासायिक नितिमुल्यांचे कसोशीने पालन करत काम करणार्याकडे मात्र शुकशुकाट , हा विरोधाभास का? कारण मी ‘पत्रिकेत काय दिसते ते सांगतो ‘ तर ‘तो’ तुमची ‘मन की बात’ सांग़तो आणि समोरच्याला खूष करतो !
तर्कशास्त्र आणि गणित हे ज्योतिषशास्त्राचे दोन आधारस्तंभ बाकीचे दोन सायकॉलॉजी व इंट्युईशन. या लोकांना ‘सायकॉलॉजी’ हा भाग माझ्यापेक्षा जास्त चांगला समजतो!
सुहास गोखले