त्या बटेश चे काय झाले ?

गेल्या वर्षी मी ‘बटेश पद्धती -१ ‘ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्याचा दुसरा भाग प्रकाशीत का केला नाही अशी विचारणा झाली नाही असा आठवडा जात नाही.. काय क्रेझ आहे नै  ! चांगले चांगले लोक विचारताहेत ‘बटेश – २ कधी ?’

मी दुसरा भाग लिहून तयार असताना ही  प्रकाशीत केला नाही  त्याची तीन कारणें आहेत.

एक तर हे जुगाराचे तंत्र आहे,  अनैतिक आहे,  याबद्दल माहीती देऊन मी कळत – नकळत जुगाराला प्रोत्साहन देत आहे असे होईल.

दुसरे कारण म्हणजे  अयोग्य व्यक्तीच्या हातात हे तंत्रज्ञान पडले तर गजब होईल, मला ते नको आहे.

तिसर्‍या कारणा बद्दल म्हणाल तर .. हा किस्साच पहा ना…

अमेरिकेत एक ज्योतिषी बाई होत्या, त्यांनी  जुगारात अचूक पैसा मिळवायचे तंत्र विकसित केले होते , त्याचा वापर करुन त्यांनी ‘लास वेगास’ ला बरेच पैसे कमावले , त्या थिअरीवर त्यांनी एक लहानसे पुस्तक प्रसिद्ध करायचे  ठरवून त्याची हस्तलिखित कॉपी तयार केली आणि कोणी प्रकाशक ते प्रसिद्ध करेल याचा त्या शोध घेत होत्या ….

पण लास व्हेगासच्या कॅसीनो वाल्यांच्या हे लक्षात आले… बाईंना मग ऑफर मिळाली ,

ऑफर १>
xx,xxx,xxxxx,xxxx,xxxxx,xxx इतके पैसे घ्यायचे  ,  हस्तलिखीत नष्ट करायचे आणि पुढचे सगळे आयुष्य नाव बदलून , अज्ञात स्थळी घालवायचे  , आयुष्यात पुन्हा पंचांग उघडायचे नाही….

ऑफर २>
हल्ली रस्त्यात ट्रॅफीक किती वाढलाय नाही का ? कुठून वाहन येईल धक्का देऊन जाईल  सांगता येत नाही, जोरात धक्का बसला तर जीवावर बेतायचे ,  काळजी घेतलेली बरी !

बाईंनी ऑफर १ निवडली !!!

त्या पुस्तकाच्या हस्तलिखिताची  अर्धवट जळलेली काही पाने नंतर बर्‍याच वर्षांनी सापडली !!! पूर्ण पुस्तक मिळाले नसले तरी बराचसा मजकूर शाबूत होता…

माझ्या कडे त्या हस्तलिखीताची स्कॅन केलेली कॉपी आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

गंगापूर रोड- नाशीक ला सुद्धा हल्ली कित्ती ट्रॅफिक वाढलाय नाही का?

शुभं भवतु

Similar Posts

6 Comments

  1. पाताळातला बराच खजीना तुमच्याकडे आहे असे दिसते. दिसतां तेव्हडे तुम्ही साधे नाही असे वाटतें. जस्ट किडींग. वाचायला मजा आली.

    1. हिमांशुजी ,

      आहे बराच खजिना या रावणाच्या लंकेत !

      जुगारात पैसा मिळायला सुद्धा नशिब लागते .

      बाकी आपल्या पारंपरिक ज्योतिष – मुहुर्त शास्त्रात ‘चोरी – दरवड्या’ साठी सुद्धा मुहुर्त काढून दिले आहेत तिथे जुगारा साठी काहीच नाही याचे नवल वाटले तुलनेत फिरंग ज्योतिषानी उत्तम प्रगती (?) दाखवली आहे. नाही म्हणायाला कृष्णमुर्ती (तेच ते के.पी. वाले) त्यांनी याबाबतीत काही लिहले आहे – तीन पत्तीला केव्हा बसावे , रेस ला केव्हा जावे इ.इ.

      सुहास गोखले

  2. गंगापूर रोड- नाशीक ला सुद्धा हल्ली कित्ती ट्रॅफिक वाढलाय नाही का? हा …..हा…..हा…… भारी Point मारला सुहास जी . पण खरेच का हो असे असू शकते का ? असो श्री .अ .ल .भागवत यांच्या एका पुस्तकात सुधा त्यांनी एक फंडा मांडलेला आहे .एकदा तुमच्या Personal mail वर वर Share करेन . बघा नाहीतर इकडे कोल्हापूर रोड ला सुधा ट्राफिक वाढलेल्याच्या धमक्या येतील मला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *