मृत्यूचे भाकित करु नये असा ज्योतिषशास्त्रातला अलिखीत पण सर्वमान्य संकेत आहे आणि तो कसोशीने पाळला ही जातो. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यास करताना मात्र या विषयाला टाळता येत नाही, मृत्यू कधी येणार हे जरी सांगायचे नसले तरी काही वेळेला ‘आयुष्यमान’ किती आहे याचा अंदाज घ्यावाच लागतो, उदा. विवाहाच्या संदर्भात पत्रिका जुळवताना उभयतांचे आयुष्यमान किती आहे याचा अंदाज घ्यावा लागतोच. मी आत्तापर्यंत तीन वेळा मृत्यूचे भाकित केले आहे (आणि दुर्दैवाने तीन्ही वेळा भाकीतें बरोबर आलेली आहेत).
सहा मे ची सकाळ, माझ्या मामेभावाचा सांगलीहून फोन आला , ” आई (म्हणजे माझी मामी ) अत्यवस्थ आहे , शक्य होईल तसे येऊन भेटून जा.”
फोन ठेवताच ठरवले ताबडतोब सांगलीला जायला हवे, पण क्षणाचीही उसंत न देणार्या अपॉईमेंटसची भली मोठी यादी समोरच्या व्हाईटबोर्ड वर झळकत होती, 6 तारीख शक्य नाही, 7 तारीख नाही , 8,9,10 मे पण शक्य नाही, 11 मे रोजी रवीवारच असल्याने मोकळा होता , पण या मधल्या चार-पाच दिवसात काहीही होऊ शकते. शेवटी प्रश्नकुंडलीचा आधार घ्यायचे ठरवले.
“माझ्या मामीच्या प्रकृतीत सुधारणा होईल का ?”
असा प्रश्न मनात धरुन प्रश्नकुंडली तयार केली, होरारी नंबर साठी रॅंडम नंबर वापरला. तयार झालेली प्रश्नकुंडली
दिनांक: 06 मे 201
वेळ: 08:50:14 सकाळ
स्थळ: देवळाली कॅम्प – नाशीक
होरारी क्रमांक : 37 (/249)
अयनांश- केपी 23-58-02
सॉफ्टवेअर : के.पी. स्टारवन
यावेळी प्रश्नकर्ता मी स्वत:च होतो पण प्रश्न माझ्या मामीच्या संदर्भात असल्याने ही प्रश्नकुंडली फिरवून घ्यावी लागणार होती. तयार केलेल्या प्रश्नकुंडलीतले पहिले स्थान म्हणजे मी स्वत: , त्याचे षष्ठम स्थान म्हणजे माझा मामा,षष्ठाचे सप्तम स्थान (व्ययस्थान) म्हणजे माझी मामी. म्हणून मूळ प्रश्नकुंडली चे व्ययस्थान हेच प्रथम स्थान असे मानून सर्व गणित व विश्लेषण केले आहे.
फिरवलेली प्रश्नकुंडली
प्रश्न माझा स्वत:चाच असल्याने प्रश्न जेन्युईन आहे का ? कळकळीने विचारला गेलाय का ? हे पाहण्याची आवश्यकता नाही.
मी सर्वप्रथम मारक बाधक स्थाने निश्चीत केली , धन (2), सप्तम (7) ही (कायमचीच) बाधक स्थाने तर प्रश्नकुंडलीत मेष लग्न असल्याने लाभ (11) हे मारक स्थान होते.
प्रश्न आरोग्याशी संबंधीत असल्याने लग्न (1), षष्ठ (6) , अष्टम (8) व व्यय (12) चे सबलॉर्डस तपासायचे ठरवले.
या पैकी लग्न , षष्ठ , व व्यय या तीनही भावांचा सबलॉर्ड आहे राहू आणि तो वक्री मंगळाच्या नक्षत्रात आहे, या सर्व भावांचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे म्हणजेच प्रश्नकुंड्लीने अत्यंत प्रतीकूल कौल दिला आहे , प्रकृतीत सुधारणा होणार नाही ? ही भितीची पाल चुकचुकली , तरीही पुढे जायचे ठरवले ,या सब चे म्हणजे राहूचे कार्येशत्व असे आहे:
राहू सप्तमात (7)
राहू मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ षष्ठात (6) , प्रथमेश (1) व अष्टमेश (8)
राहू शनीच्या युतीत , शनी सप्तमात (7), दशमेश (10) व लाभेश (11), शनी गुरुच्या नक्षत्रात , गुरु त्रितीयेश (3), नवमेश (9) व व्ययेश (12) ,
राहू रवी च्या दृष्टीत ,रवी लग्नात (1) व पंचमेश (5), रवी शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र लाभात(11) , द्वितीयेश (2) आणि सप्तमेश (7).
म्हणजेच राहू 7,6,1,8, 7,10,11,3,9,12,5,2,7 अशा अनेक भावांचा कार्येश झाला आहे पण लक्ष पूर्वक पाहिले तर ह्या सर्वांत 2,7,11 ही बाधक मारकस्थाने प्रामुख्याने दिसत आहेत, जोडीला 6 व 8 हे आरोग्य व आयुर्दाया ला प्रतीकूल स्थाने आहेतच त्याच बरोबर गुरुच्या माध्यमातून 3,9,12 ही स्थाने , 12 हे स्थान मोठे रुग्णालय सांगते पण 3 व 9 च्या बरोबर असल्याने हा शेवटचा दुरचा अनंताकडेचा प्रवास तर सुचित होतोय का?
अष्टमाचा सब आहे चंद्र. चंद्र त्रितीयस्थानात (3) व चतुर्थेश (4), चंद्र शनीच्या नक्षत्रात , शनी सप्तमात (7), दशमेश (10) व लाभेश (11),चंद्र गुरुच्या युतीत ,गुरु त्रितीयेश (3), नवमेश (9) व व्ययेश (12) ,गुरु स्वत:च्याच नक्षत्रात. म्हणजे चंद्राचे कार्येशत्व 3,4,7,10,11,3,9,12 . अष्टमाचा सब ही प्रतिकूल आहे, त्यात चतुर्थाचे (4) कार्येशत्व म्हणजे अंतकाळ समीप आल्याचाच संकेत.
खरेतर ईथेच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता , पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आलेलाच होता पण ‘सब’ काहीही म्हणूद्यात दशा अंतर्दशा स्वामी तरी हे अरिष्ट टाळतील या वेड्या आशेने मी दशा,अंतर्दशा तपासायला घेतल्या.
प्रश्नवेळेच्या दशा – अंतर्दशा- विदशा–सुक्ष्मदशा – प्राणदशा
प्रश्नसमयी शनीची दशा चालू होती ती 06 नोव्हेंबर 2022 पर्यंत.
शनी सप्तमात (7), दशमेश (10) व लाभेश (11), शनी गुरुच्या नक्षत्रात गुरु त्रितीयेश (3), नवमेश (9) व व्ययेश (12). शनी केतूच्या सब मध्ये, केतू व्ययात (12) स्वत:च्याच नक्षत्रात ,केतू रवीच्या युतीत , रवी लग्नात (1) व पंचमेश (5), रवी शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र लाभात(11) , द्वितीयेश (2) आणि सप्तमेश (7).
एकंदर पाहता शनीचे 2,7,11,9,12 या स्थानांचे कार्येशत्व अत्यंत निराशाजनक आहे , शनीचा सब केतूही प्रतिकूल आहे.
शनीच्या महादशेत सध्या रवीची अंतर्दशा चालू आहे ती 10 आक्टोबर 2014 पर्यंत , रवीचे कार्येशत्व: रवी लग्नात (1) व पंचमेश (5), रवी शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र लाभात(11) , द्वितीयेश (2) आणि सप्तमेश (7). रवी स्वत:च्या माध्यमातून 1,5 ही रोगमुक्तीची स्थाने देत असला तरी तो नक्षत्रस्वामीच्या माध्यमातून 2,7,11 ही मारक व बाधक स्थाने देत आहे, रवी चा सब गुरु आहे, गुरु त्रितीयेश (3), नवमेश (9) व व्ययेश (12) ,गुरु स्वत:च्याच नक्षत्रात. म्हणजे पुन्हा एकदा अनंताकडेचा प्रवास, रवीची अंतर्दशा पण अत्यंत प्रतिकूल आहे.
रवीच्या अंतर्दशेत सध्या शनीची विदशा चालू आहे ती 4 जून 2014 पर्यंत.
शनीचे कार्येशत्व आपण पाहीले आहेच ते अत्यंत निराशाजनक आहे , शनीचा सब केतूही प्रतिकूल आहे:
म्हणजे पार विदशे पर्यंत सर्वत्र अत्यंत प्रतिकूल ग्रहमान आहे.
प्रश्न 6 मे 2014 चा शनी विदशा 4 जून पर्यंत आहे म्हणजे सुक्ष्मदशा बघायच्या का ? खरे तर या वेळेपर्यंत निकाल स्पष्ट झाला होताच , माझी मामी आता काही दिवसांचीच सोबती आहे, तिचा अखेरचा प्रवास आधीच चालू झालेला आहे हे उघडच होते.
जड अत:करणाने सुक्ष्मदशा बघायचे ठरवले. शनीच्या विदशेत सध्याची सुक्ष्मदशा शुक्राची 09 मे पर्यंत, रवीची 12 मे पर्यंत. त्यानंतर येतील त्या चंद्र,मंगळ, राहू व गुरुच्या सुक्ष्मदशा.
प्रश्नवेळेचे मेषलग्न (चरलग्न), सर्व सबलॉर्ड्स नी दिलेला कौल लक्षात घेता ही दुख:द घटना काही दिवसांत घडणाची शक्यता असल्याने मी चंद्राचे गोचर भ्रमण बघायचे ठरवले. प्रश्नवेळी चंद्र कर्केत होता, म्हणजे चंद्र कर्केत असेल तोपर्यंत घटना घडणार नाही. चंद्र जेव्हा सिंहेत म्हणजे रवीच्या राशीत जाईल तेव्हा आपल्याला त्या राशीतली शुक्र व रवी दोन्ही नक्षत्रे मिळतील. त्यापैकी रवीची रास व शुक्राचे नक्षत्र आपल्या दशा-सुक्ष्म साखळीशी जुळेल.
चंद्र 8 मे संपूर्ण दिवस सिंहेत ,केतूच्या नक्षत्रात असेल, सिंहेचा रवी आपल्या साखळीत आहे पण केतू नाही, 8 तारखेला घटना घडणार नाही. 9 मे रोजी चंद्र सिंहेत शुक्राच्या नक्षत्रात जाईल व संपूर्ण दिवस त्याच नक्षत्रात असेल. ईथे आपली साखळी जुळते. दुर्दैवी जरुर पण घटना हयाच दिवशी,म्हणजे 9 मे 2014 रोजी घडणार. 9 तारखेला शुक्रवार आहे हेही लक्षात घेण्याजोगे.
9 मे 2014 रोजी दुपारी 14:13 च्या सुमारास चंद्र रवीच्या राशीत, शुक्राच्या नक्षत्रात, राहूच्या सब व शनी च्या सब सब मध्ये येईल. त्यावेळेचे लग्न रवी-शुक्र – राहू असेल, चंद्र व लग्न बिंदू पूर्ण अंशात्मक (रॅप्ट) युतीत येतील ( सिंह 19-16), त्यावेळच्या गोचर कुंडलीत हर्षल अष्टम (मृत्यू) भावारंभी 2 अंशात.
दशास्वामी शनी हा शुक्र-गुरु-केतू असा असेल, अंतर्दशा स्वामी रवी हा मंगळ – शुक्र – बुध , सुक्ष्मदशा स्वामी शुक्र हा गुरु- शनी – राहू असा असेल. तर प्राणदशास्वामी राहू हा शुक्र- मंगळ-शुक्र – राहू असा असेल.
दशा विदशा , रुलींग प्लॅनेट्स , गोचर भ्रमण सगळे बघितले हो पण कोठेच आशेचा किरण गवसला नाही, नियतीचा कौल आहे तो जसा आहे तसा स्विकारायलाच हवा.
थरथरत्या हाताने कागदावर अक्षरें उमटवली ‘ मामी 9 मे 2014 रोजी दुपारी 1:45 ते 2:15 च्या दरम्यान आम्हाला दु:ख सागरात लोटून ,महाप्रस्थान ठेवणार आहे’
रात्रीचा 12 तासाचा प्रवास करुन मी 8 तारखेला पहाटे सांगलीला पोहोचलो, मिरजेच्या मिशन हॉस्पीटल मध्ये माझी मामी शेवटच्या घटका मोजत होती, डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ चालू होती.मला त्याच दिवशी परत निघणे भाग होते , निकडीची कामे अर्धवट सोडून आलो होतो,व्यवहार कोणाला चुकला आहे का?
पुन्हा रात्रभरचा प्रवास करुन 9 तारखेला पहाटे नाशकात परतलो, कमालीचा अस्वस्थ होतो,परमेश्वरा काहीही कर पण माझे भविष्य खोटे ठरव अशी मनोमन प्रार्थना करत होतो. आज काहीही काम करायला नको,कोणाचाही फोन येऊ नये असे वाटायला लागले, पण तसे होणार नव्हते , दुपारी साडेतीनच्या सुमारास फोनची रिंग वाजायला सुरवात झाली, मामेभावाचाच फोन होता.
मामी दुपारी दिड -पावणे दोनच्या सुमारास गेली….
I cannot say, and I will not say
That she is dead. She is just away.With a cheery smile, and a wave of the hand,
She has wandered into an unknown landAnd left us dreaming how very fair
It needs must be, since she lingers there.And you—oh you, who the wildest yearn
For an old-time step, and the glad return,Think of her faring on, as dear
In the love of There as the love of Here.Think of her still as the same. I say,
She is not dead—she is just away.”― James Whitcomb Riley
सुहास गोखले साहेब, आपण मामीच्या मृत्युच्या संदर्भात केलेलं विवेचन फारच अप्रतिम आणि पटण्यासारख आहे.
ह्या विषयात आपली फारच छान गती आहे. उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो हीच श्री गजाननाकडे प्रार्थना.
धन्यवाद श्रीरामजी, आपल्या सारख्या अभ्यासुं कडून आलेली प्रतिक्रिया मला लाखमोलाची आहे. आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद असेच कायम लाभोत हि विनंती.
सुहास
Yes. I know that you had told Vivek that 9th May was critical & it happened exactly like that.
सौ. विशिता ताई, धन्यवाद .
सुहास
नमस्कार आपला ब्लाग वाचला छान वाटला.माझी एक अडचन आहे साेडवाल का? मी भयकर अर्थिक अडचनीतुन चाललाे आहे .माझी जन्म तारीख ३१/८/६९वेळ २३.३०.स्थळ .बसमत(परभणी)अनेक अडचनीला मला ताेड द्यावे लागत आहे.एखादा उपाय सागालकीवा भाग्यरत्न.
श्री. शीवकुमारजी,
मी उपाय तोडगे भाग्यरत्न सुचवत नाही कारण असले उपाय , तोडगे , भाग्यरत्नें वापरुन आर्थिक समस्या दूर होत नाहीत.
सुहास
सर,
आपण प्रत्येक माहीती खुप छान पदधतीने पटवुन देता.
प्लिज मला खालिल प्रश्नांची उत्तरे द्याल का?
1) पति पत्नीचे नाते प्रत्येक जन्मी असते का?
2) त्यांच्याकडुन घडणार्या बरे वाइट कर्मांची फ़ळे नात्यावर कशी परीणाम करतात?
3) करणी, भानामती, भुतबाधा खरे कि खोटे याबद्द्ल काही माहीती सांगाल का? असले तर कसे ओळखावे आणि त्यावर उपाय काय?
वरिल प्रश्न मी इंटरनेटवर शोधले पण समाधान कारक उत्तरे मिळाली नाहित,
प्रमोद
श्री प्रमोदजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद .
पति पत्नीचे नाते प्रत्येक जन्मी असते का?
: मला माहिती नाही , आपल्या धर्मशास्त्रात ७ जन्माचा उल्लेख आहे.
त्यांच्याकडुन घडणार्या बरे वाइट कर्मांची फ़ळे नात्यावर कशी परीणाम करतात?
:कर्म मग ते कसेही असो त्याची फळे भोगायला लागतात , पती (पत्नी) च्या कर्माची फळे पत्नीला त्याच जन्मात अप्रत्यक्ष भोगायला लागतात असे दिसते.
करणी, भानामती, भुतबाधा खरे कि खोटे याबद्द्ल काही माहीती सांगाल का? असले तर कसे ओळखावे आणि त्यावर उपाय काय?
: या विषयावरचा माझा अभ्यास नाही
शुभेच्छा
सुहास गोखले
अभिप्रायसाठी धन्यवाद
Farach sundar..Ajun anubhav vachayla avadtil….. tumcha jyotishshatracha danaga anubhav disto aahe….
मानसीजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Anuabhav changla kathan kela… Ajun kahi anubhav vachayla avadtill…
मॅन्सीजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Hi sir I want to talk with you
श्री. सिद्धेश्वरजी,
आपल्याला ईमेल पाठवली आहे.
सुहास गोखले
सुहासजी,
उत्तम केस स्टडी आहे. पण शंका अशी की शनीची महादशा व शनीचीच विदशा असताना आपण चंद्र मकरेत किंवा कुंभेत जाण्याची वाट का नाही बघितली? तसेच शनी वक्री असल्याने मार्गी होईपर्यंत थांबावे असे आपल्याला वाटले नाही का?
प्राणेश
श्री. प्राणेशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपण विचारले आहे: “शनीची महादशा व शनीचीच विदशा असताना आपण चंद्र मकरेत किंवा कुंभेत जाण्याची वाट का नाही बघितली? तसेच शनी वक्री असल्याने मार्गी होईपर्यंत थांबावे असे आपल्याला वाटले नाही का?”
शनीचे कार्येशत्व आपण पाहीले आहेच ते अत्यंत निराशाजनक आहे , शनीचा सब केतूही प्रतिकूल आहे, म्हणजे पार विदशे पर्यंत सर्वत्र अत्यंत प्रतिकूल ग्रहमान आहे. शनीच्या विदशेत सध्याची सुक्ष्मदशा शुक्राची 09 मे पर्यंत, रवीची 12 मे पर्यंत. घटना काही दिवसांत घडणाची शक्यता असल्याने मी चंद्राचे गोचर भ्रमण बघायचे ठरवले. प्रश्नवेळी चंद्र कर्केत होता, म्हणजे चंद्र कर्केत असेल तोपर्यंत घटना घडणार नाही. चंद्र जेव्हा सिंहेत म्हणजे रवीच्या राशीत जाईल तेव्हा आपल्याला त्या राशीतली शुक्र व रवी दोन्ही नक्षत्रे मिळतील. त्यापैकी रवीची रास व शुक्राचे नक्षत्र आपल्या दशा-सुक्ष्म साखळीशी जुळेल.
पुढे जाऊन पाहता 9 मे 2014 रोजी दुपारी 14:13 च्या सुमारास चंद्र रवीच्या राशीत, शुक्राच्या नक्षत्रात, राहूच्या सब व शनी च्या सब सब मध्ये येईल. त्यावेळेचे लग्न रवी-शुक्र – राहू असेल, चंद्र व लग्न बिंदू पूर्ण अंशात्मक (रॅप्ट) युतीत येतील ( सिंह 19-16), त्यावेळच्या गोचर कुंडलीत हर्षल अष्टम (मृत्यू) भावारंभी 2 अंशात.
इतके सगळे असताना वक्री ग्रह पाहण्याची आवश्यकता नाही किंवा चंद्र दशा/ अंतर्दशा/ विदशा स्वामीच्या नक्षत्रात असलाच पाहीजे असे नाही. इतर मार्गांनी अत्यंत खणखणीत कौल मिळत असताना उगाच एखाद्या नियमाचा बाऊ करत बसू नये.
वक्री ग्रहां बाबत कृष्ण्मुर्तींनी सांगीतलेले नियम व्यावहारीक पातळीवर लागू पडताना दिसत नाही (हे खुद्द कै. सुरेश शहासनें सारख्यांचे अनुभवाअंती बनलेले मत आहे) त्यामुळे निदान या केस मध्ये तरी मी वक्री शनी मार्गी होई पर्यंत थांबणे अव्यवहार्य ठरले असते.
ज्योतिष हे गणीत , तर्कशास्त्र यांच्या आधारावर चालते पण त्याच बरोबर बर्याच वेळा इंटेऐश्युन सारख्या दैवी सहाय्याची पण मदत घ्यावी लागते आणि ‘तारतम्य – कॉमन सेन्स’ नावाचा घटक तर सतत हाताशी ठेवावा लागतो कारण शेवटी ग्रहस्थिती हा एक संकेत सिम्बॉल असतो त्याचे अनेक (शेकड्यांच्या घरात) अर्थ निघू शकतात , जातकाच्या प्रश्नाच्या बाबतीत यातला नेमका कोणता अर्थ घ्यायचा हे ठरवायला हे ‘तारतम्य’ च जास्त उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे.
मला वाटते मी पुरेसा खुलासा केला आहे जर आपल्या अजुन काही शंका असल्यास नि:संकोच पणे विचारा.
सुहास गोखले
रुलिंग प्लॅनेट बद्दल अधिक सहकार्य हवे आहे
धन्यवाद श्री चंद्रकांतजी, ‘रिलिंग प्लॅनेट्स’ संदर्भात नेमके काय सहकार्य अपेक्षीत आहे ते जरा खुलासेवार लिहा..
सुहास गोखले