Evangeline Smith Adams – 1

१६ मार्च १८८९, बोस्टन ते न्युयार्क असा (त्या काळातला) खडतर प्रवास करुन थकलेली , भागलेली अशी एक तिशीतली एक स्त्री एका हातात जडशील ब्यॅग घेऊन न्युयॉर्क च्या बिझनेस डिस्ट्रीक्ट चे अ‍ॅव्हेन्युज आणि स्ट्रीट्स पालथे घालत होती.

बाई साधीसुधी नव्हती, दिसायला आकर्षक, तरतरीत तर होतीच पण तिच्या डोळ्यात एक कमालीची चमक होती. बाईं तालेवार घराण्यातली होती , तालेवार म्हणजे किती तर शेकडो नव्हे हजारों एकर शेती मालकीच्या असलेल्या उमराव घराण्यातली , याच घराण्यातली एक कर्तबगार व्यक्ती अमेरिकेच्या स्थापनेचे जे बारभाई कारस्थान झाले त्यातली एक  प्रमुख व्यक्ती होती आणि हीच व्यक्ती पुढे जाऊन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान ही झाली होती.

आता ह्या  बाई न्युयॉर्क चा बिझनेस डिस्ट्रीक्ट असा पायी पालथा का घालत होत्या?

बाई बोस्ट्न हून न्युयॉर्क ला पोहोचल्या होत्या आणि राहण्यासाठी आपल्या इतमामाला साजेसे असे लॉज हुडकत होत्या.

आता न्युयॉर्क चा बिझनेस डिस्ट्रीक्ट तो,  एका पेक्षा एक हॉटेल्स (लॉजेस) दिमाखात उभी होती.

“या मॅडम ,  XXXX XXX हॉटेल मध्ये आपले स्वागत आहे”

“धन्यवाद”

“आज आम्ही आपली काय सेवा करु शकतो मॅडम’

“मला रहाण्यासाठी एक खोली पाहीजे, चांगल्या पैकी, हवेशीर , प्रशस्त “

“अवश्य मॅडम, काळजी नसावी आपल्याला जशी हवी अगदी तशी रुम आमच्याकडे आहे”
“उत्तम , मला चालेल, पण मी साधारण महीनाभर राहण्याचा विचार करतेय”

“त्याची काळजी करु नका मॅडॅम , आपली सोय नक्की होईल इथे पण आपला परीचय ?”

बाईंनी नाव – गाव सांगीतले

“अरे वा, म्हणजे आपल्या माजी प्रेसीडेंट साहेबांच्या फ्यॅमीलीतल्या”!”

“येस”
“आपल्या सारखी महनीय व्यक्ती आमची अतिथी आहे याचा आम्हाला अभिमान वाटेल”

“धन्यवाद”

“न्युयॉर्क मध्ये आपले स्वागत आहे मॅडम, आमच्या रेकॉर्ड साठी लागते म्हणुन विचारतोय, आपला न्युयॉर्क ला भेट देण्याचा हेतु?”

“मी इथे माझा व्यवसाय सुरु करणार आहे , त्याची तयारी होई पर्यंत मी एखादा महीना हॉटेल वर राहणार आहे”

“अरे वा, चांगले आहे की , आमच्या हॉटेलचे बहुतेक ग्राहक व्यवसायातलेच असतात, त्या साठी तर आमचे हॉटेल प्रसिद्ध आहे”

“रुम उपलब्ध आहे ना?”

“आहे तर , पण एक खुलासा हवा होता, आपला व्यवसाय कोणता आहे, रियल इस्टेट का ऑईल का स्टिल ?”

“मी ज्योतिषी आहे तोच माझा व्यवसाय आहे”

“मॅडम मी जर बरोबर ऐकले असेल तर आपण ज्योतिषी आहात आणि तो आपला व्यवसाय आहे ?”

“आपण बरोबर ऐकले आहे”

“मॅडम , आपण  फार मोठ्या उमराव घराण्यातल्या आहात , त्या बद्दल आम्ही आपला आदर करतो , आपल्या सारख्या उमरावांना आमच्या हॉटेल मध्ये रुम देताना आम्हाला आनंदच होईल पण …”

“पण काय?”

“मॅडम , सॉरी, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही”

“का?”

“ज्योतिषी आणि आमच्या हॉटेल मध्ये , नाही …नाही … नाही . “

“त्यात काय वावगे आहे?”

“मॅडम, आमच्या हॉटेल ला एक प्रतिष्ठा आहे, शान शौकत आहे, आमच्या हॉटेलात  बड्या बड्या उद्योगपतींचा वावर असतो, आता इथे जर एका ज्योतीषाला रुम दिली गेली हे जर बाहेर कळले तर आमची ही सारी प्रतिष्ठा धुळीस मिळेल “

“असे कसे होईल”

“मॅडम, माफ करा पण तुम्ही आमचा वेळ बरबाद करत आहात, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही. सॉरी”

हताश मनाने बाई हॉटेलच्या बाहेर आल्या.

नकार मिळालेले हे कितवे हॉटेल असावे हे आता मोजायच्या पलीकडे होते..

बाई आपल्या आत्मचरित्रात लिहतात—

“… Homeless on the sidewalks of Madison Square… I staggered along under the weight of my carefully over packed portmanteau  … I was in a mood to defy assistance –and the word. So I put off the Avenue with my dignity in one hand and my luggage in the other”

 

कोण होत्या ह्या ज्योतिषी बाई , मिळाली का त्यांना रुम ?

 

पुढच्या  भागात  वाचा …


क्रमश:

शुभं भवतु

Similar Posts

  • |

    सॅम बाबाचे नुस्के- भाग १

    (विनोदी शैलीत लिहलेला लेख आहे, कोणत्या ‘बाबा/बापु/बुवा/अण्णा/ महाराज’ यांच्या शी या लेखाचा काहीही संबंध नाही, तसा कोणाला आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही लेखमाला लिहताना कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही!) फार फार वर्षां पूर्वीची स्टूरी आहे ही . तिकडे दूर पार…

  • |

    ग्रंथ हेच गुरू !

    ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला तेव्हा पहिली अडचण आली ती हे सर्व कोण शिकवणार? तसे ज्योतिष शिकवणारे अभ्यासवर्ग (क्लास) बरेच आहेत पण चौकशीअंती लक्षात आले की त्यातले फार थोडे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करताहेत, बाकींच्या बद्दल न बोललेलेच बरे. त्यातही अभ्यासवर्गाच्या (कलास) वेळा…

  • |

    Rahu Ketu Experience

      आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या  इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे. सर्वप्रथम मी इथे नमूद करतो की ‘राहू व केतू’ हे वस्तुत: ग्रह नाहीत तर च्रंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत, त्यांना वस्तुमान ,आकारमान नाही,…

  • |

    A Great Astrologer

    .                          .eBay – उसगाव वरुन मी आयव्ही एम गोल्ड्स्टीन जेकबसन या पाश्चात्य ज्योतिर्विदे ने लिहलेल्या ग्रथांचा एक संच स्वस्तात विकत घेतला होता, (ग्रंथसंग्रह एका ज्योतिर्विदेचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजिवांनी त्याला eBay दाखवले ! देवा त्याला क्षमा कर आणि असेच लाखमोलाच्या…

  • |

    ‘काल निर्णय’ भाग – 1

    ‘काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे. पण तो तितकाच अवघड ही आहे, ज्योतिर्विदाची बाजारातली सगळी ‘पत’ या एकट्या ‘कालनिर्णय’ करण्याच्या क्षमते वर व त्याच्या अचूकते वर अवलंबून असते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष…

  • |

    मधुबालेचा हुंदका!

    होरारी चा अभ्यास करताना ज्या ग्रंथांची मला अत्यंत मदत झाली त्यात सिल्व्हिया डी लॉंग याच्या ‘Art of Horary Astrology in Practice‘ या ग्रंथाचे नाव मी मोठ्या आदराने घेतो. या होरारी केस स्ट्डीज वरच्या ग्रंथाची मी किती पारायणे केली असतील देव जाणे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *