अ‍ण्णा’ पंक्चरवाला !

एखादी मालगाडि रुळावरुन घसरली की किंवा दरड कोसळली की कोकण रेल्वे ची वाहतुक विस्कळीत होते (हा ‘विस्कळीत’ शब्द फक्त वाहतुकीचे वर्णन करण्या साठीच निर्माण झाला असेल अशी शंका येते, तसेच ‘जखमां’ व ‘परिस्थिती’ कायमच ‘चिघळतात, दुसरे त्यात काही होऊच शकत नाही, बोलणी आणि वाटाघाती नेहमी ‘फिसकट्ण्या’ साठीच होतात का अशी शंका येते नै का?) तसे माझे सध्या झाले आहे, दिवाळी , त्यापाठोपाठ आलेले आजारपण याचा कामावर काहीसा परिणाम झालाय , म्हणजे काही कामे उगाचच मागे पडलीत तर काहींनी चक्क लाईनीत घुसुन तिकटीं काढून केव्हाच पैल्या लायनीतल्या शीटा !

पण सगळ्यांनी समजून घेतलेय हो, मायबाप!

एका जातकाला मी हेच जरा विनोदी ढंगात लिहले होते, टोन विनोदी असला तरी वस्तुस्थिती अगदी तशीच आहे.

सध्या माझी अवस्था रस्त्याच्या कडेच्या ‘अ‍ण्णा’ पंक्चरवाल्या सारखी झाली आहे,

एकाचे टायर खोलतोय,

दुसर्‍याचे  इनर पाण्यात बुड्वून ‘बुड्बुडे’ पाहतोय,

तिसर्‍याच्या टायरीत हवा भरतोय ,

चौथ्याच्या विल्क्यॅप चे  इस्क्रू टाईट करतोय,

पाचव्याच्या गाडीला फडका मारतोय ,

सहाव्याला हिशेब समजावून सांगतोय,

सातव्याच्या :  ‘ ए अण्ण्या , साल्या माजलास काय ऑ, दिसत नै का भाई लोक खोळंबल्यात ..  मुंबै ला जाऊन रायलो बे मिटींगाला, लेट होऊन रायला .. कदी होनार गाडी बे ..धंदा करायचा हाय ना हिथे..”  ह्या डर्काळिवर दात विचकत “ ह्ये काय आपल्च चाल्लाय सार्र’  असे उत्तर देतोय,

तिकडे आठवा स्कॉर्पिओ वाला ‘जाणता राजा’  ठणाणा हॉर्न वाजवून शिव्या घालतोय “पयला आमचं काम बाकि ग्येले तेल लावत काय समजलास …  नंबर प्लेटिवरचे  घड्याळ नै का बगीतले “   ..

नौवा  ….. जाऊ दे तुमच्या लक्षात आले असेलच

तर मंडळी , काळजीचे कारण नाही , परिस्थीती पूर्वपदावर आली आहे , बहुतांश साचलेली कामे हाता वेगळी होत आहेत , अगदी थोडीच बाकी आहेत , पण त्यांनीही सांभाळून घ्यावे लेकराला ही विनंती !

परिस्थीती नियंत्रणात आलीच आहे तेव्हा नव्या जातकांनी आता बिनधास्त यावे, जास्त वेळ नाही लागणार.

“ (पचाक थू ) ए अन्न्या . xxxxx, ल्येका बाकड्यावर बसूनशान बुडाला मोड आलं बग  , तुजं कदी निगणार र पंचर , आदी बोल्ला अस्ता तर दुसरी कडे तरी न्येली असती गाडी ..थूत तुज्या ..”

बापरे पळतो आता नाहीतर हे मोड्वाले तात्या आपला कोल्हापुरी हिसका दावतील  ..

शुभं भवतु

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *