समोर खुर्चीत बसली होती एक ‘अंबक्का’ , खुर्चीत मावत नव्हती!
“तो ‘विकि’ कित्ती गोड आहे , त्याच्याशी माझे लग्न होईल का ते सांगा!”
“हा ‘विकि’ कोण?”
“आहे असाच… मला फार फार फार फार फार फार आवडतो”
“तुमचे प्रेम आहे का?”
“सध्या नै , पण नंतर होणार आहे!”
“हे कसे काय?”
“असेच”
“मग तुमचे प्रेम सुरु झाल्यावर विचार ना प्रश्न, आत्ताच घाई का करतेस?”
“तुम्हाला नै कळणार ही प्रेमाची भानगड”
“म्हणजे काही भानगड पण आहे का?”
“तसे नै हो, अजून काहीच झालेले नाही”
“मग , काही तरी झाल्यावरच बोलूयात ना आपण”
“हो पण विकि शीच लग्न होणार असेल पुढे जाण्यात मतलब नै का?”
एकतर्फी प्रेमाचा मामला आहे हे उघडच दिसतच होते, मी सहसा अशा प्रश्नांची उत्तरें देत नाही. पण मुलगी माझ्या एका चांगल्या मित्राच्या ओळखीतून आलेली होती, नाही म्हणता आले नाही.
प्रश्न कुंडलीने ही स्थिती अगदी बरोबर दाखवली होती (एकतर्फी का असेना , पोरगी त्या विकी वर मनापासुन प्रेम करत असावी) , अर्थात त्या मुलाशी हिचे काही जमणार नव्हते , ग्रहयोग इतक्या पराकोटीचे विरुद्ध होते की बस्स! मी साफ सांगीतले ….
“तुझे हे प्रेम एकतर्फी आहे असे दिसतेय, ह्या विकीशी साधा ‘आँखो ही आँखो में इशारा’ सुद्धा होणार नाही, विवाह तर फार लांबची गोष्ट!”
त्या मुलीने क्षणभर माझ्याकडे रोखून पाहीले आणि म्हणाली…
“मला माहीतेय , तुम्ही पत्रिका न बघताच केवळ माझ्याकडे बघून हे विधान केले असणार”
“मी जे बोलतोय ते पत्रिकेचा पूर्ण अभ्यास करुन , तुला बघून मी मत बनवले नाही, तू फोन करुन विचारले असतेस तरी हेच उत्तर मिळाले असते”
“ समजा, मी ‘बिपाशा बसू’ असते तर तुमचे उत्तर हेच असते का?”
“पण तू बिपाशा बसू नाहीस”
“पण तसे समजयाला काय हरकत आहे”
“पण असे का म्हणून समजायचे?”
“त्याने तुमच्या उत्तरात फरक नै का पडणार?”
“माझे आई, तू पहील्यांदा बिपाशा बनून ये , पुन्हा प्रश्न विचार, मी तुला साक्षात ‘शाहरुख’ मिळवून देतो..”
“शाहरुख चे लग्न झालेय”
“त्याचे लग्न झालेले नाही असे समजायला काय हरकत आहे”
….

ha ha ha…..
धन्यावाद प्रमोदजी, असे असंख्य किस्से आहेत !
सुहास गोखले
तुम्हाला नवीन ‘व्यक्ती आणि वल्ली’ लिहायला काहीच हरकत नाही!
धन्यवाद प्राणेशजी , आपली आयडिया चांगली आहे
सुहास गोखले
सुंदर सूरवात
धन्यवाद , आण्णासाहेब
सुहास गोखले