असे जातक येती … १

समोर खुर्चीत बसली  होती एक ‘अंबक्का’ , खुर्चीत मावत नव्हती!

“तो  ‘विकि’  कित्ती गोड आहे , त्याच्याशी माझे लग्न होईल का ते सांगा!”

“हा ‘विकि’ कोण?”

“आहे असाच… मला फार फार फार फार फार फार आवडतो”

“तुमचे प्रेम आहे का?”

“सध्या नै , पण नंतर होणार आहे!”

“हे कसे काय?”

“असेच”

“मग तुमचे प्रेम सुरु झाल्यावर विचार ना प्रश्न, आत्ताच घाई का करतेस?”

“तुम्हाला नै कळणार ही प्रेमाची भानगड”

“म्हणजे काही भानगड पण आहे का?”

“तसे नै हो, अजून काहीच झालेले नाही”

“मग , काही तरी झाल्यावरच बोलूयात ना आपण”

“हो पण विकि शीच लग्न होणार असेल पुढे जाण्यात मतलब नै का?”

एकतर्फी प्रेमाचा मामला आहे हे उघडच दिसतच होते, मी सहसा अशा प्रश्नांची उत्तरें देत नाही. पण मुलगी माझ्या एका चांगल्या मित्राच्या ओळखीतून आलेली होती, नाही म्हणता आले नाही.

प्रश्न कुंडलीने ही स्थिती अगदी बरोबर दाखवली होती (एकतर्फी का असेना , पोरगी त्या विकी वर मनापासुन प्रेम करत असावी)  , अर्थात त्या मुलाशी हिचे काही जमणार नव्हते , ग्रहयोग इतक्या पराकोटीचे विरुद्ध होते की बस्स! मी साफ सांगीतले ….

“तुझे हे प्रेम एकतर्फी आहे असे दिसतेय, ह्या विकीशी साधा ‘आँखो ही आँखो में इशारा’ सुद्धा होणार  नाही,  विवाह तर फार लांबची गोष्ट!”

त्या मुलीने क्षणभर माझ्याकडे रोखून पाहीले आणि म्हणाली…

“मला माहीतेय , तुम्ही पत्रिका न बघताच केवळ माझ्याकडे बघून हे विधान केले असणार”

“मी जे बोलतोय ते पत्रिकेचा पूर्ण अभ्यास करुन , तुला बघून मी मत बनवले नाही, तू फोन करुन विचारले असतेस तरी हेच उत्तर मिळाले असते”

“ समजा, मी ‘बिपाशा बसू’ असते तर तुमचे उत्तर हेच असते का?”

“पण तू बिपाशा बसू नाहीस”

“पण तसे समजयाला काय हरकत आहे”

“पण असे का म्हणून समजायचे?”

“त्याने तुमच्या उत्तरात फरक नै का पडणार?”

“माझे आई, तू पहील्यांदा बिपाशा बनून ये , पुन्हा प्रश्न विचार, मी तुला साक्षात ‘शाहरुख’ मिळवून देतो..”

“शाहरुख चे लग्न झालेय”

“त्याचे लग्न झालेले नाही असे समजायला काय हरकत आहे”

….

Similar Posts

  • |

    हरीण कासवा पोटी

    परवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि हसायला आले. खूप वर्षापूर्वी मी ही ‘उक्ती’ एका कडून ऐकली होती , आज आपल्यासमोर एका वेगळ्या संदर्भात सादर करत आहे. गोष्ट तशी जुनी , एक सरकारी अधिकारी, गावोगावी , खेड्यापाड्यात जाऊन…

  • |

    जॉन फ्रावली

    श्री. जॉन फ्रावली (John Frawley) – एक परिचय श्री.जॉन फ्रावली हे सध्याच्या पिढीच्या ज्योतिर्विदां मधले एक अग्रगण्य नाव आहे. १७ व्या शतकातल्या महान ब्रिटिश ज्योतिर्विद श्री. विल्यम लिली यांच्या परंपरेतले ज्योतिषी म्हणून श्री.जॉन फ्रावली यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सध्याच्या…

  • |

    असे जातक येती- ८

    आनंदराव! तसे बघितले प्रत्येक गावातल्या गल्ली बोळात एक ‘आंद्या’ असतोच हा तसलाच एक, पण हा स्वत:ला ‘आनंदराव’ असे म्हणवून घेत होता! या आनंदरावाने माझी माहीती कोठून मिळवली कोणास ठाऊक पण एके दिवशी असाच आधी काही न कळवता,  अपॉईंटमेंट न  घेता , एकदम दारात…

  • |

    थोडे शिकवे कुछ शिकायते

    जातकांच्या काही तक्रारी आणि त्याबद्द्लचा माझा खुलासा आता व्यवसाय म्हणले की जातकांच्या तक्रारी अधून मधून येणे स्वाभाविकच. जातकाची कोणतीही , कसलीही, कितिही लहान सहान तक्रार असो , मी अत्यंत गांभिर्याने घेतो, हातातली सर्व कामें बाजूला सारुन त्याकडे तातडीने लक्ष देतो.  काहीजण…

  • |

    ब्लॉगचा वाढदिवस!

    आज बघता बघता आपल्या या ब्लॉग ला चक्क एक वर्ष पूर्ण झाले. (इंग्रजी ब्लॉग ला ही दोन दिवसात वर्ष पूर्ण होईल). हा  ब्लॉग सुरु करण्या मागचा माझा मुख्य उद्देश ‘माझ्या बद्दल आणि माझ्या ज्योतिष विषयक मार्गदर्शन सेवे’ बद्दल लोकांना माहिती करुन…

  • |

    परममित्र

    मी सांगलीचा, जन्म, शिक्षण सारे सांगलीत. शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी साठी सांगली सोडली त्याला आता ४० वर्षे झाली पण सांगलची आठवण आली नाही असा दिवस जात नाही, पुण्यात/ नाशकात कधी रस्त्यावर MH 10- वाली गाडी दिसली की माहेरचा माणूस भेटल्याचा…

6 Comments

  1. तुम्हाला नवीन ‘व्यक्ती आणि वल्ली’ लिहायला काहीच हरकत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *