आमी काय संण्यास घ्येऊच नै काय?

चला टायम झाला मंडली !

आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास !

आपण या महीन्या पुर्ता ‘हटयोगी / नागा संण्यासी ‘ का म्हणतात ना तस्ले बणून राणार !

पोष्ट्स नैत , कामेंटा नैत , लाइक्स न्हाईत , काय पण नाय , नागा संण्याश्याला अस्ले काय पण करायची पर्मिशंनच नाय म्हणतात बोवा…

आसलं काय तर द्येवाधर्माचे …… आपल्याला तसंच वागाया पायजे बाब्बा ! ..

तेव्हा भेटू म्होरल्या वरीस मध्ये २०१९ !

तो पर्यंत ………. आपण बरे आपली चिलिम बरी !

आता आमी संण्यास घ्येणार ह्ये लोक्स ना कळावे म्हणून येक नोटीफिकेशण काय दिले , म्हणले लोक्स ना कळले पाहीजे आमचा संण्यास चालू आहे त्ये,

लोक्स तरी कस्ली बेणीं बघा, सरळ सुखाने संण्यास घ्येऊ देतील का?

सक्काळ घरनं , लोक्स यायाला लागले , काही बाही विचारायला लागले , आपला येक गरीब होऊ घातलेला संण्याशी दिस्ला म्हणूण काय पण विचारायचे ? काय ताळ नाय की तंत्र नाय, लोक्स  काय काय विचारतात ते बघा ना !

1> आपल्याला संण्यासाची प्रेरणा कोठूण मिळाली ?

कसली डोंबलाची प्रेरणा ! साला ह्या फेसबुक चे अजिर्ण झाले म्हणून संण्यास , प्रेरणा बिरणा काय नाय.

2> संन्यासाची पूर्व तयारी काय काय केली ?

अरेच्च्या , याला कसली आलीय पूर्व तयारी, ही काय युपीएस्सी ची परिक्षा हाये का पूर्व तयारी करायला !

3> ‘नागा साधू’ च का?

(डोला मिचकावत) खरी मज्जा थितेच तर हाये ना! मिडिया कव्हरेज कशाला जास्त आहे ? ‘नागा साधू ‘ की ‘शिंपल साधू’ ?

4> आणि त्या ‘चिलिमी’ च काय?

आपला टायमपास हो जावयबाप्पू  !

5> चिलिमात गांजा पण असतो का?

तर .. गांजा शिवाय चिलिम म्हंजे एकदम पुळकवणी हो, थो थो थो , यकदम डाऊनमार्केट फील येतो ना अशान !

6> पण जमैकन गांजाच का? स्वदेशी का नाही?

पतंजली गांजा आला काय बाजारात ?

7> बरे त्या चिलिमी व्यतीरिक्त आणखी काही ?

आता आली का पंचाईत्? फार चौकशा हो तुम्हाला पाव्हणं, आपण नागा साधू होणार म्हणजे बघा बाकी काय लागतच नाय, जवळ काय ठिवायचेच नाय म्हणतात ,  यकदम विरक्ती बघा, कडक नियम आणि  कायदेकाणू असतात , येक चिलिम, गांजाची पुडी, त्रिशुळ आणि कमंडलू , बास्स , बाकी काय जवळ ठिवायला परमिशनच नाय !

8> त्रिशुल कशाला तो?
बरा असतोय , शो पीस म्हणून , वरतून येक लिंबू ठिवायचे खोचून , यकदम ऑथेंटीक वाटतयं, हॅ हॅ हॅ

9> आणि सोमरस असेलच ना?

त्यो कमंडलू काय उगाच जवळ बाळगतो का काय ?

10> नाही ते ठीक आहे पण कोणता सोमरस ? ब्रँन्डेड की लोकल मार्केट ?

आम्हा संन्याशांना काय करायचे ते  ब्रँड नी फ्रिंड , आपला कमंडलू भरलेला असला म्हंजे झाले !

11> बरे मग या संन्यस्त काळात काय काय उपक्रम हाती घेणार आहात?

काय म्हणलाता? ‘संन्यस्त काळ’ ?  , बा भौ . आता ह्ये काय असते आणखी ?

12> म्हणजे या एक महिना तुम्ही जो संन्यास घेणार आहात त्या काळात आपल काय उद्योग करणार?

‘निरूद्योग’ हाच आमचा उद्योग ,  संन्यास के पहेले भी , संन्यास के बाद भी

13> आपण पुर्वी ‘एल आय सी’ त कामाला होता का?

हॅ हॅ ह , ‘एल आय सी’ त कामाला अस्तो तर संण्यास घेण्याची वेळ आली असती का?

14> आपला दाढी मिशा वाला फोटो पाहीला त्यात जरा वेगळेच दिसता तुम्ही?

म्येकप हो, बॉम्बे ! बॉम्बेचा मेक-अप आर्टिस्ट आणला. बच्चन चे गेटअप याच आर्टिस्ट्चे असतय , पैसे लई घ्येतयं ब्येणं पण काम चोख, फटूत  मी वळखू येतो का ते सांगा!  आजाबात नाय ना ?

15> संन्यास योगातून बाहेर आल्या नंतर  काय ?

नंतर काय म्हंजे ? आपले नेहमीचेच, ‘निरूद्योग’ चालू ठेवणार

16> नाही ते ठीक आहे पण एखादा नविन उपक्रम ?

येकच नवा उपक्रम , पोकल बांबूचे फटके,  केरळ मधून पेश्यल ‘रेन फॉरेस्ट ‘ पोकल बांबू आणून ठिवलेत ,
ट्रायल द्येऊ काय ?

………  ये गन्या त्ये नवीण केरळ पेश्यल पोकल बांबू आणलेत ना त्यातला येक आण रे जरा बर्‍या पैकी बघूण , पाव्हण्यांना ट्रायल देयाची हाये…

शुभं भवतु

Similar Posts

  • |

    Evangeline Smith Adams – 2

    “मॅडम, माफ करा पण तुम्ही आमचा वेळ बरबाद करत आहात, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही. सॉरी” हताश मनाने बाई हॉटेलच्या बाहेर आल्या. नकार मिळालेले हे कितवे हॉटेल असावे हे आता मोजायच्या पलीकडे होते.. पुढे चालू …   या लेखमालेतले पहीला…

  • |

    जॉन फ्रावली

    श्री. जॉन फ्रावली (John Frawley) – एक परिचय श्री.जॉन फ्रावली हे सध्याच्या पिढीच्या ज्योतिर्विदां मधले एक अग्रगण्य नाव आहे. १७ व्या शतकातल्या महान ब्रिटिश ज्योतिर्विद श्री. विल्यम लिली यांच्या परंपरेतले ज्योतिषी म्हणून श्री.जॉन फ्रावली यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सध्याच्या…

  • |

    मधुमेहाची लक्षणें – २

    या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो: १)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात. **** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत…

  • |

    चर्मचंची !

    चर्मचंची ! म्हणजे चामड्याचे पाकीट ! जे आपण पैसे ठेवायला वापरतो. मी कॉलेजात असताना एक ‘दस – बीस रुपीया’ वाले वॉलेट वापरत होतो. त्या वेळी पाकीटात ठेवण्या इतके पैसे असायचे कधी? एक सिटीबस चा पास, कॉलेजचे आयडी कार्ड , दोन –…

  • |

    ज्योतिषाची कमाई – १

    “तुमचे काय , ज्योतिषाची बख्खळ कमाई चालू आहे !” असे काहीसे मत्सरी / कुत्सीत बोलणे नेहमीच ऐकायला येते त्याशिवाय “ज्योतिषी लूट करुन गब्बर होतात, आर्थिक शोषण करतात..” हा अंनिस वाल्यांचा आवडता दावा आहेच !! खरेच का ज्योतिषी एव्हढे कमावतात ? चला…

  • |

    Rahu Ketu Experience

      आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या  इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे. सर्वप्रथम मी इथे नमूद करतो की ‘राहू व केतू’ हे वस्तुत: ग्रह नाहीत तर च्रंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत, त्यांना वस्तुमान ,आकारमान नाही,…

6 Comments

Leave a Reply to Gorakshnath Kale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *