काय मज्जा नाय रायली राव !

काय मज्जा नाय रायली राव !

खूप लिहले , भरभरुन लिहले,   लिखाणात सातत्य ठेवले, सतत ज्योतिष एके ज्योतिष व्हायला नको म्हणून इतर अनेक विषयांवर लिहले, विनोद लिहले, कथा लिहली पण वाचकांचा अत्यल्प प्रतिसाद !

काही मूठ्भर वाचक आहेत, ते मात्र वाचतात आवर्जुन प्रतिसाद देतात त्यांचे मन:पूर्वक आभार ! पण ते तेव्हढेच .. त्या मूठ भरीचा पसाभर होत नाही… हे चित्र काही लिहायला उत्साह वाटावा असे खासच नाही.. वाईट वाटते .

शिवराळ, असभ्य , अश्लील , कमरे खालच्या   आणि परखड पणाच्या  नावाखाली उर्मट, उद्दाम पणाने लिहणार्‍याला महिन्याला १०,००० च्या घरात पेज हिट्स! सहा महीन्यात कशीबशी एखादी लंगोटी एव्हढी पोष्ट टाकणार्‍याला देखील रतीब घातल्या सारख्या रोजच्या ४० – ५० पेजहिट्स  ! माझेच कुठेतरी चुकतेय का?

सध्या माझ्याकडे ज्योतिषविषयक कामापेक्षा कार्पोरेट ट्रेनिंग , सॉफ्टवेअर ची कामे अधिक आहेत , त्यातून मुश्किलीने वेळ काढून काहीतरी सकस , दर्जेदार लिहावे तर हा असा अत्यल्प प्रतिसाद ..
नक्कीच काहीतरी चुकते आहे… त्याचे उत्तर शोधायचे आहे ..

माझ्या सध्या चालू असलेल्या तीन मालिका ..
१) ती गेली तेव्हा…   २) कोणा एकाची चित्तर कथा ..   ३) ग्रहयोग
मला पूर्ण करायच्या आहेतच पण जेव्हा जेव्हा मी  लिहायला घेतो तेव्हा ‘कोणीच वाचणार नसेल तर लिहण्याला काय अर्थ आहे ?  ‘ हाच विचार मनात येतो.. मी का वेळ वाया घलावतो आहे? मग दुसरी कामे समोर येतात आणि लिखाण बाजूला पडते ..

असो ,   या मालिकांचे भाग  जे खरोखर वाचायला उत्सुक आहेत त्यांना ईमेल मार्फत पाठवायचे आणि लिखाण थांबावायचे का?

मी एक प्रयत्न तर जरुर केला पण कुछ जम्या नहीं यार !!!!!

शुभं भवतु

 

Similar Posts

19 Comments

  1. I can understand your pain. I don’t have an answer to your situation but may be that’s how it is. Not every effort gets justified the way it should. Not every hard working actor gets success as a selected few get. You have to make the final decision but as long as you write I’ll read.

  2. Dear kaka i was with you am with you & will be with you forever….
    i am fond of your writings & do not even think about to break , yes there may be less readers for your blog but doesn’t mean you should stop writings …..
    instead of saying there are less responses why dont you see there r some authentic readers roaring around your blog who are eagerly waiting for your every post 🙂
    you are light-house to pupils like us.
    Do write for your self , at least at the end of the day you will not regret there were various things i had to deliver but because of some insignificant’s i conclude…..

    regards.

  3. Dear kaka i was with you am with you & will be with you forever….
    i am fond of your writings & do not even think about to break , yes there may be less readers for your blog but doesn’t mean you should stop writings …..
    instead of saying there are less responses why dont you see there r some authentic readers roaring around your blog who are eagerly waiting for your every post
    🙂
    you are light-house to pupils like us.
    Do write for your self , at least at the end of the day you will not regret there were various things i had to deliver but because of some insignificant’s i conclude…..

    regards.

  4. सुहासजी,

    आम्ही आपल्या पुढील पोस्ट ची वाट पाहतो आहोत, आपले दर्जेदार लिखाण असेच चालू ठेवावे हि विनंती.

    आपला,
    संतोष

  5. Dear Suhasji,

    I can understand your frustration. Look at this way – your readership is quality focused. They visit your blog everyday with expectation of new article from you. They may not take efforts to leave you a reply, but they visit it. You can try creating a “like / thumbs up” button or look at page hits counter ( from wordpress), to get better view of number visitors to your blog. My humble request is not to stop writing. Your writing is very analytical and yet simple, it reflects depth of your thinking and efforts. It is easy to understand and simplifies complex topics.

    Thanks,
    Anant

    1. श्री. अनंतजी,

      अभिप्राया बद्दल धन्यवाद .

      मी वाचकांच्या प्रतिसादा बद्दल लिहले नव्हते .. प्रतिसाद आले तर हवेतच पण मूळात लिहलेले वाचले गेले तर कोठे तरी प्रतिसादाची शक्यता निर्माण होईल ना ? मी पेज व्हू काऊंटर तपासतो, कोणते लेखन वाचले जाते आहे हे पण कळते , त्या सगळ्यातून एकच दिसते की लिहलेले वाचलेच जात नाही , हीच खरी खंत आहे.

      सुहास गोखले

  6. जळजळीत चित्र सर्वसामान्य व्यक्तींना नको असते.
    जेंव्हा xxx फटाके फुटतात तेंव्हाच ख-या ज्योतिषाची आठवण येते.
    मी एका फार मोठ्या माणसाचा विशिष्ठ विषयावर च पुस्तक करत होतो मी म्हणालो
    अहो हे कोण वाचणार
    ते म्हणाले वाचलत म्हणुन प्रश्न विचातलात
    किंबहुना “अल मख्तूब मख्तूब….जे लिहिले आहे ते लिहिले आहे…” या वचनावर विश्वास ठेवा.

  7. गुरुजी सादर प्रणाम,

    तुमचे लेख अत्यंत वाचनीय, माहितीपूर्ण, व दर्जेदार असतात. आम्हाला ते खूप खूप आवडतात व आम्ही अत्यंत आतुरतेने तुमच्या लेखाची वाट पाहत असतो. कृपया लेख लिहिणे थांबवू नये.

    सई इंगळे

  8. खर आहे सुहास जी . लोकांची अभिरुची बदलली आहे का समजत नाही . कधी कधी असा वाटत कि खर्याच जगच नाही हे .पण तुमचे लिखाण थांबवू नका . तुम्हाला मागे मी फोन केला होता . मस्त वाटले बोलताना तुमच्याशी . पण xxxx xxx व्यक्तीशी बोलताना फारच भीती वाटली . आणखीन बरेच सांगायचे होते पण सांगेन नंतर . धन्यवाद

    1. श्री. स्वप्निलजी,

      अभिप्रया बद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता तसा अनुभव बर्‍याच जणांना आला आहे , पण काय करणार या असल्या खोट्या नाण्यांचीच चलती आहे आजा असे समजायचं.

      सुहास गोखले

  9. आणि सुहास जी तुम्ही मुळात सुशिक्षित well Educated व्यक्ती असल्याने तुमच्याशी मनमोकळे बोलावे वाटते , share करावे वाटते . तसे इतरांशी होत नाही हो .

  10. नमस्कार,
    मी नुकताच तुमचा ब्लॉग वाचायला सुरवात केली आहे. आवडला. नवीन लिखाणाची उत्सुकता ही असते. आज ब्लॉग वर प्रतिक्रियांबद्दल वाचले. कधी कधी शब्द अपुरे पडतात किवा काय प्रतिक्रिया द्यावी / कोणत्या शब्दात द्यावी ते पटकन समजत नाही. पण नवीन लिखाणाची उत्सुकता मात्र नक्की असते

    वर्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *