ज्योतिष का आणि केव्हा

ज्योतिषशास्त्र संभाव्य संधी वा समस्या बद्दल मार्गदर्शन करते, पण ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी कोणत्याही नव्या संधी निर्माण करू शकत नाही किंवा तुमच्या समस्या एखाद्या जादू सारख्या दूर करू शकत नाही.

ज्योतिषशास्त्र स्वतः मधले कच्चे दुवे ओळखून ते सुधारण्यासाठी वापरा, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी किंवा त्यांची जबाबदारी नाकारण्यासाठीची एक पळवाट म्हणून वापरू नका.

अत्यंत महत्त्वाच्या समस्या साठीच ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून घ्या. परमेश्वराने आपल्या कपाळी जसे भाग्य लिहून ठेवले आहे तसेच काही निश्चित असे कर्म ही नेमून दिले आहे, हे कर्म फळाची अपेक्षा न करता करत राहावे असा ईश्वरी संकेत आहे. सर्वतोपरी प्रयत्न केले तरी ही यश मिळाले नाही, आता सर्व मार्ग खुंटले अशा आणि अशा परिस्थितीतच मार्गदर्शना साठी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा.

ज्योतिषशास्त्र हे दिशादर्शक शास्त्र आहे, त्याच्या आहारी जाऊ नये, उठसूठ आज हा ज्योतिषी ,उद्या दुसरा असे करू नका, आपल्याला भेडसावणार्‍या बहुतांश समस्या आपल्याला वाटतात तितक्या गंभीर नसतात, बर्‍याच समस्या आपल्या प्रयत्नांच्या आवाक्यातल्याच असतात, विचारांच्या किंवा प्रयत्नांच्या दिशेत थोडासा जरी बदल केला किंवा काही वेळा तर फक्त थोडा अधिक काळ धीर धरला तरीही या समस्या सहजपणे सुटण्या सारख्या असतात तेव्हा अशा कोणत्याही  क्षुल्लक  कारणांसाठी ज्योतिषशास्त्राला वेठिस धरु नये.

ज्योतिषशास्त्राने केलेले मार्गदर्शन ही एक प्रकारची दैवी मदत आहे, योग्य कारणासाठीच आणि संयमी वापर केला तरच जेव्हा खरी गरज असेल तेव्हा ती आपल्याला साह्यकारी होईल.

शुभं भवतु

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *