परवा माझे उसगावकर मित्र श्री सुदामजी राऊत यांनी खूप जुनी आठवण काढली. श्री सुदामजी आणि मी २००८ मध्ये टीसीएस मध्ये एकत्र काम करत होतो. तेव्हा मी अगदी ‘नया नया’ मधुमेही असल्याने पथ्यपाणी जरा (जास्तच!) कड्ड्क चालले होते ( नया नया मुल्ला जरा जादाच अल्ला अल्ला करता है !) , तेव्हा माझ्या दुपारच्या जेवणात भरपूर सॅलड आणि चपातीचा चतकोर तुकडा इतकेच असे, चपातीत काही खास नाही पण माझे सॅलड मात्र फार प्रसिद्ध झाले होते, कारण मी ते वेगवेगळ्या प्रकाराने बनवायचो, चवीच्या बाबतीत तर ते छानच असायचे पण दिसण्याच्या बाबतीत ते अगदी कलात्मक असायचे. श्री सुदामजींनी त्या सॅलडची रेशीपी विचारली आणि त्या सार्या सार्या जुन्या आठवणीं पुन्हा एकदा जाग्या झाल्या.
आजही एक दिवसा आड असे ‘शाही सॅलड’ माझ्या जेवणात असतेच असते. वेळे अभावी सजावटी (डेकोरेशन) कडे फारसे लक्ष देता येत नाही पण चव अजून तश्शीच २००८ ची ! तेव्हा त्या सॅलड ला मी काही नाव दिले नाय पण आज आपल्या समोर सादर करताना काही तरी नाव असावे म्हणून – ‘नब्बे ९० वाले बाबा का सॅलड’ !
तर घ्या लिहून साहीत्य आणि कृती :
नब्बे ९० वाले बाबा का सॅलड !
साहित्य:
भाज्या:
१) (कोवळा) कोबी , स्वच्छ धुवून , उभा कापलेला.
२) सिमला मिर्ची – हिरवी, लाल , पिवळी उभी कापून
३) लहान टोमॅटॉ चौकोनी तुकडे (चकत्या नाय)
४) काकडी ( कोवळी, शक्यतो हिरव्या पाठीची , बाजारात बहुतांश पोपटी पाठीच्याच जास्त असतात पण हिरव्या गर्द पाठीची मस्त !)
५) ब्रोकोली – स्वच्छ धुवून , उभा कापलेला
६) लहानसा लहानसा कांदा , कमी तिखट, उभा कापून पाकळ्या, एक चकती ड्येकोरेशनला
७) हिरवे ऑलिव्ह ४- ५ नग , चकत्या करून घेणे
८) हिरव्या हलापीनो ( मेक्सीकन मिरची)च्या चकत्या ७-९८
फळे:
९) अर्धे सफरचंद (जरा कच्चे असेल असेच बघून घ्या) खूप बारीक फोडी करून घ्या
१०) डाळींबाचे दाणे – पाव वाटी
११) पेरु: अर्धा, बारीक तुकडे, बिया काढाव्यात
स्प्राऊट्स:
१२) उकडलेले मक्याचे दाणे – चार चमचे (मधुमेह वाल्यांनी अगदी कमी , ड्येकोरेशन साठीच घ्यावे)
१३) स्प्राऊट्स अर्धी वाटी ( मोड आलेली मटकी + हिरवा / लाल हरबरा + वाटाणा+ हिरवे मूग )
ड्रायफ्रुट्स:
१४) बदाम ४-५ लहान तुकडे करून , साली सकट
१५) अफगाणी मनुके ७-८
प्रोटीन एक्स्पेस:
१६) अमूल चीज क्यूब – १, अगदी बारीक तुकडे करून
१७) ताजे पनीर – ५० ग्रॅम – बारीक तुकडे करून
ड्रेसिंग:
१८) व्हाईट व्हिनेगर – २ मोठे चमचे
१९) मेयॉनिज सॉस – २ चमचे , मेयॉनीज मध्ये सॅच्य्रेटेड फॅट्स असतात आणि ९% कार्बस त्यामुळे हा कमीच घ्यावा
२०) मस्टर्ड सॉस – १ चमचा
२१) हिरवी मिर्ची + पुदीना चटनी १ चमचा
२२) अमेरिकन रँच ड्रेसींग अथावा इतर कोणतेही सॅलड ड्रेसिंग़
२३) दालचिनी पावडर
२४) चाट मसाला
२५) सुक्रालोज शुगर सबस्टीट्युट १ सॅचेट / चार दोन टॅबलेट्स ( मधुमेह नसेल तर साधी साखर)
२६) किंचीतसे मीठ
२७ ) एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल १ मोठा चमचा ( ऑलिव्ह ऑईल शक्य नसल्यास खोबरेल तेल !)
ज्यांना मधुमेह नाही त्यांच्या साठी:
२८) बीट – २-३ चकत्या
२९) ब्रेड क्रंब्ज – क्रुटॉन्स – ४
३०) तुपावर परतेले जिरा आलू चे अगदी लहान केलेल तुकडे – ५/६
३१) लाईट फ्राय केलेले मश्रुम्स
कृती
किती मालमसाला जमवला त्या हिशेबाने एक भांडे घ्या , त्यात वर दिलेले साहित्य घाला आणि ‘टॉस’ करा , म्हणजे भांडे वर खाली आपटा , हलवा चांगली उछलकूद करा , सगळे पदार्थ एकत्र असे मिसळले की , सादर करायच्या डिश अथवा बाऊल मध्ये हे मिश्रण काढून टेबला वर ठेवा !
मी पूर्वी टपरेवेअर च्या मोठ्या प्लॅस्टीक बाऊल च्या आतून तेलाचे बोट फिरवून त्यात हे मिश्रण भरत असे, नंतर हा बाऊल एका डिशवर पालथा करुन अलगद्पणे बाऊल वरचे वर उचलत असे, डिश मध्ये मस्त सॅलडची मूद बनते. बाऊल मध्ये मिश्रण भरताना , मुदी वर काय दिसले पाहीजे, साईडला काय असले पाहीजे , मुदीत चमचा खुपसला की काय बाहेर आले पाहीजे या सगळ्याचा विचार करून व्यवस्थित थर लावलेले असल्याने डिश मधल्या मुदी वर मस्त रंगीबेरंगी डेकोरेशन तैयार व्हायचे आणि लोक्स नुसते बघत राहायचे !
या सॅलड मध्ये सगळे रस आहेत : गोड, आंबट, खारट, तिखट , तुरट
या सॅलड मध्ये : कार्बस , प्रोटींस, फॅट्स योग्य प्रमाणात आहेत.
हिरव्या , लाल, पिवळ्या सर्व रंगाच्या भाज्या आहेत
व्हिनेगर , ऑलिव्हज, दालचीनी, ड्राय फ्रुट्स च्या माध्यमातून सर्व मिनेरल्स उपलब्ध आहेत,
असे एक जंगी सॅलड आणि हिरवागार व्हेज स्मूदी चा फुल्ल ग्लास रिचवला की झाले जेवण ! हाय काय आन नाय काय ..
झाले की राव , सॅलड तैयार , करा सुरवात …
सगळे सांगावे लागते ह्या लोकांना !
शुभं भवतु
tondala paani sutle sirrrrr
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी , असे सॅलड एकदा जरुर करुन पाहा , खूप हेल्दी आहे , आपण जर मांंसाहार करत असाल तर यात चिकन / पोर्क चे तुकडे वापरु शकता अथवा बॉईल्ड एग्ज.
सुहास गोखले