१९८७-८८-८९ हा माझ्या आयुष्यातला एक मंतरलेला काळ होता. शिक्षण पूर्ण करुन , स्वतंत्रपणे जगत होतो, नोकरी नविन होती, राहाण्यची जागा , मेस , पुण्याची (कुप्रसिद्ध) पी.एम.टी, आणि पहिल्यांदाच अनुभवत असलेला ‘पुणेरी’ पणा… सगळीच आव्हानें होती, पण त्या झगडण्यातही एक अलगसा मझा होता, दोस्त !
मी त्यावेळेला ज्योतिष शिकत होतो , अगदी नवशिका होतो, वेगवेगळ्या ज्योतिषांना भेटत होतो. पण या भेटीं ज्योतिषांची चेष्टा करायला , त्यांची परीक्षा घ्यायला नव्हत्या , माझा रोख अंधश्रद्धा निर्मुलन समिती सारखा मुळीच नव्हता. हे ज्योतिषी पत्रिका कसे बघतात, क्लायंट कसे हाताळतात, हे मला समजाऊन घ्यायचे होते , हे एक प्रकारचे प्रॅक्टीकल किंवा फिल्ड ट्रेनिंग आहे असेच मी समजत होतो.
आपल्य भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सर्वांनाच असते तशी मलाही होती, बहुतेकांचा भर ‘अमुक घटना कधी घडेल’ किंवा ‘अमुक परिस्थिती कधी सुधारेल / बदलेल’ अशा ‘इव्हेंट’ प्रेडिक्शन कडे असतो तसा माझाही त्याकाळी होता, खोटे कशाला बोला.
अनेक ज्योतिषी भेटले , सगळेच पुण्यातले असल्याने एक- दोन अपवाद वगळता सगळ्या ज्योतिषांत तो पुण्याचा कुप्रसिद्ध तुसडेपणा आणि माज ठासून भरलेला दिसला. बहुतांश ज्योतिषी ‘थातुर मातुर ‘ सांगणारे, ‘दोन्ही डगरीं’ वर हात ठेवणारे , ज्योतिषाच्या नावाखाली ‘उपाय – तोडग्यांचा’ बाजार मांडणारे निघाले. काही जण ‘बडा घर , पोकळ वासा’ निघाले. ‘उर्मट्पणा’ बहुतेकांत होता. काही जण कमालीचे गलिच्छ होते. ‘स्पष्टवक्ते’ पणाच्या नावाखाली ‘उद्दाम, शिवराळ आणि अश्लील’ भाषा वापरणारे ज्योतिषी तेव्हाही होतेच. दुसर्या ज्योतिषावर टीका तर जवळजवळ सगळेच करत होते , काही तर अगदी हीन पातळी वर जाऊन , कमरेखालची भाषा वापरत होते.
अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके (म्हणजे ३ पेक्षा कमी !) ज्योतिषी निघाले जे खरोखर अभ्यासु होते, शास्त्राशी प्रामाणिक होते , त्यांच्या कडे काही शास्त्रीय बैठक होती, विचार होते आणि महत्वाचे म्हणजे ‘सचोटी’ होती. बाकी सर्वच ‘फ्रॉड’ या कॅटेगोरीत मोडणारे होते हे कटू सत्य आहे!
दुर्दैवाने आज सुमारे २५ वर्षां नंतर, २०१६ मध्ये सुद्धा परिस्थीती तीच आहे !
त्यात आता ‘अर्ध्या हळकुंडाने’ पिवळे झालेल्या कच्च्या बच्च्या ‘के.पी.’ वाल्यांची भर पडली आहे. १९८७-८८ च्या काळात हे ‘के.पी.’ वाले फारसे नव्हते , पण नंतरच्या काळात हे ‘के.पी. वाल्यांचे पीक कॉग्रेस गवता सारखे झपाट्याने फोफावले. एखादे चोपडे वाचले, एखादा १०-१५ लेक्चर्स चा कोर्स केला किंवा एखादी ३ दिवसांची कार्यशाळा केली की झाला ‘के.पी.’ वाला तैयार , अरे हाय काय आन नाय काय !
‘इव्हेंट प्रेडीक्शन’चा अतिरेकी आणि चुकीचा हव्यास धरत या के.पी. वाल्यांनी सगळे शास्त्रच गुंडाळून ठेवले आहे , सगळ्या महत्वाच्या मुलभूत संकल्पनांना अक्षरश: ‘फाट्यावर मारले आहे’!
ज्योतिषाशास्त्रा च्या काही संकल्पनांशी त्यांनी फारकत घेतली असती तर ते एक वेळ चालले असते, पण इथे तर त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या आत्म्याचा चक्क खून पाडला आहे !
‘२ मिनिट्स’ मॅगी ने नव्या पिढीचे जसे आणि जितके नुकसान केले आहे त्याही पेक्षा जास्त आणि विदारक नुकसान या के.पी. ने आणि के.पी. वाल्यांनी करुन ठेवले आहे.
‘उपाय – तोडग्यांचा’ बाजार आता अधिक मोठा आणि किळसवाणा झाला आहे, त्यात वास्तु वाल्यांची भर!
टी.व्ही चॅनेल्स सुरु झाली आणि मग या फ्रॉड , भोंदूंना ऊत आला , पुढे फेसबुक सारख्या प्रभावी माध्यमाचा उदय झाला आणि आगीत तेल ओतल्या सारखे झाले.
१९८७-८८-८९ या काळात काही चांगले ज्योतिषीही भेटले , नाही असे नाही. त्यातल्याच एका ज्योतिषा बद्दल सांगणार आहे माझ्या नव्या लेखमालेतून ..
“पुन्हा ज्योतिषाची तर्हा… “
पुढच्याच आठवड्यात आपल्या समोर सादर करत आहे..
शुभं भवतु

नेहमी प्रमाणे उत्सुकता आहेच पुढे काय …?? वाचताना लेख संपूच नये असे वाटते .
श्री. स्वप्नीलजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Great…waiting for next article..
श्री. दीपकजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Sunder lekh ….
Sir dowsing varachi mahiti chhan aahe. Ajun tya varati lekh lihanar aahat ka?
Aani dowsing varati chagali konati book aahe. English madhe
Sagitlyas aapala aabhari rahin.
Baaki aapale lekh chhan.
श्री . उमेशजी ,*
अभिप्रया बद्दल धन्यवाद,
काही वर्षापूर्वी मी डाऊसिंग पेंड्युलम मध्ये बराच इटॅरेस्ट घेतला होता पण इतर व्यापामुळे मी त्याकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकलो नाही. पुस्तकांचे म्हणाल तर या विषयावर काही पुस्तके मी वाचली होती , वेळ काधून एकद्द ती माहीती आपल्याला देईन.
सुहास गोखले