मॉन्टी अथर्वशिर्ष म्हणताना !

भुरकाई आणि अक्काई (दोन मांजर्‍या आहेत घरी) दोघींची पिल्ले (मॉन्टी, मोहन, सोनी, हरणीं, रतनकुमार , शेरसिंह) आता मोठी झालीत , घरभर दंगा (आणि पसारा) करत नुसती हुंदडत असतात त्यातला ‘मॉन्टी” मोठा विचारवंत आहे , आध्यात्मिक आहे. रोजची गणपतीची पूजा असते , हा पहा मॉन्टी गणपती अथर्वशिर्ष म्हणताना !
(फटू च्या तांत्रिक बाबीं कडे दुर्लक्ष करा,  ‘तो’ क्षण  टिपायचा असतो  तेव्हा हातात असलेला कॅमेरा हाच सगळ्यात उत्तम कॅमेरा आणि डिफॉल्ट सेटींग हीच सगळ्यात चांगली सेटिंग्ज!
D5200 बाहेर  काढा , लेंस बद्ला , लाईट चेक करा , सेटिंग करा , ट्रायपॉड वर कॅमेरा माऊंट करा, अ‍ॅगल तपासा, कॉम्पोझीशन चा विचार करा , हे सगळे करत बसलो असतो तर मॅन्टी अथर्वशिर्ष संपवून खेळायला निघून गेला असता , मग कसला फटू न कसलं काय ?)

Similar Posts

7 Comments

  1. सुहास जी एकदम मस्त क्षण टिपलाय….खूपच छान..! मनी एकदम cute..

    1. श्री. स्वप्निलजी,

      धन्यवाद , मॉन्टी क्युट आहेअच पण त्याच्या पेक्षा शेरशिंग़ जास्त क्यूट आहे पण तो बेटा कधी सापडतच नाही सतत पळापळी करत असतो, एकदा त्याचाही फटू पोष्ट करतो.

      सुहास गोखले

  2. Jabrat alai ekdum..

    Tummchi post chotishi aste pan manala taza tavana karun jate…

    Baki baapa ani mau mastach

  3. तुम्ही पण मार्जारप्रेमी आहात तर .. माँटीची पोज भारी..आमच्याकडेही ३ मन्या ६ पिल्ले आणि येऊन जाऊन असलेली ३_४ मांजरे अशी पार्टी आहे..

    1. सौ. माधुरीताई,

      मांजर फार आवडते , अगदी लहान असल्यापसुन सतत मांजरांच्या गराड्यातच राहात आलोय.

      सुहास गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *