आपण काहीही खाल्ले की त्याचे पचन होते आणि साखर (ग्लुकोज) निर्माण होते ,
आपण नेमके काय खातो (आणि किती खातो !) यावर दोन गोष्टीं ठरतात:
१) रक्तातली साखर किती वाढणार ?
२) रक्तात जादाची साखर किती वेळात दाखल होणार ?
आपल्या आहारात कार्बस ( पिष्टमय पदार्थ) , प्रोटीन्स ( प्रथिने) आणि फॅट ( मेद युक्त पदार्थ) यांचा समावेश असतो , पण या प्रत्येक खाद्य प्रकारा मुळे रक्तात साखर किती , कशी आणि केव्हा तयार होते याची परिमाणें मात्र वेगवेगळी आहेत.
कार्बस: मधुमेह्यां साठी सगळ्यात धोकादयक ! कारण ९०% कार्बस चे साखरेत रुपांतर होते आणि अशी रुपांतरीत साखर रक्तात अवघ्या ३० मिनिट ते एक तासात दाखल होते ! आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण ही खूप वाढते !!
प्रोटीन्स: आपण खाल्लेल्या प्रोटीन्स पैकी ५०% प्रोटीन्स ची साखर होते आणि ही साखर हळू हळू रक्तात दाखल होते , साधारण दोन ते चार तासात. आणि रक्तातल्या साखरेची वाढ मर्यादेत असते.
फॅट्स: आपल्या खाल्लेल्या फॅट्स पैकी फक्त १०% फॅटस ची साखर होते, ही साखर अगदी हल्लू हल्लू म्हणजे पाच – सहा तासांनी आपल्या रक्तात दाखल होते, रक्तातल्या साखरेची वाढ अगदी किरकोळ असते!
सोबत दिलेल्या आलेखा वरून आपल्याला याची अधिक चांगली कल्पना येईल.
मधुमेह्याने असे काही खाल्ले पाहीजे की त्यामुळे:
अ) रक्तातली साखर प्रमाणा पेक्षा जास्त वाढता कामा नये
ब) रक्तातल्या साखरेची वाढ ही अगदी संथगतीने आणि प्रमाणात झाली पाहीजे.
वर दिलेल्या आलेखा वरून आपल्याला आता कल्पना आली असेल की मधुमेह्याने आपल्या आहारात कोणते घटक पदार्थ, किती प्रमाणात ठेवले पाहीजेत.
( माझ्या आधीच्या काही फेसबुक पोष्ट्स मध्ये मी ‘काय खातो?” याचे फटू टाकले होते ! काय काय होते त्यात , जरा तपासा उत्तर मिळून जाईल ! )
या बाबत अधिक विस्तृत लेख , जसा वेळ मिळेल तस लिहून आपल्या समोर सादर करतो .
शुभं भवतु
hallu hallu samjayala laglay bagha madhumehabaddal….
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले