प्रत्येक राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो, वागायची एक पध्दत असते, आता हेच बघा ना , एका इंटरव्हू साठी बरेच जण आलेत, त्यात सर्व राशींचे लोक असणारच पण ओळखता येतेय कोण कोणत्या राशीचा ते?
मेष: “साला काय घोळ घालताय, फटाफटा इंटरव्हू घेऊन मोकळे कराना एकदा”
वृषभ: “लागू दे पाहिजे तेवढा वेळ, पण ती चिकणी रिसेप्शनिष्ट आमच्या समोर राहिल असे बघा..”
मिथुन: “कॅन्टीन चा चहा बेक्कार पण त्या कॅंटीन वाल्या मामाची काय फिरकी घेतली म्हणुन सांगु”
कर्क: “ अरेरे, काय ही गर्दी, काय ही बेकारी, माझ्या पेक्षा त्या कोपर्यातल्या मुलाला मिळायला हवी ही नोकरी, बिच्चारा किती गरजु वाटतो”
सिंह: “खरे तर मी आलेलो असताना आणखी कोणाचा इंटरव्हू घ्यायची गरजच नाही ”
कन्या: “तिसर्यांदा तपासले, सगळी सर्टीफिकेटस् आणलीतना, माझा अर्ज नककी वाचला असेल ना त्यांनी?”
तुळ: “येईल, येईल योग्य वेळ येताच सगळे काही होईल, अहो मिस रिसेप्शनिष्ट, जरा ते मॅगेझिन देता का”
वृश्चिक: “साला सगळी वशिलेबाजी असणार, हंटर ने फोडुन काढले पाहिजे एकेकाला”
धनु: “युसलेस फेलोज, फार वेळ लावतात बुवा, आमच्या वेळेची काही किंमत, जाऊ दे ती ही माणसेच ना शेवटी”
मकर: “मी विमा पॉलीसीची ब्रोशर्स आणि फॉर्मस् आणायला पाहिजे होते, एक दोन मासे नक्की गळाला लागले असते”
कुंभ: “सार्क ने जे काही सांगीतले ते मंडुकोपनिषदात हजारो वर्षांपासुन आहे, पण त्याही पेक्षा चार्वाकाने तित्तरिय उपनिषदाच्या सातव्या खंडातल्या पाचव्या ऋचे वर जे भाष्य केले आहे ना…”
मीन: “माझे नशिबच फुटकं, इथे ही तेच होणार, सकाळी अंघोळीच्या वेळी नळाचे पाणी गेले तेव्हाच मला वाटले होते … ”
शुभं भवतु