शीण : संता बेडूक आणि बंता बेडूक गप्पा मारताहेत..
संता बेडूक: “साला लाईफ मध्ये काय थ्रिलच राह्यला नाय….”
बंता बेडूक: “मग ते शास्त्रीबुवाला विचार नी, ते सगले सांगते बघ , तुझा काय होनार, कसा होणार , चोकस मंदि , तेच्या कडे जाव नी”
संता बेडूक: ” बाला, का बोल्ल्ला तू , बराबर बात केला तू , मियाक आता जातय बघ तेच्याकले”
शीण : संता बेडूक शास्त्रीबुवां समोर..
संता बेडूक: “ते तुमी सगला सांगून सोडते म्हणतात की वो , ते आमचबी बघा ना ते काय ते ज्योतिष म्हंतो मी”
शास्त्रीबुवा: “वा! चतुर्थात कर्क, जलाशया शेजारी जन्म, वास्तव्य पण जलाशया शेजारी”
संता बेडूक: ” ते काय सांगून राहयला वो. आमी तिथच असतो की त्या डबक्यातच , जलाशयच की”
शास्त्रीबुवा: “शुक्र बिघडलाय, दुसर्या घरात, बेसुर आवाज..”
संता बेडूक: “डराव”
शास्त्रीबुवा: “राहू केतु पण नाराज , सापांपासुन भिती”
संता बेडूक: “डराव डराव ”
शास्त्रीबुवा: “व्ययात गुरू , आध्यात्म , ध्यानधारणा, संन्यास , समाधी…….”
संता बेडूक: “खिक् , ते काय नविन नाय आमाला जी, ते तुम्ही हायबरनेशन का काय म्हणते ना तेच आमचं समाधी बघा, दरवर्षी असतेच बघ आमचं ते ”
शास्त्रीबुवा: “झालेच तर मंगळ……”
संता बेडूक: ” ते राहदे , सग्ला साला माहिती असलेलाच बोल्ते तुमी, जरा पुढचे काय तां बोल नी..”
शास्त्रीबुवा: “काय जाणून घ्यायचय तुला?”
संता बेडूक: “लई येकटे पना म्हाराज, लै कंटाळा आलाय, लगिन कधी होणार? अरेंज्ड म्यारेज का आपल लव्ह होणार?”
शास्त्रीबुवा: “लौकरच एक संदर तरूणी तुझ्या आयुष्यात येणार, ती तुला उचलणार, स्पर्श करणार…”
संता बेडूक: ” व्वा वा, हि घ्या डबल दक्षिणा, आता सांगा , कधी ? कुठे ?”
शास्त्रीबुवा: ” अगदि लौकरच, जवळच्याच सायन्स कॉलेज मध्ये, झूलॉजी च्या लॅब मध्ये”
शुभं भवतु