दत्तदर्शनला जायाचे जायाचे

वाचकाने कळवलेला एक अनुभव…

मी आत्ता पर्यंत ५० च्या आसपास केस स्ट्डीज या ब्लॉग वर प्रकाशीत केल्या आहेत , अनेक ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना त्या आवडल्या आहेत , अनेकांना त्यातून काही नवे शिकायला मिळाले असे समजते. अशाच एका अभ्यासकाने मी वापरत असलेले होरारी तंत्र वापरुन त्याच्या समोर असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर यशस्वी रित्या मिळवले , तो अनुभव मला कळवला. आजचा लेख त्या अनुभवा वर आहे.

वाचक लिहतो:

……….

 श्री सुहास गोखले जी,

मी सध्या ज्योतिष शिकत आहे,तुमचे लेख मी वाचले. हजारो नियम सांगण्यापेक्षा एक केस स्टडी सोडवून दाखवलेली उपयोगी पडते. त्यामुळे तुमचे आभार.
तुमच्या लेखावरून मी एक प्रश्न सोडवला व तो अचूक आला. मी कसा सोडवला हे सांगतो त्यात अजून काही मार्गदर्शन केले तर आभारी राहीन.

माझ्या मित्राने नवी कार घेतली व मला म्हणाला मी शनिवारी दत्त दर्शनासाठी औदुंबरला जाणार आहे तू येणार का. मला शनिवारी एक काम होत त्यामुळे मी त्याला नाही म्हंटल. पण माझं शनिवारीच काम पुढे ढकलल तर चालणार होत हे मला नंतर कळालं. म्हणून मी माझ्या मित्राला फोन करून विचारलं कि कधी निघायचं आहे. तर तो म्हणाला गाडीचा इन्शुरन्स नाही मिळाला. मी तुम्हाला निघायचं असेल तर फोन करतो.

आता याचा फोन नाही आला तर माझं काम उगीच पुढं ढकललं जाईल म्हणून आमची भेट होईल का हा प्रश्न मला पडला व मी मोबाइलला अँप मध्ये कुंडली काढली दिनांक २१ सप्टेंबर २०१८ सकाळी  ११ वाजून ८ मिनिटे  पुणे.
त्यानुसार मी म्हणजे लग्न वृश्चिक त्यात ग्रह नाहीत म्हणून माझे प्रतिनिधित्व मंगळ करेल व चंद्र नैसर्गिक कारक.
मित्र म्हणजे लाभ स्थान त्यात रवी बुध , लाभेश बुध.

मंगळ व चंद्र तृतीयात मंगळ ८अंश तर चंद्र २० अंश आणि रवी बुध लाभात दोघे ४ अंश. म्हणजे रवी किंव्हा बुध हे अजून ४ अंश गेल्याशिवाय त्यांच्यात व मंगळात नवपंचम नाही होणार. आणि ते या शनिवारी शक्य नव्हते अजून मला एक वाटले कि इच्छापूर्ती चा म्हणजे लाभाचा स्वामी बुध अस्त म्हणून त्याची माझी भेट नाही होणार. व तसेच घडले..हे सर्व तुमच्या मुळे सोडवू शकलो .. कृपया यात अजून काही मार्गदर्शन करू शकलात तर आभारी राहीन.
……….

आपण या पत्रिकेचा (म्हणजेच त्यातल्या प्रश्नाचा ) शास्त्रशुद्ध विचार करू,  जातकाच्या प्रश्नाचा निर्णय आधीच लागलेला आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे नाही तर पत्रिकेच्या माध्यमातून हे उत्तर कसे मिळते याचा अभ्यास करायचा आहे थोडक्यात हा एक ‘पोस्ट मॉर्टेम’ अभ्यास आहे.

वाचकाने ही पत्रिका सोडवताना पाश्चात्त्य होरारीचे तंत्र वापरलेले दिसते पण पत्रिका मात्र निरयन , क्षेत्र पद्धतीची वापरलेली आहे,  पाश्चात्त्य तंत्राला त्यांच्या पद्धतीचीच म्हणजे सायन भावचलित कुंडली वापरावी लागते. त्यामुळे आपण जातकाने ज्या तपशीलाची कुंडली मांडली तोच तपशील घेऊन फक्त सायन प्लॅसीडस ( भाव चलित) कुंडली तयार करुन हा प्रश्न सोडवू .

प्रश्नकुंडलीचा तपशील:

दिनांक: २१ सप्टेंबर २०१८

वेळ: ११:०८ सकाळी

स्थळ: पुणे

ट्रॉपीकल, प्लॅसिडस, मीन नोड्स

प्रश्न:  माझी आणि मित्राची भेट होईल का?

या पत्रिकेत जन्मलग्न धनू  ३:०८ अंशा वर आहे ,  अगदी कट्टाकट्टी ३ रा अंश ओलांडला आहे, त्यामुळे अजुनही हा अर्ली असेंडंट असेच म्हणता येईल. असे जेव्हा असते तेव्हा प्रश्न जरा वेळेच्या आधीच विचारला गेला आहे असा तर्क करता येतो. प्रश्ना संदर्भात अजून काही घटनां घडणार आहेत असेही यातून सूचित होऊ शकते.

चंद्र कुंभेत १४:३९ अंशावर आहे, हा चंद्र कुंभ रास ओलांडे पर्यंत गुरु शी केंद्र योग करणार असल्याने चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स नाही.

शनी द्वितीय स्थानात असल्याने त्या बद्दल काळजी नाही.

जातक नेहमीच लग्न स्थानावरुन पाहतात, इथे धनु लग्न असल्याने  गुरु जातकाचे प्रतिनिधित्व करेल त्याच बरोबर चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी आहेच. लग्नात कोणताही ग्रह नसल्याने भावेश गुरु आणि चंद्र हे दोघे मिळून जातकाचे प्रतिनिधित्व करतील.

जातकाचा मित्र हा लाभ (११) स्थानावरुन पहावयाचा. लाभ स्थानावर शुक्राची तूळ रास आहे. लाभेश शुक्र लाभातच आहे, लाभात इतर कोणी ग्रह नाहीत, म्हणजे एकटा शुक्र या जातकाच्या मित्राचे प्रतिनिधित्व करेल.

आता जातक आणि मित्र यांच्यात भेट होणार असेल तर जातकाचे प्रतिनिधी ( गुरु व चंद्र) आणि मित्राचा प्रतिनिधी (शुक्र) यांच्यात कोणता तरी योग होणे आवश्यक आहे.

प्रथम जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी चंद्र त्याचा विचार करु, चंद्र कुंभेत १४:३९ अंशावर आहे, त्याचा ०७ वृश्चिक ०९ अंशावरील शुक्राशी (मित्र) केंद्र योग होऊन गेला आहे.

जातकाचा दुसरा प्रतिनिधी गुरु आणि शुक्र यांच्यात योग होणार आहे का?

जातकाचा दुसरा प्रतिनिधी गुरु  वृश्चिक २०:१९ आणि ०७ वृश्चिक ०९ अंशावरील शुक्र हे दोघे ही एकाच म्हणजे वृश्चिक राशीत असल्याने यांच्यात युती योग होऊ शकतो, शुक्राची साधारण गती ५९ आर्क मिनिट / दिवस तर गुरुची साधारण गती ४ आर्क मिनिट / दिवस  असते म्हणजे शुक्र हा गुरु पेक्षा खूपच जलद गतीचा ग्रह असल्याने या दोघां मधले अवघे १३ अंशाचे अंतर कापायाला शुक्राला असा कितीसा वेळ लागेल ? साधारण चौदा/पंधरा दिवस ! शुक्र जलद गतीने गुरु ला गाठेल तेव्हा गुरु त्याचा सध्याच्या स्थाना पासून अवघा  एक अंश पुढे सरकलेला असेल, त्यामुळे शुक्र गुरुला गाठणार , युती होणार म्हणजे जातकाची आणि मित्राची भेट होणार असे समजायचे का?

एक लक्षात घ्या  ‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते !’

कागदावर कितीही आश्वासक वाटला , तर्काला पटला तरी असा ग्रहयोग खरोखरच होणार आहे का हे एफेमेरीज पाहून खात्री करुन घेतल्या कोणतेही अनुमान काढू नये.

प्रश्न विचारल्या तारखे ( २१ सप्टेंबर २०१८) पासुन पुढच्या काही कालावधी साठीचे एफेमेरीज आपल्या समोर आहे , काय दिसते त्यात?

०७ वृश्चिक ०९ अंशावरील शुक्र  गुरु ला गाठायला निघाला खरा पण अवघे  ३ अंश पुढे येऊन तो १०:५० वृश्चीकेवर वक्री होणार आहे ! इतकेच नव्हे तर वक्री अवस्थेत तो वृश्चिकेतून मागे सरकत चक्क एक राशी मागे म्हणजे तूळेत येईल आणि वक्री गतीने तूळेत च मागे मागे सरकत राहील, हे सर्व होई पर्यंत गुरु जो वृश्चिकेत २०:१९ अंशावर होता तो आपल्या मंद गतीने पुढे पुढे सरकत वृश्चिक रास ओलांडूण धनेत जाईल आणि तेव्हा आपला शुक्र अजूनही वक्री अवस्थेत तूळेत २६:२६ अंशावर असेल ! म्हणजे हे ‘ससा – कासवाच्या शर्यती’ सारखे झाले म्हणायचे ! होरारीत अपेक्षीत असलेला योग , त्या योगातले ग्रह आपापल्या राशीत असतानाच व्हावे लागतात, इथे शुक्र – गुरु युती योग होण्याच्या आधीच गुरु राशी बदलत आहे त्यामुळे वरकरणी सहज होणार असे वाटत असलेला शुक्र – गुरु युती योग होणार नाही.

जातकाचा प्रतिनिधी (गुरु आणि चंद्र)  आणि मित्राचा प्रतिनिधी (बुध आणि शुक्र ) यांच्यात योग होत नाही त्यामुळे जातकाची आणि मित्राची भेट होणार नाही.

हेच जातकाच्या प्रश्नाचे उत्तर !

प्रश्नकुंडली रॅडीकल असली की ती कमालीची बोलकी असते, ती विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तर देतेच शिवाय प्रश्ना संदर्भातल्या , प्रश्नात गुंतलेल्या व्यक्तींच्या संदर्भातल्या , घडून गेलेल्या / घडू शकणार्‍या अनेक घटनांचा खुलासा पण करते. आता हेच पहा ना,

जातकाने लिहले आहे, त्याच्या मित्राने त्याला “ मी शनिवारी दत्त दर्शनासाठी औदुंबरला जाणार आहे तू येणार का?” असे विचारले होते पण हे झाले नाही, दत्त दर्शन म्हणजे तिर्थ यात्रा जी नवम भावा (९) वरुन पाहवयाची, जातकाचा मित्र लाभ (११) स्थान त्याचे नवमस्थान म्हणजे सप्तम स्थान  (७) , सप्तमा वर बुधाची कन्या राशी म्हणजे तिर्थ यात्रा बुधा कडे , जातकाच्या मित्राचा प्रतिनिधी शुक्र , ह्या शुक्रात आणि बुधात कोणताही योग नाही म्हणजे तिर्थ यात्रा घडली नाही ! जातकाच्या दृष्टीने विचार केला तर जातकाचे नवम (९) स्थान जातकाची तिर्थ यात्रा दाखवेल, नवम भावा (९) वर सिंह रास आहे, सिंहेचा स्वामी रवी (तिर्थ यात्रा) आणि गुरु (जातक) यांच्यातही कोणताही योग होत नाही त्यामुळे जातकाची तिर्थयात्रा झाली नाही.

जातकाच्या तिर्थयात्रेचा प्रतिनिधी आणि जातकाच्या मित्राच्या तिर्थयात्रेचा प्रतिनिधी अनुक्रमे रवी व बुध कन्येत २८ अंशावर आहेत, म्हणजे बुध अस्तंगत आहे ! दोघेही कन्येच्या शेवटच्या अंशावर असल्याने कन्या राशीत असे पर्यंत ते इतर कोणत्याही ग्रहाशी योग करणार नाहीत. तिर्थयात्रेचे दोन्ही प्रतिनिधी असे एकाच अंशावर सापडणे याला योगायोग म्हणता येईल का?

या नियोजित तिर्थयात्रा धडू शकली नाही याचे एक कारण होते ते म्हणजे जातकाच्या मित्राच्या गाडी चे विम्याचे कागदपत्रे तयार नव्हती. आता विमा हा नेहमीच अष्टम  ( ८) स्थानावरुन पहावयाचा, गाडी मित्राची म्हणजे हे लाभ स्थानाचे(११)  अष्टम स्थान (८)  असेल, ते पत्रिकेतले षष्ठम (६) स्थान, इथे शुक्राची वृषभ राशी आहे , म्हणजे शुक्र विमा दाखवेल , इथे  जातकाचा मित्र आणि विमा यांचे प्रतिनिधी एकच म्हणजे शुक्र आहे, म्हणुन विमा, कागदपत्रे यांचा नैसर्गिक प्रतिनिधी ‘बुध’ आपण विचारात घेऊ , हा बुध स्वत: अस्तंगत अवस्थेत कन्येच्या शेवटच्या २ अंशात आहे  ,  त्याचा आणि शुक्राचा कोणताही योग होणार नाही, सबब कागदपत्रे मिळाली नाही. आपण आधी बघितले आहे की हा शुक्र अगदी लगेचच वक्री होणार आहे आणि दरम्यान बुध त्याची सध्याची कन्या राशी ओलांडून तुळेत आणि नंतर वृश्चिकेत येईल तेव्हा आधीपासुनच वक्री अवस्थेत असलेल्या शुक्राशी त्याची युती होणार आणि विम्याचे कागदपत्र मिळणार पण ते भविष्यात सध्या कागदपत्रे नाही , प्रवास नाही म्हणून तिर्थ यात्रा नाही !

जातकाने प्रश्न विचारला त्या आधीच जातकाचा आणि त्याच्या मित्राचा वार्तालाप झाला . जातकाचे तृतीय स्थान (३) संदेश, मेसेज, संवाद दाखवेल , इथे शनीची कुंभ राशी आहे, शनी (जातकाचा संवाद) आणि शुक्र (जातकाचा मित्र) यांच्यात नुकताच लाभ योग होऊन गेला आहे. जातकाचा प्रतिनिधी चंद्र आणि मित्राचा प्रतिनिधी शुक्र यांच्यातही केंद्र होऊन गेला आहे.

जातकाचा प्रतिनिधी गुरु आणि नेपच्यून नवपंचम होऊन गेला आहे,  काम की तिर्थयात्रा असा जो संभ्रम जातकाच्या मनात उत्पन्न झाला होता त्याचा हा दाखला.

शुभं भवतु

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *