अशी असावी ग्राहक सेवा !

२०१४ मध्ये हैद्राबादच्या ‘डेक्कन पेन’ कंपनी कडून एक स्पेश्यल हँड्मेड फाऊंटन पेन मागवले. ती कंपनी अशी पेन्स तीन मॉडेल्स मध्ये विकत होती , मी त्यातले मधेल मॉडेल निवडले. खरे तर मला त्यांचे टॉप चे मॉडेल घ्यायचे होते पण बजेट नव्हते. मी फोन करून ऑर्डर नोंदवली , पेन काळ्या रंगात आणि निब कसे हवे इ. सांगीतले. नेट बँकिंग ने पेमेंट केले. यथावकाश पेन कुरीयर मार्फत माझ्या पर्यंत पोहोचले , मी पेन वापरायला सुरवात केली पण लगेचच लक्षात आले की ह्या पेन मधली शाई गळत आहे आणि पेन चा शाईचा कंपार्ट्मेंट उघडणे सहजासहजी शक्य नव्हते , जबरदस्त ताकद वापरावी लागायची इतकी की काही वेळा तर चक्क ‘पक्कड’ वापरुन तो उघडावा लागत होता, अर्थात हे मला चालण्या सारखे नव्हते! मी त्या कंपनीशी संपर्क साधला , पेन मधल्या समस्या सांगीतल्या , हा उत्पादनातला दोष असल्याने त्यांनी पेन बदलून द्यावा अशी मागणी केली. मी पैसे परत माहीतले नाही कारण बाकी पेन चांगले होते , डौलदार होते , निब उत्तम होते. पण उत्पादनांतल्या या त्रुटींमुळे मला ते वापरता येत नव्हते इतकेच.  त्यांनी अगदी खास हैदराबादी ढंगात माझी माफी मागीतली आणि दुसरे रिप्लेसमेंट पेन पाठवून देण्याचे कबूल केले. मला समाधान वाटले.

पण त्या नंतर पंधरा दिवस झाले बदली पेनाचा काही पत्ता नाही, मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला , सध्या ‘रॉ स्टॉक’  च्या समस्या आहेत पण काळजी करुन नका तुमचे बदली पेन लौकरच पाठवत आहोत असे आश्वासन मिळाले. पण तरीही काही झाले नाही, आता महिना लोटला पेन आले नाही ते नाहीच. पुन्हा एकदा संपर्क साधला , तीच कहाणी , तेच उत्तर. मी निराश झालो, जाऊ दे आपले पैसे वाया गेले असे समजून मी त्या कंपनीचा आणि पेनाचा नाद सोडून दिला. त्यानंतर आणखी वीस एक दिवस गेले आणि एके दिवशी कुरियर मार्फत एक लहानसे पार्सल मला मिळाले , हे त्याच हैद्राबाद च्या कंपनी ने पाठवले होते, उघडून पाहीले तर काय , आत चकाकणारे नवे पेन होते पण आश्चर्य पुढेच होते! हे पेन मी मागवल्या पेन सारखे नव्हते त्या पेक्षा डबल किंमतीचे , टॉप चे मॉडेल होते (जे मी बजेट अभावी खरेदी करू शकलो नव्हतो). सोबत एक पत्र होते त्यात लिहले होते:

“आमच्या उत्पादनातल्या त्रुटीं मुळे आपल्याला जो मन:स्ताप झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सहसा असे होत नाही पण आपल्याला जो असमाधानकारक अनुभव आला त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. आम्ही तुम्हाला रिप्लेसमेंट पेन द्यायचे कबूल केले होते. आपले पहिले पेन काळ्या रंगाचे होते तसेच पेन आपल्याला पाठवायचे होते पण दुर्दैवाने काळ्या रंगाचा ‘रॉ स्टॉक’ आमच्या कडे शिल्लक नव्हता , दुसर्‍या रंगाचा स्टॉक होता पण त्या रंगातले पेन आपल्याला पाठवणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही , काळ्या रंगाचा स्टॉक जो जर्मनी मधून येतो तो वेळेत उपलब्ध झाला नाही इतकेच नव्हे तर तो केव्हा उपलब्ध होईल याचीही कोणती खात्री नाही . अशा स्थितीत आम्ही काही काळ वाट पाहिली पण त्याहून जास्त काळ आपल्याला ताटकळत ठेवणे आम्हाला बरे वाटले नाही. आम्ही आपले पैसे परत करून मोकळे होऊ शकलो असतो पण ज्या विश्वासाने आपण आमचे पेन खरेदी केले होते त्या विश्वासाला आम्ही लायक ठरलो नाही ही खंत कायमची लागून राहीली असती. शेवटी आम्ही आपल्याला आवडणार्‍या काळया रंगातलेच पण आमच्या टॉपच्या रेंज मधले पेन पाठवायचे ठरवले , हे पेन आपण आधी मागवलेल्या पेन पेक्षा किंमती आणि अधीक चांगले आहे. आपल्याला हे पेन नक्कीच आवडेल असा आम्हाला विश्वास वाटतो. हे पेन पाठवताना आम्ही वारंवार खात्री करुन घेतली आहे की ते तुम्हाला वर्षानुवर्षे बिनतक्रार सेवा देईल. आपल्याला या अपग्रेड साठी कोणतेही जादाचे पैसे द्यावे लागणार नाहीत. आमची ही प्रेमाची भेट स्विकारुन आम्हाला उपकृत करावे आणि आमच्या वरचा लोभ कायम ठेवावा ही विनंती”

ग्राहकांना हातोहात फसवणार्‍या कंपन्या / व्यापारी आपल्याला हरघडी , पावलापावला दिसतात पण असा सुखद अनुभव क्वचितच येतो नाही का? जी कंपनी आपल्या उत्पादनाच्या दर्जा कडे आणि ग्राहकांच्या समाधानाच्या बाबतीत इतकी जागरुक असते आणि वेळ प्रसंगी नुकसान झाले तरी चालेल पण ग्राहकांना उत्तम सेवा पुरवली पाहीजे अशा पद्धतीने काम करते ती नक्कीच मोठी प्रगती करते. डेक्कन पेन त्याला अपवाद राहणार नाही.

(हे पेन अजुनही माझ्या कडे आहे , पण सध्या ते माझा मुलगा वापरतो, त्याला ते इतके आवडले की त्याने ते चक्क हातातून हिसकावून घेतले.  मुलगा आता पुण्यात असल्याने त्याचा फटू  उपलब्ध नाही  , म्हणून त्या ऐवजी इंटरनेट च्या माध्यमातून मिळवलेला त्याच पेनाचा (हिरव्या रंगातले)  फटू  इथे दिला आहे )

शुभं भवतु

 

 

Similar Posts

  • |

    A Great Astrologer

    .                          .eBay – उसगाव वरुन मी आयव्ही एम गोल्ड्स्टीन जेकबसन या पाश्चात्य ज्योतिर्विदे ने लिहलेल्या ग्रथांचा एक संच स्वस्तात विकत घेतला होता, (ग्रंथसंग्रह एका ज्योतिर्विदेचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजिवांनी त्याला eBay दाखवले ! देवा त्याला क्षमा कर आणि असेच लाखमोलाच्या…

  • |

    उपाय – तोडगे – २

    जप , पोथी याबद्दल आपण पाहीले आता पाहू या इतर काही लोकप्रिय  उपाय / तोडगे जप / पोथी पेक्षाही जास्त लोकप्रिय असे काही उपाय / तोडगे आहेत , हे  निरुपद्रवी आणि कमी खर्चाचे असतात. बर्‍याच वेळा हे तोडगे  ‘लाल किताब’ नामक…

  • |

    रक्तातली साखर !

    आपण काहीही खाल्ले की त्याचे पचन होते आणि साखर (ग्लुकोज) निर्माण होते , आपण नेमके काय खातो (आणि किती खातो !) यावर दोन गोष्टीं ठरतात: १) रक्तातली साखर किती वाढणार  ? २) रक्तात जादाची साखर किती वेळात दाखल होणार ? आपल्या…

  • |

    माझी व्यावसायीक नीतीमुल्यें

    माझी व्यावसायीक नीती मुल्यें जातकाच्या सामाजीक प्रतिष्ठेचा, आत्म सन्मानाचा, भाव भावनांचा,धार्मीक समजुतींचा , श्रध्दास्थानांचा, विचारसरणीचा, चालीरितींचा,  आर्थीक परिस्थितीचा, शैक्षणिक पातळीचा सर्वातोपरी आदर राखुन, आत्मियतेने, जातकाच्या हिताचाच विचार करुन, सर्वात्तम अशीच सेवा पुरवेन. जातकाने पुरवलेली सर्व माहीती, जातकाशी झालेला संवाद, जातकाला दिलेले…

  • |

    Evangeline Smith Adams – 7

    “मी का म्हणून माफी मागायची? उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यात घालवली आहे. मला शिक्षा झाली तरी बेहत्तर पण मी माघार घेणार नाही “ “जशी आपली मर्जी” या वेळेला माघार नाही, हा खटला लढवायचा आणि जिंकायचाच असा ठाम निर्धार बाईं नी…

  • |

    ज्युवेल थीफ ! (भाग – १)

    खास लोकाग्रहास्तव आणखी एक केस स्ट्डी ! २० एप्रिल २०१५. संध्याकाळचे सहा – सव्वा सहा वाजले वाजले असतील, त्या दिवशीची संध्याकाळची एकच अपॉईंटमेंट नुकतीच संपली होती. मी आपली दुष्काळी कामें म्हणजेच डेटा बेस अपडेट करणे, हँड रिटन नोटस चे स्कॅनिंग करणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *