भारतातल्या कोणत्याही गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे जागोजागी दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल तर तो अशा पद्धतीनेही उभा करता येईलच की, नमुन्या दाखल हे दोन पुतळे पहा …
वरच्या चित्रात आहे तो, नेल्सन मंडेलांचा दक्षिण आफ्रिकेतला हा पुतळा…
आणि हा रुमानियाचा राष्ट्रकवी मिहाई एमीनेस्कू चा पुतळा ..

आणि हे असेच अप्रतिम शिल्प ..

असे कलात्मक पुतळे ..स्मृती स्थळे आपल्या कडेही निर्माण व्हायला हवीत असे वाटत नाही का? वल्लभ भाई पटेल, शिवाजी महाराजांचे समुद्रातले स्मारक यावर अब्जाव्धी रुपये खर्च करण्या पेक्षा असे काही कलात्मक स्मारक तयार केले तर जास्त संस्मरणीय नाही का होणार ?
शुभं भवतु
