ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी मनप्रित आणि पद्मराजन श्रीकांत सरां समोर हजर झाले. सुरवातीच्या ख्याली-खुषालीच्या एक्स्चेंजेस झाल्या नंतर , श्रीकांतसरांनी एकदम मुद्दयाला हात घातला.
या लेख मालीकेतले आधीचे भाग इथे वाचा…
निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – २
निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १
“बॅक टू बिझनेस मनप्रित, आपण सेजल च्या समस्ये बद्दल बोलू … काय आहे सेजल ची समस्या ?”
मनप्रितने आपल्या हातातल्या नोट्स वर एक नजर टाकली..
“सर , या वर्षी आपण बेंगलोर युनिट साठी ४४१ ट्रेनीज रिक्रूट केले होते, त्यातले ३५७ प्रत्यक्षात जॉईन झाले. या सगळ्या ट्रेनीजना जुलै ते ऑगष्ट ह्या काळात बेसीक इंडक्शन ट्रेनिंग दिले गेले आणि नंतर आपल्या कडे चालू असलेल्या आणि पाईप लाइन मध्ये असलेल्या सर्व प्रोजेक्टस च्या मॅनपॉवर रिक्वायर्मेंट नुसार आपण या ट्रेनीज ना ग्रुप्स अॅलॉट केले. ग्रुप अॅलॉट करताना ट्रेनीचे इनीशीअल अॅसेसमेंट , इंडिव्हिड्युअल अॅपटीट्यूड , टेक्निकल कॉम्पीटन्सी हे घटक विचारात घेतले गेले होतेच त्याच बरोबरच डेमॉग्राफीक बॅलन्स, मेल – फिमेल रेश्यो इ. ची मार्गदर्शक तत्वे पण व्यवस्थित फॉलो केली होती”
“पद्मराजनच्या ग्रुप मध्ये त्यातले ५० ट्रेनीज आहेत , या ट्रेनीजना आपण सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महीन्याचे प्रोजेक्ट स्पेसीफीक ट्रेनिंग दिले आहे . डिसेंबर पासुन सर्व ट्रेनीज प्रोजेक्ट वर काम करत आहेत. बारिंग कपल ऑफ ऑड केसीस बाकी सर्व ट्रेनीज चा परफॉर्मंस चांगला आहे.”
पद्मराजन कडे एक कटाक्ष टाकत , मनप्रित म्हणाली…
“सेजल याच ग्रुप मधली. ती माझ्याकडे जानेवारी एंड ला , टु बी स्पेसिफीक २३ जानेवारीला तक्रार घेऊन आली होती. मला वाटते त्या आधी तिने हीच तक्रार पद्मराजन कडे केली होती. अॅम आय करेक्ट पद्मराजन ?”
पद्मराजन एक आंवढा गिळत बोलला..
“येस , सेजल माझ्या कडे जानेवारी फर्स्ट विक मध्ये आली होती…”
श्रीकांतसर पद्मराजन कडे रोखून पाहू लागले ..
“सॉरी सर , मला ती कम्ल्पेंट तितकी सिरियस वाटली नाही..”
“ईट्स ओ.के. .. लेट अस नॉट इंडल्ज इन टू पास्ट …”
आता मनप्रित कडे बघत श्रीकांत सर म्हणाले ..
“येस मनप्रित , काय म्हणत होती सेजल ?”
“टू बी फ्रँक सर , सेजल ची तक्रार मलाही जराशी चाईल्डीश , इम्मॅच्युअर वाटली … तिची तक्रार एका विषीष्ठ व्यक्ती बद्दल होती.. ‘प्रियदर्शनी पिल्ले’ या तिच्या ग्रुप मधल्या ट्रेनी इंजिनियर विरुद्ध होती. पण नंतर लक्षात आले की हा मामला ‘सेजल व्हर्सेस प्रियदर्शनी असा नाही, तर ही ‘एक विरुद्ध अनेक’ अशा तक्रार आहे, तक्रार ग्रुप मधल्या सगळ्यांचीच होती, सेजल फक्त सगळ्या ग्रुपची प्रतिनिधी म्हणून आली होती….”
“ही प्रियदर्शनी म्हणे सतत दुसर्याला नावे ठेवत असते , अगदी सतत समोरच्या व्यक्तीत काही ना काही दोष काढत असते.. कधी कपड्याच्या चॉईस वरुन, कधी मॅचीग वरुन, कधी एखाद्या बिहेविअरल अस्पेक्ट वरुन एक ना दोन, कामाच्या संदर्भातल्या टेक्निकल मॅटर्स बद्दल तर काही बोलायलाच नको..”
“चूका काढून काढून तिने सगळ्यांना त्राही भगवान करुन सोडले आहे. भिक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था सगळ्यांची झाली. सेजलने स्वत: आणि ग्रुप मधल्या इतरांनीही प्रियदर्शनीला अनेक वेळा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सांगीतले / समजावले , आपली नाराजी सक्त शब्दात व्यक्त केली … काही वेळा चक्क भांडणे झाली , पण प्रियदर्शनी वर त्याचा काहीच असर पडला नाही…”
“देन व्हॉट नेक्स्ट..”
“तिचे चुका काढणे चालूच राहीले .. मग प्रथम पद्मराजन कडे आणि नंतर माझ्या कडे तक्रार करण्यात आली.. मी..”
मनप्रितला थांबवत श्रीकांत सर म्हणाले ..
“त्याने ही काही उपयोग झाला नाही म्हणुन सेजलला शेवटी माझ्याकडे तक्रार घेऊन यावे लागले..”
“सॉरी सर आमच्या ओव्हर साइट मुळे आपल्याला ह्या बाबतीत पर्सनली लक्ष घालावे लागते आहे ..”
पद्मराजन आणि मनप्रित दोघेही एकदमच बोलले.
“मनप्रित, पद्मराजन … तुम्ही प्रियदर्शनीशी या बाबतीत बोललात ?”
“येस सर “
पद्मराजन म्हणाला ..
“मी प्रियदर्शनीला तिच्या वागण्या मुळे सगळा ग्रुप किती डिस्टर्बड झाला आहे हे समजाऊन सांगीतले तसेच बिहेविअर बदलण्या बाबत सुचना कम वॉर्निंग दिली होती ”
“प्रियदर्शनी चा रिसपॉन्स काय होता”
“तिला हे आधी पासुनच माहीती होते , वागणूक सुधारायचा प्रयत्न करेन असे प्रॉमिस पण दिले होते तिने..”
“पण त्याचा काही परिणाम झाला नाही…”
“अनफॉरच्युनेटली नाही, असेच म्हणावे लागेल”
“मनप्रित , तू काय अॅक्शन घेतलीस..”
“अलमोष्ट ऑन दे सेम लाईन्स सर..मी सेजल आणि प्रियदर्शनी दोघींनाही कौंऊंन्सेलींग केले ”
“मनप्रित , यू टोल्ड मी दॅट , लास्ट टाईम .. असे दिसते की त्यानेही समस्या दूर झाली नाही..”
“सॉरी सर..”
“सो , तुम्ही काय सोल्युशन वर्क आऊट केले आहे ?”
“सर , काल आम्ही दोघांनीही यावर बराच विचार केला पण वुई केम टू द सेम कन्क्लूजन..”
“मीन्स टू फायर प्रियदर्शनी..”
“अनफॉरच्युनेटली दॅट इझ द सोल्युशन सर … इतके समजाऊन , वार्निंग्ज देऊन ही तिच्यात काहीच फरक पडत नाही, इट सीम्स टू बी प्युअर बेहेवीयरल / अॅट्टीट्यूड प्रॉब्लेम ..प्रियदर्शनी चा ग्रुप बदलून काही उपयोग होईल असे वाटत नाही… दुसर्या ग्रुप मध्ये ही हीच स्टोरी रिपीट होईल सर.. वुई जस्ट कांट टॉलरेट हर एनी मोअर .. ..लेट हर गो.. सॅड … बट शी मस्ट गो..”
श्रीकांत सरांनी डोळे मिटून काही विचार केला … केबीन मध्ये सन्नाटा पसरला …
काही वेळा नंतर श्रीकांत सर म्हणाले..
“बाय द वे , हाऊ इज प्रियदर्शनी , ब्रिफ मी ..”
“सर, हायली टॅलेंटेड , कॉलेजची टॉप रँकर आहे , थ्रु आऊट फर्स्ट क्लास फर्स्ट , व्हेरी शार्प आणि हायली इफिशियंट, शी इज अ रियल जेम . तेव्हढी चुका काढण्याची हॅबीट सोडली तर … शी माईट प्रुव्ह अॅन अॅसेट टु अवर कंपनी.
“आणि एव्हढे असूनही तुम्ही दोघेही तिला फायर करायच्या गोष्टी करता आहात..”
“मला समजले नाही सर..”
“लेट मी एक्सप्लेन इट टू यु बोथ..”
पद्मराजन आणि मनप्रित खुर्चीत सावरुन बसले जसे काही एखादा सस्पेंस ब्रेक होत आहे…
काय होते श्रीकांत सरांच्या मनात ? काय होणार प्रियदर्शनीचे ?
पुढच्या भागात वाचा…
क्रमश:
शुभं भवतु
“भाऊ ..:
“काय रं सद्या?”
“लोक्स तुमच्यावर लई खवळल्यात..”
“का रं बाबा.. आता तेस्नी खवळायला काय झालं ?”
“ ते आसं म्हन्तात नाय म्हंजे तसे काणावर आलय माज्या..”
“नीट काय ते सांग की रे मर्दा.. का आपला उगाच वडा कूटायला लागलायस”
“नाही म्हंजे भाऊ, लोक्स आसं म्हंतात की … स्टुर्या लई तानता तुमी.. लई छळतासा .. धाडधाड सांगायचे न मोक्ळे व्हायाचे ते नाई ,सग्ळे खूंटीवर टांगूनशान ठिवतायसा जनू ..”
“हा.. हा… हा , सद्या लेका तेचातच लई मज्जा हाये… आणि तुला येक सांगू..”
“काय म्हंतासा भाऊसो ..”
“आत्ता नाय सांगट , नंतर सांगतू ”
“भाऊ , बगा पुन्यांदा त्येच … लोक उगाच नै खवळल्यात ते ..”
“गाय छाप ची पुडी काड पयला … नंतर बोलू बैजवार”
पुढचा भाग राेचक असेल. आत्तापर्यंत आपल्या सिरीयलमध्ये दाखवतात तसे एकमेकांवर तीन तीन वेळा कॅमेरे राेखुन झालेत 😆
श्री. हिमांशुजी,
तुम्ही आमच्या सद्या ला भेटला होता का ? कारण सद्या केव्हापासुन म्हणतोय ….”.. लोक्स आसं म्हंतात की … स्टुर्या लई तानता तुमी.. लई छळतासा .. धाडधाड सांगायचे न मोक्ळे व्हायाचे ते नाई ,सग्ळे खूंटीवर टांगूनशान ठिवतायसा जनू .. लोक्स तुमच्यावर लई खवळल्यात..”
पूर्वी एकच एक भली मोठी पोसट टाकत असे मग नंतर आठवडाभर काही नाही… हल्ली मी एका मोठ्या पोष्ट्चे तुकडे पोष्ट करतो त्यामुळेच एक दिवसा आड एक नविन पोष्ट लोक्स ना बघायला मिळते… आश्शी डोकॅलीटी लावलीय !
सुहास गोखले
सुहासजी या सगळ्या गोंधळात कुठ न्हेऊन ठेवलाय बाबाजीना आमच्या ?
श्री. स्वप्नील जी,
ते आमच्या सद्या ला ईचारा..बेनं नुसते पळून खेळतयं … एकतर कदी येळेवर हजर नसते आन आसलं तरी बी काई कामाचे नाय .. कदी येळेवर चा न्हाई , धड गाय छाप न्हाई … पुडी आनली तर चुना न्हाय तर कदी चुना बक्क्ळ पर पुडीचा पत्त्या नाय , लई म्हंजे लईच हल्या हल्या कराया लागतयं तेला, पोकल बांबूचे फटके देयाला पायजे.. पर न्हाई … आमच्या मंडळींच्या गावाकडचे हाये ना म्हणू घेयाचे सांबाळून ..नै तर काय..
सुहास गोखले
ha…ha……ha…..ok suhas ji…!!