ज्योतिषशास्त्र शिकताना
केवळ पुस्तके वाचून , नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र शिकता येत नाही. ‘पोहायचे कसे’ हे काठावर बसून पुस्तक वाचून कसे येईल ? त्या साठी पाण्यात उडी मारलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रातल्या ‘शास्त्री’, ‘शिरोमणी’ अशा पदव्या मिरवणार्यांना एक पत्रिका धड सोडवता येत नाही की एखादे भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही याचे कारण हेच…
