खरेच , ‘बार बार देखो , हजार बार देखो’ या ओळींना सार्थ ठरवणारे हे गाणे , शम्मी कपूर बर्याच जणांना आवडत नाही पण या गाण्यात तो बरा दिसतो आणि बर्यापैकी नाचला आहे. पण त्यापेक्षा मला आवडले ते या गाण्याचे संगीत , तो कमालीचा रिलॅक्स ठेका, ब्रास चा अत्यंत संयमित वापर आणि सुंदर अॅकॉर्डियन ! बेस सुद्धा खुप चांगला जमून आला आहे! पण या सगळ्यावर सरताज म्हणजे मो. रफीचा मुलायम आवाज !
बाकी नाच म्हणले तर मी आणि बेडूक सारखेच ! पण हे गाण लागले मी मला पण चार पावले त्या ठेक्याच्या तालावर टाकावी वाटतात !
