Rebecca Pidgeon – Spanish Harlem

रिबेका पिजन चे स्पॅनिश हार्लेम !

अप्रतिम गाणे , अप्रतिम आवाज, अप्रतिम रेकोर्डिंग !

बाकी रिबेका च्या आवाजाबद्दल काय लिहावे ! दवबिंदूंचा तजेला,  निखळ आरसपानी आणि रेशमी मुलायम.

या गाण्याचं ‘चेस्की रेकॉर्ड’ ने केलेले जगद्विख्यात ऑडीओफ़ाईल  दर्जाचे रेकॉर्डीग माझ्या संग्रहात आहे फक्त गिटार आणि शेेकर्स च्या साथीने म्हणले गेलेले गाणे हा रेकॉर्डिंग च्या दर्जाचा मापदंड म्हणून मानले जाते.

चेस्की रेकॉर्डस ने ध्वनिमुद्रीत केलेला हा ऑडीओ ट्रॅक आजही हाय एंड म्युझीक सिस्टीम तपासण्या साठी वापरतात. मी जेव्हा (२००६ मध्ये!) माझी हाय एंड म्युझीक सिस्टिम घेतली तेव्हा जे काही टेस्ट ट्रॅक वापरले होते त्यात हा ट्रॅक होता!

ही त्याची व्हिडीओ आवृत्ती ,  मुळचा ऑडीओ ट्रॅक जरा वेगळ आहे.  व्हीडीओ बनताना  मुळच्या नितांतसुंदर , आरसपानी ऑडीओ ट्रॅक चा दर्जा राखता आला नसला तरी बर्‍या पैकी सौदर्य टिकवून आहे !

डोळे मिटून हे गाणे ऐका..पहा रिबेका अक्षरश: तुमच्या कानात गुणगुणते आहे इतके कल्पनेच्या बाहेरचे खरे वाटेल.

आपल्या कडे लता, रफी सारखे महान गायक पण त्यांचे असे रेकॉर्डींग झाले नाही हे दुर्दैव म्हणायचे , एकाच दळभद्री माईक वर आळीपाळीने स्वर भरुन रेकॉर्ड झालेली लता-रफी द्वंद गीते ची इतकी गोड वाटतात तर त्यांना असे दर्जेदार रेकॉडींग लाभते तर ?

तलत चा हळवा कंप, मुकेश चा खर्ज , हेमंतदांच्या आवाजातली घनगंभीरता , किशोर चा अवखळपणा, शमशाद चा ठसका, गीता दत्त चा नखरा असा दर्जेदार रेकॉर्ड झाला असता तर?

या रिबेका सारखे रेकॉर्डींग तंत्रज्ञान ‘आपके हसीन रुख..” रेकॉर्ड होताना रफी ला लाभले असते तर?

सोन्याला सुगंध लाभला असता … पण हे होणार नव्हते.

गाणे ज्या स्टूडीओत रेकॉर्ड झाले आहे त्या रेकॉर्ड रुम चा एक सुखद ‘अ‍ॅम्बियंस’ या गाण्यात नेमके पणाने रेकॉर्ड झाला आहे. रिबेकाचा आवाज हेच मुळी एक निखळ सौदर्य आहे आणि ते असे अत्युच्च दर्जाने रेकॉर्डींग झाल्याने तो आवाज अगदी जसाच्या तसा आपल्या पर्यंत पोहोचत आहे, एरव्ही आवाज कितीही चांगला असला तरी वाटेत माईक, इलेक्ट्रॉनीक अ‍ॅम्प्लीफायर्स, टेप , मास्टरींग असे प्रत्येक जण त्याचे लचके तोडतो आणि शेवटी हीन दर्जाचे असे काही आपल्या कानावर पडते. इथे असे नाही.. कारण रक्ताचे पाणी करुन केलेले हे रेकॉर्डींग !

ज्या रसिकांना चेस्की रेकॉर्ड म्हणजे काय हे  अनुभवायचे आहे त्यांनी चेस्की च्या हाय डेफिनेशन सिडीज जरुर ऐकाव्यात ! अ‍ॅमेझॉन वर उपलब्ध आहेत , किंमत एका सीडी ची सुमारे १७ ते २५ डॉलर (रुपये १२०० ते १६०० !) असते (बर्‍याच सिडीज आहेत!)

 

[su_vimeo url=”https://vimeo.com/246755326″ width=”1600″ height=”1600″]

 

 

ते गायक गेले, ते संगीतकार गेले, ते रेकॉर्डीस्ट गेले , ते रेकॉर्डींग स्टूडीओ गेले…

आणि

अशा दर्जेदार कलाकृतींची  कदर करणारे ‘कान’ ही गेले!  

कालाय तस्मै नम:

 

 

 

 

 

 

शुभं भवतु

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *