काही फटू !

हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्‍यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे !

(मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी फटू काढत आहे हे त्यांना माहीती नव्हते , मी मोका साधून हलूच स्नॅप केले , अगदी एक क्षण भर मिळतो या साठी , सेटींग्ज करायाला वेळ मिळत नाही , फ्रेम करायला वेळ नसतो, स्प्लीट सेकंदात कॉम्पोझिशन करुन शॉट घ्यावा लागतो. (स्टुडिओ सेट अप मध्ये चमत्कार घडवता येतात !)

माझ्या ल्युमिया फोन मधून जे काही करता आले ते केले. मला समाधान आहे !

हे माझे काका.

 

 

आणि हा मी !

 

(हा फटू मी काहाडलेला नाही, येकाला ‘रिक्केष्ट’ केली , त्याने पाठवून दिलेलाच फटू जरा साफसूफ करुन हिथे डकवला झालं ! मी स्वत:च फटू काहाडला असता तर कित्ती भारी आला अस्ता नै !!)

Similar Posts

  • |

    घटस्फोट – २

    1990 नंतर जन्म झालेल्या आणि घटस्फोट झालेल्या 200 महिलांच्या पत्रिकांचा अभ्यास जवळपास पूर्ण झाला आहे. या पत्रिकांत असे काय आहे जेणे करून यांना घटस्फोटा सारख्या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले? या बाबतीतले काही प्राथमीक निष्कर्ष मी या आधीच्या पोष्ट मध्ये मांडले…

  • |

    ज्योतिष का आणि केव्हा

    ज्योतिषशास्त्र संभाव्य संधी वा समस्या बद्दल मार्गदर्शन करते, पण ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी कोणत्याही नव्या संधी निर्माण करू शकत नाही किंवा तुमच्या समस्या एखाद्या जादू सारख्या दूर करू शकत नाही. ज्योतिषशास्त्र स्वतः मधले कच्चे दुवे ओळखून ते सुधारण्यासाठी वापरा, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी…

  • |

    जातकांचे प्रश्न !

    नुकतेच काही जातकांंनी विचारलेल्या काही शंकांना उत्तरें दिली , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या  दिलेल्या उत्तरांंतच थोडी भर घालून लेख तयार केला आहे. आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात: काही प्रश्नांची उत्तरें ज्योतिषशास्त्राच्या आधारे…

  • |

    भविष्य का बघायचे?

    ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते, प्रयत्नांना पर्याय नाही, मात्र या प्रयत्नांना योग्य दिशा देण्या साठी ज्योतिषशास्त्राचा वापर चांगल्या तर्‍हेने करता येतो. आपली बलस्थानें कोणती याचा अंदाज आल्याने त्यांचा कौशल्याने वापर करुन प्रगती करणे शकय होते. कमकुवतपणा वा कमतरता भरुन काढण्यासाठी  प्रयत्न करता…

  • |

    झाशीच्या राणीचे काय झाले?

    ‘झाशीची राणी’ ही कथा/ अनुभव वाचल्या नंतर अनेक वाचकांनी या ‘अंकिता’ उर्फ ‘झाशीची राणी’ चे पुढे काय झाले ह्या बद्दल उत्सुकतेने विचारणा केली होती त्यासाठी हा पुरवणी लेख आहे, हा त्या कथेचा दुसरा भाग नाही. मुळ कथा जिथे संपवायची तिथेच संपवली…

  • |

    एक आळशी सकाळ….

    एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *