काही बोलायचे आहे.. (भाग ०१)

‘आर्टीक चिल्स’ म्हणावे लागेल असा फुल्ल ए.सी. सोडलेला, लोण्यातुन गरम सुरी फिरवावी तशी पळणारी बी.एम.डब्ल्यु ! या गाडी बद्दल ऐकले होते आज बसण्याची संधी मिळाली ! (आपल्या सारख्यांच्या नशीबात असल्या गाड्या नुसत्या बघण्या साठीच असतात नाही का?)

मलबार हिलच्या एका गल्लीत गाडी शिरली आणि हसमुखभाई, ईतका वेळ कपाळावर चढवून ठेवलेला सोन्याच्या रिमचा चष्मा पुन्हा डोळ्यावर आणत म्हणाले..

लो, आ गया भाई, आर्यन विला!’

आठ फुट उंचीचे नक्षिदार गेट, दारात चौकीदार आणि दोन आडदांड ‘रॉट व्हायलर’ जातीचे कुत्रें (कुत्रे कसले ते लांडगेच म्हणायचे!)  खरोखरचा व्हिला होता तो…

हसमुखभाई हे माझे एक जुने क्लायंट, त्यांचा डायमंड कटिंग अ‍ॅन्ड एक्स्पोर्ट चा व्यवसाय आहे,  ते मुंबईला रहात असले तरी महिन्यातून एकदा तरी देवळाली ला चक्कर असायचीच आणि देवळालीत आले की त्यांची माझी भेट ठरलेली.

‘ए सुहास भाय, हमारा शनी ते काय बोलतां ते ज्यरा बघून सांग ना..” असे तेच ते पुन्हा पुन्हा विचारत राहतात… आणि मी त्याच त्याच प्रश्नांना तीच तीच  उत्तरें देत रहातो ! मी तरी काय करणार शनी एका राशीत अडीच वर्षे असतो ना! याचा ना त्यांना कंटाळा ना मला! ‘गांधीबाबा’ मोजायचा कंटाळा कशाला येईल?

आज हसमुखभाई सोबत मी एका बड्या असामीला भेटणार होतो आणि असली बडी असामी काय ‘टु बी एच के’ मध्ये राहते का? त्यांचा असला आर्यन व्हिलाच असायचा ना!

त्याचे झाले असे ….


एक ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यासाठी मी मुंबईत आलो होतो. प्रोग्रॅमच्या पहील्याच दिवशी सकाळी हसमुख भाईंचा फोन आला…


“कहाँ हो आप, पंडितजी’


“जी, मुंबई में , एक ट्रेनिंग प्रोग्रॅम कंडक्ट कर रहा हुं “


“तो मेरा आधा काम हो गया..”


“वो कैसे ?”


“आपको मेरे एक बहुत करिबीं दोस्त से मिलवाना है”


“किस खुशी में”


“एस्ट्रोलोजि ! ”


“लेकिन मै तो पुरा दिन ये लेक्चर के चक्कर में रहूँगा, कहां से वक्त निकालू ”


“हां, वो ठीक हाय, लेकिन शाम को तो फ्री हो जायेंगे ना/”


खरेतर दिवसभर लेक्चर दिल्या नंतर अंगात कसलेच त्राण राहत नाही. त्यात पुन्हा हे ज्योतिष, शक्यच नाही!


“हाँ शाम को फ्री जरुर होता हूँ , लेकिन थकान इतनी होती है के पूछो मत“


“कब खतम हो रहा है ये ट्रेनिंग प्रोग्रॅम “


“आज और कल, दो दिन का प्रोग्रॅम है”


“तो कल ट्रेनिंग वगैरा खत्म होने के बाद तो टाईम निकाल सकते हो ना?”

“कल शाम को तो पंचवटी से वापस देवळाली जा रहा हूँ”


“कल वख्त निकालो हमारे लिए, वो ‘पंचवटी’ क्या चीज है, हमारा काम खत्म होने के बाद हम आपको देवळाली पहुँचा देगे, कोई फिक्र नहीं”


“लेकिन..”


“बस, अभी जादा बात नहीं. कल आप मेरे साथ मेरे दोस्त के घर पर होंगे, बात पक्की?”


“अब आप इतनी जिद कर रहें हो, ठीक है, लेकिन मिलना कहाँ हैं”


“आप कहाँ पे ठेहरे हो?”


“कुर्ला -चुना भट्टी, वो ‘रीजनल सेंटर फॉर अडवांस कॉम्प्युटिंग ’ मारुती सुझुकी के शोरुम के बाजू वाले गली में”


“तो ऐसा करते है, कल शाम मै आपको पिक-अप करूंगा, हमारे दोस्त के पास चलतें है, बातें होंगी और डीनर भी वहीं होगा, ठीक है”


“लेकिन ये आपके दोस्त है कौन?”


“कल सबकुछ बता देंगे”


“ठीक है, “


“तो कल मिलेंगे. जय श्रीकृष्ण “

गेट उघडलं आणि गाडी आतल्या प्रशस्त पोर्चमध्ये थांबली. ते दोन  रॉट व्हायलर राक्षस माझ्याकडे संशयाने बघत गुरगुरत होते, त्यांचे ते गुरगुरणे त्या शांत गल्लीत घुमत होते. हसमुखभाई आणि मी त्यांच्या मागे-मागे… एखाद्या जुन्या काळातल्या राजवाड्यात शिरतोय असं वाटत होतं.

“ये है मेरे दोस्त का घर !” हसमुखभाईंनी चष्म्यातून बघत मिश्किलपणे म्हटलं.

तो अवाढव्य दिवाणखाना, आतलं फर्निचर, गालीचा, झुंबर आणि भिंतीवरची पेंटिंग्स बघूनच कळत होतं की इथे साक्षात लक्ष्मीचा कायमचा मुक्काम आहे.

समोर एक राजेशाही व्यक्तीमत्व उभे होते. लख्ख गोरा रंग, मध्यम उंची, चंदेरी केस, हाताच्या बोटात ट्प्पोर्‍या हिर्‍याची अंगठी, मनगटात स्विस घड्याळ ! आणि समोरच्याचा एक्स रे घेणारी धारदार नजर!


“आईये पंडितजी, आईये हसमुखजी, सब खैरियत तो हैं ना?”


सुटलेले पोट जेव्हढी परवानगी देईल तितके वाकत हसमुखभाई म्हणाले,


“जी बिल्कुल, आपकी दूवाँ से “


“आईये पंडीतजी, हमारे गरीबखानें मे तशरिफ रखीये”

जिभे वर खानदानी आदब होती, हे मी उगाचच म्हणतो आहे, सांगायची गरजच पडू नये, ती व्यक्ती ज्या खानदानातली होती ते खानदान किमान तिनशे वर्षांची परंपरा असलेले होते!


“हसमुखजी हमारे बहोत करिबी दोस्त है, आपके बारेमें हमेशा तारीफ ही तारीफ सुनता आ रहा हूँ. आपसे मिलने की कई दिनोंकी चाँह थी, आज वो मन की मुराद पुरी हो गयी”


इतके अदबशीर, खानदानी, चांदीचा वर्ख लावलेले उर्दू  मिश्रीत हिंदी ऐकायची सवय नसते हो आपल्या सारख्यांना !

हसमुखभाईंनी राय साहेबांची आणि माझी ओळख करुन दिली.


“आप है राय साहब, ‘क्ष क्ष क्ष क्ष’ रियासत के नवाब, आपका देस विदेस में फैला हुवा काफी बडा कारोबार है”

“आपसे मिलके बडी खुषी हुई, आप जैसे पंडत हमारे गरीबखानें मै पधारें ये हमारी खुश किस्मती”

हा गरीबखाना?  नाही हो, वर्णन नाही करत, कसे करणार ? आपली तेव्हढी औकात नाही ! (बघा अजुनही तो प्रसंग आठवला की तोंडातून उर्दू शब्दच बाहेर येतात !)

फार फार भारी होते हो ते सगळे.

नोकराने चांदीच्या ट्रेमधून पाणी आणि सुका मेवा आणला. हात लागला तर फुटेल की काय अशी भिती वाटावी अशा सुबक, नाजुक ग्लासां मधुन थंडगार पाणी पिताना मला त्या कुर्ला -चुना भट्टी वाल्या कॅन्टीन मधले हाताची पाचही बोटे बुडवून आणून दिलेल्या गिलास मधले पाणी आठवून पोटात ढवळले!

सोफ्यावर अत्यंत सहजतेने विसावलेले ते ‘राय साहब’ नावाचे रुबाबदार नवाबी व्यक्तिमत्व अत्यंत नजाकतीने  मृदू मुलायम आवाजात, अदबीने पेश आले…ती आदब आठवून आजही मला अवघडल्या सारखे वाटते,

“वैसे तो हमारा मजहब इसकी इजाजत नहीं देता, लेकिन मामला ही इतना संगिन है के जहाँ से भी थोडासा भी सूकून मिलें, आज उसकी जरुरत है”

“राय साहब मैं मानतां हुँ आप की सोच को”

“आप सोच रहें होंगे , ऐसी उँची महल में रहने वाले को क्या परेशानी हो सकती है ? लेकिन हाँ , हमे भी परेशानियाँ होती है,  एक नवाब होने के बावजुद भी. आखिर हम भी इंसाँ जो ठेहेरे”

“जी बिल्कूल”

“हसमुखजी कहते है के आप काफी भरोसेमंद हो तो शक की कोई गुँजाईश ही नहीं, लेकिन आजका मामला कुछ ज्यादा ही ज्याती हैं , गुस्ताखी मुआफ लेकिन क्या मै आप पर पूरा भरोसा कर सकतां हूँ ?

“आप बेफिक्र रहीये”

“अच्छी बात “

राय साहेबांची ती एक्स – रे घेणारी नजर मला अस्वस्थ करत होती.

ऑरेंज ज्युस घेता घेता राय साहेबांची बारकाईने चौकशी चालू होती, देवळाली में कहाँ रहेते हो, क्या काम करते हो, मुंबई कैसा आना हुवा इ.

एव्हाना राय साहेब जरासे आश्वस्त झालेले दिसले.

“हसमुख भाई आपके बारे में बताते रहते के आप् वो क्या कहते हैं ..”

“होरोस्कोप?”

“वहीं, वो देखके सबकुछ बता सकते हैं”

“जी,  मैं वैसी कोशिस तो जुरुर करता हूँ”

“अच्छी बात है, हम ऐसे मामले में बिल्कुलही अनपढ गवाँर साबित होंगे , लेकिन कई लोगोंसे ये ऐसा अक्सर सुनता आ रहा हूँ , ताज्जुब होता है, ये कैसा मुमकिन है?”

“राय साहब इसका जवाब देना काफी मुश्कील  है, फिर भी ये होता है, लेकिन लगातार, बार बार नहीं”

“यानें ?”

मी छ्ता कडे बोट करुन म्हणालो..

“उस की मर्जी”


“ठीक है समज गया, तो आप कुछ पर्ची बनाते हो और उसे देखके परेशानियोंका हल बताते हो”

“जी नहीं. समस्या का हल पर्ची में नहीं बल्की आपकी कोशिस में होता हें, पर्ची सिर्फ कोशीश  कैसी, कहाँ और कब करनी है, बस इतनाही बता सकती है”

“सुभानल्ला, ये भी तो काफी मदतगार साबित हो सकता हैं”

“जी”

“अगर आप बुरा ना मानों तो एक बात पुछ सकता हूँ ?”

“बेहिजज “

“ये बात तो हम समझ गये के पर्ची से आप परेशानी के बारे में बता सकते है, सहीं?”

“जी बिल्कुल”


“तौबा तौबा, हमने कुछ गलत कह दिया होगा तो हमें मुआफ करना”


“नहीं, नहीं, राय साहब, इसमें बिल्कुल भी कोई गलती नहीं, बल्कि ये तो मेरे लिए एक बडा मौका है, मेरा हुनर साबित करनेका”

रायसाहेब हसमुखजी कडे पहात म्हणाले,

“इंशाल्ला, लगता है, आज हम सहीं शक्स से बात कर रहें है”

“शुक्रिया”

“मै समज गया, काम मुश्कील है लेकिन मैं जरुर कोशीस करुंग़ा “

“बिसमिल्लाह”

….


नेहमी असे होते की जातक प्रश्न विचारतो, ज्योतिर्विद मग प्रश्नकुंडली किंवा जन्मकुंडली च्या साह्याने त्या प्रश्नाचे उत्तर देतो.

इथे जातकाने प्रश्न सांगीतलेला नाही तर तो प्रश्न काय आहे हेच मुळात हुडकून काढायचे आहे.

अर्थात जातकाने अशी माझी परीक्षा घेण्याची पहीलीच वेळ नाही, आणि अशा जवळजवळ सर्वच परीक्षांत मी उत्तीर्ण होत आलो आहे. मला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते पण काहीसे दडपण आले होते…


माझ्या ब्लॉग वरुन मी ‘कन्सलटेशन चार्ट’ बद्दल बरेच लिहले आहे आणि काही उदाहरणे पण दिली आहेत. जातक समोर येतो तेव्हाची वेळ व स्थळ घेऊन केलेली समय पत्रिका ( Time Chart) आपल्याला जातका बद्दल , जातक सध्या कोणत्या परिस्थिति मध्ये आहे, जातकाचा संभाव्य प्रश्न काय आहे ह्या बद्दल आपल्याला बरेच काही सांगून जात असते. आणि बहुतांश केसीस मध्ये तोच चार्ट वापरुन जातकाच्या समस्यांचे उत्तर पण देता येते.

या कामासाठी मी सायन चार्ट वापरतो आणि सारे अ‍ॅनॅलायसिस पण वेस्टर्न पद्धतीने करतो. मी नक्षत्र पद्धती आणि पारंपरीक पद्धतीने काम करुन बघितले आहे पण वेस्टर्न तंत्राने सातत्याने अगदी अचूक आणि तपशीलवार माहिती मिळवली आहे.

लॅपटॉप चालू केला. सॉफ्टवेअर मध्ये मलबार हिल, मुंबई लोकेशन सेट केले आणि त्या स्थळाची, त्या  क्षणाची पत्रिका स्क्रीन वर आली. 

एरव्ही जातक समोर येऊन बसला की इतका बोलत राहतो की त्याला थांबवावे लागते, इथे त्याच्या उलट  परिस्थिती होती. इथे जातक म्हणतो मी काही बोलणार नाही… आप ही जानिये मेरे मन की बात… 

काही हरकत नाही, आपण हुडकून काढू , मुश्किल है लेकिन कोशीश करने मै क्या हर्ज है ?

( **** भाग ०२ मध्ये पुढे चालू****)

+++

Similar Posts

3 Comments

  1. सर, ही पद्धत खूपच अचम्बीत करणारी आहे व मला ती आपणाकडून आत्मसात करून घेणे निश्चित आवडेल.

    1. हे होरारी तंत्र आहे, पाश्चात्य पद्धतीचे यात ग्रहयोगांना कमालीचे महत्त्व असते. हे तंतर वापरायचे असेल तर ग्रहयोग चांगले समजणे आवश्यक आहे. या साठी माझा ग्रहयोग हा अभ्यासक्रम आहे त्याचे ६३ व्हिडिओज आहेत सुमाते ७० घड्याळी तासांचा अभ्यासक्रम आहे.

Leave a Reply to suhasgokhale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *