केस स्ट्डी- परदेश गमन

मी परदेशी जाईन का?

परदेशात प्रशिक्षणा (ट्रेनिंग ) साठी जातक उत्सुक होता. मागच्या वर्षी अशी एक संधी हातातोंडाशी येऊन निसटली असल्याने जातक ह्या खेपेला तरी संधी मिळावी म्हणून कमालीचा अगतिक होता. त्याच अवस्थेत त्याने मला हा प्रश्न विचारला होता.

‘परदेश गमन’ विषयक प्रश्न हाताळताना एक दक्षता नेहमीच घ्यायची ती म्हणजे असा प्रश्न विचारण्यार्‍या जातकाकडे परदेशी जाण्या साठी अनुकूल पार्श्वभूमी ( Potential) आहे का? कारण परदेशी जाण्याची संधी अशी उगाचच किंवा कोणालाही मिळते असे नाही.

परदेशात लोक अनेक कारणां साठी जाताता पर्यटन, औषधोपचार, शिक्षण-प्रशिक्षण, नोकरी , व्यवसाय इ. इथे आपण नोकरी – व्यवसाया निमित्त परदेश गमन हा मुद्दा विचारात घेतो आहोत.

आता काही नोकर्‍या अशा असतात की जिथे परदेशात जाण्याची संधी जवळजवळ नसतेच , तेव्हा प्रथम नोकरी निमित्त जाण्याची इच्छा व्यक्त करणारा जातक तशा अनुकूल नोकरीत आहे का? हे तपासले पाहीजे.  तशी शक्यता असल्यासच जातकाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. कशात काही नाही आणि केवळ उत्सुकता म्हणून प्रश्न विचारला असे असेल तर त्याचे उत्तर देण्याचे टाळावे कोणीही यावे आणि “मी परदेशी जाईन का असा प्रश्न विचारावा आणि आपण लगेच प्रश्नकुंडली मांडून त्याचे उत्तर द्यावे ’ असा प्रकार होऊ नये.

असो.

ही संपूर्ण केस स्टडी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहे , व्हिडोओ मोठ्ठा म्हणजे सुमारे 45 मिनिटांचा असल्याने तो दोन भागात सादर केला आहे .

भाग – 1:

[su_youtube_advanced url=”https://youtu.be/CLHb3EO95ws” width=”980″ height=”800″ rel=”no”]

भाग 2:

[su_youtube_advanced url=”https://youtu.be/iNRikuDebj4″ width=”980″ height=”800″ rel=”no”]

शुभं भवतु

Similar Posts

4 Comments

  1. धन्यवाद सुहासजी,

    विषयाची मांडणी, सादरीकरण आणि क्वालिटी कंटेंट खरच खूप छान आहे, ह्यावर तुम्ही घेतलेली मेहनत पूर्ण विडिओ मध्ये जाणवते.
    मंगळ तृतीयचा विशेष प्रकारे कार्येश होतो हा मुद्दा मांडताना असे जाणवले की तुम्ही विडियो नुसता बनवून अपलोड केलेला नसून,
    तो तुम्ही स्व:त पूर्ण पहिला असून त्यात अजून काही देता येईल हा विचार आणि तळमळ स्पष्ट जाणवते.
    विडियो नवीन अभ्यासी पासून ते प्रॉफेशनल व्यक्तिला कसा उपयुक्त होईल ह्याची बरीच काळजी घेतलेली दिसली.
    तुम्ही घेतलेल्या मेहनतीबद्दल परत एकदा धन्यवाद.

    संतोष सुसवीरकर

  2. व्हिडियो छान झाला आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकत असल्यासारखे वाटले.
    कुंडली विश्लेषण नियम सांगून step-by-step सांगितल्यामुळे चांगले समजले.
    खूप धन्यवाद!
    स्नेहल अभ्यंकर.

Leave a Reply to सौ. स्नेहल अभ्यंकर Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *