घटस्फोट

घटस्फोट:

अत्यंत दुर्दैवी आणि तीव्र वेदनादायी प्रसंग!

पत्रिकेच्या अभ्यासावरून घटस्फोट कळतो ? बहुदा नक्की!

ज्योतिषशास्त्रात हमखास लागू पडणारा असा कोणताचा नियम नाही पण जे काही आडाखे प्रस्थापित झाले आहेत त्याचा वारंवार , बार बार लगातार असा अनुभव येत असतो!

गेल्या महिन्यात ‘घटस्फोटीत’ महिलांच्या सुमारे 200 पत्रिकांचा संच एका खात्रीलायक स्त्रोता कडून प्राप्त झाला (चक्क पैसे मोजावे लागले त्या साठी!) , माहिती खात्रीशीर आहे, जन्मवेळांत काही मिनिटांची तफावत असू शकेल.

सध्या या पत्रिकांचा अभ्यास चालू आहे.

1) पत्रिकेत असे काय आहे ज्यामुळे घटस्फोट झाला असावा?

2) लग्नाची आणि घटस्फोटाची तारीख, दशा पद्धती आणि सेकंडरी प्रोग्रेशन्स वापरून किती अचूक हेरता येते?

या अंगाने अभ्यास चालू आहे, AI वापरत असलो तरी काही भाग मानवी मेंदूच जास्त चांगल्या तऱ्हेने करतो असा अनुभव आहे.

पहिल्या ५० पत्रिकांच्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष:

चार पत्रिकांचा अपवाद वगळता बाकीच्या ४६ पत्रिकांत खालील योग अगदी ‘अंशात्मक’ म्हणजे ३ डिग्रिज च्या आसपास आढळले आहेत.

यादीत अजूनही योग आहेत पण खाली दिलेले योग अगदी हमखास घटना दाखवतात आणि यादीतले किमान तीन तरी योग एकत्रित असतात हे निरीक्षण !

१) शुक्र – युरेनस (युती, केंद्र आणि प्रतियोग)

२) शुक्र – नेपच्यून (युती, केंद्र, प्रतियोग)

३) शुक्र अस्तंगत

४) शुक्र – शनी अंशात्मक युती

५) २ आणि ७ स्थानांतून होणारे जबरदस्त कुयोग, खास करून शनी – मंगळाचे योग

६) सप्तमेश आणि सप्तम स्थान कमालीचे दूषित आणि त्याचे वेळी दशम भाव जोरकस!

हे असे योग असतील तर ‘घटस्फोट’ नक्की असे अनुमान काढता येणार नाही पण असे योग असलेल्या जातकाचे वैवाहिक जीवन अत्यंत खडतर/ दुर्दैवी ठरेल असा अंदाज अगदी खात्रीने करता येईल.

अर्थात ह्याला काही अपवाद असणार हे वेगळे सांगायला नको.

‘सेकंडरी प्रोग्रेशन्स ‘ ने मात्र कमाल केली जवळ जवळ सर्वच पत्रिकांच्या बाबतीत विवाहाची आणि घटस्फोटाची तारीख अगदी बरोबर म्हणजे +/- एक महिन्यांच्या आत ओळखता आली. दशा -पद्धती मात्र अनेक पत्रिकांच्या बाबतीत फेल गेली.

बाकी पत्रिकांचा अभ्यास करायला वेळ लागेल पण आपण म्हणतो ना… शिता वरून भाताची परीक्षा!

समझने वाले को बस इतना इशारा काफी है |

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *