‘सं
गी’ वर जीव लावायला सुरवात केल्यापासुन मन्या सगळे उद्योग सोडून तासनतास ‘संगी’ शी चॅट करण्यात वेळ घालवू लागला. काही दिवस असेच गेले .. पण एक दिवशी झाले काय, मन्याच्या ‘बा’ ने मन्याला शेताच्या कामासाठी वस्ती वर धाडले, मन्या पहील्यांदा तैयार नव्हता , एक तर तिथे उनातानात काम असतेय आणि वस्तीवर मोबाईल ची रेंज भेटत नाय.. मग ‘संगी’ शी चॅट कसे करणार? पण मन्याचे काही एक चालले नाही, कालची ‘देशी’ अजुन उतरलेली नसल्याने तांबरलेले , सुजाट डोळे , ‘ चार कचकचीत शिव्या’ आणि ‘उगारलेले दांडके’ असा ‘बा’ चा अवतार पाहुन मन्याने ओळखले आज काही खरे नाही!
मन्या वस्तीवर आला पण मोबाईल ला रेंज नाही. ‘संगी’ शी चॅट नाही.. कामात लक्ष कसे लागणार.. सकाळ कशीबशी पार पडली , दुपार झाली, सगळी गडी माणसे जेवण करुन जरा पसरली, पण मन्याला कसले चैन पडणार ! वस्तीच्या मागे एक लहानसे टेकाड होते , मन्याला वाटले जरा त्या टेकाडावर गेलो तर रेंज भ्येटेल , तस्सा ताडकन उठून मन्याने त्या रणरणत्या उन्हात टेकाड गाठले पण तिथे ही रेंज नाही, चरफडत मन्या परत निघाला.. वाटेत एका दगडाला ठेचकाळला.. एक कचकचीत शिवी घालत मन्याने दुखर्या पायानेच त्या दगडाला लाथ घातली.. दगड दहा फूट लांब दूर जाऊन पडला, दगडाचे दोन तुकडे झाले आणि त्याच वेळी ‘खण्ण’ असा आवाज झाला. मन्या चमकला, हा कसला आवाज? मन्याने दगड पडला तिथे पाहीले, उन्हात एक लोखंडी वस्तू चमकताना दिसायला लागली!
“आयला , काय म्हणायचे ह्ये”
मन्याने जवळ जाउन बघितले त्याचा डोळ्यावर विश्वास बसला नाही..
तो होता एक जुन्या काळातला कोरीव काम केलेला दिवा !
लहानपणी मन्याने ‘अल्लादीन आणि जादुचा दिवा’ ही स्टुरी ऐकली होती, त्याला एकदम वाटले , साला हा तोच दिवा तर नसेल? त्याने तो दिवा उचलला.. शेकडो वर्षे मातीत गाडला गेला असल्याने त्या दिव्यावर धुळीची पुटें चढली होती, तेव्हा दिवा जरा साफ करावा म्हणून मन्याने आपल्या सदर्यानेच तो दिवा पुसायला सुरवात केली …
तो दिवा खरोखरीच अल्लादिनचा होता आणि त्या दिव्यात राक्षस पण होता… जेनी …
मन्याने दिवा घासायला सुरवात केली तोच त्या दिव्यातून धूर निघाला आणि त्या धुरातुन एक अक्राळविक्राळ जेनी आपले दोन्ही हात जोडून विनम्रपणे म्हणाला …
“बोल मेरे आका, क्या हुक्म है”
“ये ‘आका’ क्या होता हय ”
“मालिक”
“आयला मजा हाय म्हणायचे की आणि ये हुक्म क्या हुता हय” ………….मन्याचे हिंदी !
“आप जो बोलेंगे वो मै करुंगा, आपकी कोई भी ख्वाईश पूरी करना मेरा फर्ज है , मेरे आका”
“मराठी येत नाय काय?”
“मराठी थोडी थोडी आती हैै”
“मग मराठीत बोल की रं भाड्या”
“मराठी ठीक तरहा से नहींं बोल पाता , मेरी जुबाँ उर्दू है”
“मेरे कू उर्दू आता नै , मय मराठीतच बात करुंगा , बर ते जाऊ दे , कसले काम करतो म्हणातोस तू”
“उर्दू के लिए गुस्ताखी मुआफ मेरे आका, आप जो भी कहेंगे वो मै करुंगा”
“काय पण “
“हां मेरे आका, आपके लिए कुछ भी!”
“आयला, आमच्या कडे ‘तुमच्या साठी काय पन ‘ म्हणत्यात तसच बोलतोस की तु”
“जी मेरे आका”
“साला, मज्जा हाये, बघू तु काम करतोस का नुसत्या पुड्या सोडतोस ते, इथे मोबाईल ला रेंज आणून दे, सकाळ धरन ‘संगी’ शी चॅट नाय काय नाय , सगळे बार येतील अशी रेंज दे आणि इंटरनेट चा स्पीड पण वाढव”
“जी मेरे आका, लेकीन एक शर्त है..”
“आता काय?”
“मेरा सॉफ़्टवेअर अपग्रेड हो गया है , अभी अभी इंस्टाल किया है, रिस्टार्ट भी दे चुका हूँ ”
“मग त्याचे काय ?”
“मेरे आका, मै आपका कोई भी काम करुंगा लेकिन शर्त ये है की एक काम खत्म होते ही दुसरा काम बताना होगा, रुकना नहीं, दो कामों के बीच जादासे जादा दस मिनट का फासला चलेगा, उससे ज्यादा नही”
“म्हणजे एक काम संपले की लगीच दुसरे सांगायचे ?”
“जी मेरे आका”
“त्यात काय , यात कसला आलाय प्रॉब्लेम?”
“नहीं मेरे आका, ये इतना आसान नहीं “
“असे म्हणतोस? समजा दुसरे काम सांगीतलेच नाही तर?”
“गुस्ताखी मुआफ मेरे आका, लेकीन अगर आप दस मिनट के अंदर दुसरा काम नहीं दे सके तो मुझे मजबुरन आपको इस दिये में बंद करके , जमीन में गाड देना पडेगा हमेशा के लिये ! ”
“साल्या , इकडे मला ‘आका’ म्हणतोस आणि मलाच जीमिनीत जित्ता गाडणार तू ”
“गुस्ताखी मुआफ मेरे आका, मेरी भी कुछ मजाबुरीया होती है , आप मेरे आका होते हुए भी मुझे ये काम करना पडेगा”
“असे बापरे”
“इसलिए मेरे आका , अभी भी वख्त है, पहला काम मुझे सौपने के पहले , सोच लिजिये, अगर आपको जरासा भी शक है तो इससे दूर रहियेगा , फायदे में रहेंगे, अगर आप ना कहते तो मै फिर इस दिये में जा बैठूंगा ”
मन्याला प्रश्न पडला , काय करावे? पण दहा मिनिटात दुसरे काम सांगायचे इतकेच ना, मग त्यात काय शंभर कामे पडली आहेत , सहज जमेल ते..
“आपल्याला जमेल , मी सांगतो तुला काम”
“जो हुक्म मेरे आका”
“हे घे काम .. इथे मोबाईल ला रेंज आणून दे, सगळे बार येतील अशी रेंज दे आणि स्पीड पण वाढव”
….
….
क्रमश:
शुभं भवतु
सुप्रभात