झाडा खाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा , आठवूनी मेघ जुना , कोणी भिजलेले
खरच काय वेस्पा च्या स्कुटरीं होत्या नै…
त्या स्कुटरींचा एक झमाना होता… त्या स्कुटरीत जो भारदस्त पणा होता , दिमाख होता तो आत्ताच्या मोटारसायकलींच्या सुळसुळाटात नाय बॉ …
मोटारसायकलीचा सगळा रुबाब टायर पंक्चर झाले की क्षणात उतरतो .. आमच्या स्कुटरीचे तसे नाय .. स्टेपणी असतीय अशा वख्ताला !
पण तो काळ गेला तो गेलाच , सोबत त्या स्कुटरीं पण गेल्या … आता उरल्यात त्या फक्त त्यांच्या आठवणीं … मनात कोपर्यात घट्ट जपून ठेवलेल्या. अल्बम मधल्या जुन्या काळ्या – पांढर्या फोटों सारख्या…
माझ्या मनातली स्कूटर मात्र अजूनही तरुण आहे , म्हणून बाकीचे रंग काळवंडले तरी ती अजूनही आपले तारुण्यातले रंग राखून दिमाखात उभी आहे…
अगदी ह्या फटूत दिसते ना तश्शी..
कालाय तस्में महा:
शुभं भवतु
