डबल परीक्षा

०५ फेब्रुवारी २०२४, रात्रीचे सुमारे ८ वाजले होते, माझी कामे चालू होती इतक्यात फोन वाजला,

“हॅलो, मी मंदार xxxx बोलतोय, श्री YYYYYY यांनी मला आपला रेफरन्स दिला, सॉरी जरा ऑड वेळेला फोन करतोय, आत्ता बोलता येईल का?”

“हो चालेल, कशासाठी फोन केलात?”

“मला आपले मार्गदर्शन हवे आहे”

“कशाच्या संदर्भात?”

“एक प्रश्न विचारायचा आहे”

“ठीक आहे आपला नेमका प्रश्न काय आहे ते स्पष्ट करा”

“माझा विवाह कधी होईल ते सांगा”
 
“आपले वय काय?”

“३४ वर्षे, १९९० चा जन्म “

“३४ वर्षे वय झाले तरी पण विवाह झालेला नाही?”  

“नाही नाही तसे नाही, मी माझ्या दुसऱ्या विवाहा बद्दल प्रश्न विचारतोय”

“अच्छा म्हणजे आपला प्रथम विवाह झालेला आहे”

“हो,पण दुर्दैवाने आमचा घटस्फोट झाला, आता दुसरा विवाह करायचा म्हणतोय, या खेपेला मागच्या चुका करणार नाही, आपल्या सारख्या तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्याने पुढची पावले टाकणार आहे” 

“ठीक आहे, जे झाले ते झाले, पुन्हा नव्याने सुरवात नक्कीच करता येईल, दुसऱ्या विवाहाच्या संदर्भात काय शक्याशक्यता आहेत ते आपली पत्रिका तपासून सांगू शकेन”

“चालेल’

“आपण असे करा, आपली माहिती, जसे की आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव, प्रथम विवाहाची तारीख, घटस्फोटाची तारीख,  ही बेसिक माहिती कळवा, तसेचं जन्मवेळेची खातरजमा करण्या हेतूने आपल्या आयुष्यात आत्ता पर्यंत घडलेल्या काही ठळक घटना जसे मोठे,अपघात, शस्त्रक्रिया, आर्थिक  हानी, मोठा आर्थिक लाभ,  परदेश गमन, नोकरीत बदल, प्रमोशन, नोकरीतून हकालपट्टी इ. असे किंवा अन्य काही ठळक मोठ्या घटना घडल्या असल्यास त्यांच्या तारखा, किमान महिना- वर्ष या स्वरूपात कळवल्यात तर उत्तमच अर्थात ही जादाची माहिती आपण त्या बाबतीत कन्फर्टेबल असाल तरच पाठवा पण वर सांगितलेली बेसिक माहिती मात्र लागेलच त्या शिवाय काम करता येणार नाही” 

“नो प्रॉब्लेम , मी हे सगळे व्हॉटस अप वर पाठवतो, आपले मानधन किती? ”

मी मानधनाचा आकडा सांगितला.

“ओके, मी लगेच पेमेंट करतो आणि आपण मागीतलेली माहिती पण पाठवतो”

थोड्याच वेळात मंदार ने पेमेंट केले आणि त्याचा व्हॉट्स अप मेसेज आला त्यात त्याचे नाव,  जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव इतकीच माहिती होती.

मी मेसेजला उत्तर दिले “माहिती अपुरी आहे, आधी सांगितल्या प्रमाणे पहिल्या लग्नाची तारीख आणि घटस्फोटाची तारीख कळवा”

मंदार चे उत्तर आले..

“हो, पाठवतोय”

पण त्या नंतर मंदारचा पुढचा मेसेज आलाच नाही, मी माझ्या समोरची कामे चालू  ठेवली, सुमारे ११ च्या सुमारास मी काम थांबवले, चला ‘ डे इज ओव्हर’ म्हणत संगणक बंद केला, मंदार चा मेसेज अजून ही आला नव्हता, मी त्याला ‘उर्वरित माहिती पाठवा’ असा मेसेज केला आणि झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता फोन बघितला मंदार चा मेसेज काही आला नव्हता, मनात म्हणालो की पाठवेल माहिती त्याच्या सवडीने, सर्व आवश्यक माहिती येईल तेव्हा बघू , माझी दिवसाच्या यादीतली कामे सुरू केली पण का कोणास ठाऊक या मंदार च्या बाबतीत अचानक एक औत्सुक्य निर्माण झाले, विचार केला मंदार ने पेमेंट तर केलेच आहे, त्याचे काम तर करायचेच आहे तेव्हा पूर्वतयारी म्हणून त्याची पत्रिका तयार करून बघूया तरी, त्यावरून किमान त्याचे लग्न आणि घटस्फोट केव्हा झाला असावा याचा अंदाज घेऊ, लगे हाथ आपली एक ज्ञानचाचणी पण होऊन जाईल !

मंदारने नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव इतकी माहिती दिलेली होती. त्यावरून त्याची पत्रिका बनवली. ती पत्रिका खाली दिली आहे:

जन्मतारीख: १८ जानेवारी १९९०  जन्मवेळ: सकाळी ११:०० जन्मठिकाण: मुंबई (दादर)


मंदारचा जन्म मुंबईचा, शहरी भागातला, आडनावा वरून उच्चवर्णीय म्हणजे अगदीच २०-२२ व्या वर्षी विवाह अशी केस नसणार. 

पत्रिकेचा वरवरचा अभ्यास ‘योग्य वयात विवाह’ सुचवत आहे , या साऱ्यांचा विचार करता त्याचा विवाह वयाच्या २६ ते ३० या वयोगटात असताना झाला असावा, म्हणजे २०१६ ते २०२०.

या अनुषंगाने मंदारच्या पत्रिकेनुसारच्या महादशा तपासू.

मंदारची राहू महादशा फेब्रुवारी २०१३ ला संपली तेव्हा त्याचे वय २३ वर्ष होते इतक्या लहान वयात त्याचा विवाह होणार नाही.

२०१३ मध्ये गुरु ची महादशा सुरू झाली ती २०२९ पर्यंत चालणार आहे. म्हणजे मंदारचा विवाह आणि घटस्फोट या दोन्हीही घटनां या गुरूच्या महादशेतच घडल्या आहेत.

महादशा स्वामी गुरु चे कार्येशत्व:  ११ / ४ / —- / १ , १० 

तसे पाहिले तर शनी, युरेनस, नेपच्यून यांच्या प्रतियोगातला गुरु विवाहाच्या दृष्टीने प्रतिकूलच आहे. पण याच दशेत विवाह झालेला आहे (आणि घटस्फोटही) म्हणजे सप्तमाच्या (७) एखाद्या प्रबळ कार्येश ग्रहाने त्याच्या अंतदर्शेत विवाह घडवून आणला आहे आणि लाभस्थानाचा प्रबळ कार्येश असलेल्या गुरु ने मुंडी हलवली असेल! 

विवाहाच्या बाबतीत दोन महत्त्वाचे भाव: सप्तम ( ७ ) आणि द्वितीय ( २ ). 

सप्तमा (७) चे कार्येश ग्रह : चंद्र / मंगळ, केतू / बुध

द्वितीय (२) भावाचे कार्येश ग्रह: चंद्र, राहू / मंगळ

म्हणजे चंद्र आणि मंगळ  या दोन ग्रहांचा या विवाहात सहभाग असावा. असा प्राथमिक अंदाज करता येईल.

गुरूच्या महादशेत सर्व ग्रहांच्या अंतर्दशा येणार, त्या तपासल्या की विवाह केव्हा झाला असावा याचा अंदाज घेता येईल.

मंदार माझ्या कडे फेब्रुवारी २०२४ मध्ये आला आहे, त्या आधीच त्याचा घटस्फोट झालेला आहे.समजू सहा महीन्या पूर्वी. आता विवाह ते घटस्फोट या घटनाक्रमाला किमान तीन वर्षे तरी लागली असणार, म्हणजे आजच्या तारखेच्या सुमारे ४ वर्षे आधी म्हणजे अंदाजे २०२० च्या आधी मंदारचा विवाह झालेला असण्याची शक्यता आहे.

मंदारची गुरु महादशा फेब्रुवारी २०१३ सुरू झाली आहे. मंदारचा विवाह २०२० च्या आधी झाला असला पाहिजे असा आपला कयास आहे,  त्यानुसार २०१३ ते २०२० या कालावधीत :

गुरु – गुरु

गुरु – शनी

गुरु  – बुध

गुरु – केतू 

या चार अंतर्दशा येतील.

गुरु महादशेतली गुरु अंतर्दशा मार्च २०१५ ला संपली, ही अंतर्दशा विचारात घेता येणार नाही कारण या काळात मंदार वयाच्या पंचविशीत होता, त्या काळात विवाह होण्याची शक्यता वाटत नाही.

ऑक्टोबर २०१७ ला संपणारी शनी अंतर्दशा मंदार २५ ते २७ या वयोगटात असताना आली होती. २७ चे लग्नाचे वय असू शकते त्यामुळे या शनी अंतर्दशेच्या शेवटच्या काही विदशा विवाहाला अनुकूल असातील तर हे शक्य आहे. तेव्हा शनी अंतर्दशा विचारात घेता येईल. पण पुढच्या बुध आणि केतू च्या अंतर्दशा तपासणे आवश्यक आहे.

शनीचे कार्येशत्व: ११ / १० / ३, ८ / ११, १२ 

बुधाचे कार्येशत्व: ११ / १० / ३, ८ / ४, ७

केतू चे कार्येशत्व: १० / ५ / ४, ७ / —- राशी स्वामी चंद्र: ९ / ७ / २, ९ / ५ , दृष्टी रवी: १० / १० / ६ / ६ , दृष्टी शुक्र: १० / ११/ ६ / ३, ८

तसे पाहिले तर या तीनही अंतर्दशा विवाहाच्या दृष्टीने फारशा उत्साह वर्धक नाहीत, विवाहाच्या दृष्टीने सुयोग्य अशा चंद्र आणि मंगळ अंतर्दशा अजून यायच्या आहेत.

त्यातल्या त्यात बुधाची अंतर्दशा बरी दिसते. या अंतर्दशेचा कालावधी ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०२० असा आहे. या कालावधीत जातकाचा विवाह झाला असेल का? 

हो कोंडी फोडण्यासाठी मी ‘सेकंडरी प्रोग्रेशन्स – दिनवर्ष’ या पाश्चात्य तंत्राचा वापर करन आणखी काही धागे दोरे हाताला लागतात ते पहायचे ठरवले. 

२०१७ ते २०२० हा कालावधी विचारात घेतला आहे म्हणून मी त्याचा मध्य म्हणजे १ जाने २०१९ या तारखेची सेकंडरी प्रोग्रेशन तपासली,

१ जाने २०१९ चा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट खाली दिला आहे. 

०१ जाने २०१८ चा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट खाली दिला आहे. 

आता प्रोग्रेस्ड दशम बिंदू ००:५० कुंभ आणि जन्मस्थ शुक्र २९: ०१ मकर असे आहेत, अंशात्मक युती अधिक जवळ आली आहे, त्यात आता २ अंशाचे अंतर आहे.

आणखी मागे जायचे ठरवले, १५ मार्च २०१६ या तारखेची सेकंडरी प्रोग्रेशन तपासली,

१५ मार्च २०१६ चा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट खाली दिला आहे. 

आता प्रोग्रेस्ड दशम बिंदू २९: ०१ मकर आणि जन्मस्थ शुक्र २९: ०१ मकर , आता ही युती अगदी तंतोतंत आहे.

यावरून असा अंदाज करता येईल की जातकाचा विवाह २०१६ च्या च्या पहिल्या काही महिन्यात ( फेब्रु – एप्रिल) झाला असण्याची शक्यता आहे. 

या कालावधीत जातकाची गुरु महादशा – शनी अंतर्दशा चालू होती, त्यात १५ मार्च २०१६ या तारखेच्या अंगाने विचार केल्यास, गुरु – शनी – शुक्र अशी साखळी मिळते.

शुक्राचे कार्येशत्व: १० / ११/ ६ / ३, ८  असे आहे.

गुरु, शनी आणि शुक्र तिघेही विवाहा साठीचे आवश्यक असे सप्तम (७) स्थान देत नाहीत, विदशा पातळी गाठली पण अद्याप सप्तम ( ७ ) स्थान नाही इतकेच नव्हे तर द्वितीय (२) स्थान देखील कोणी देत नाही असे असताना विवाह कसा शक्य आहे? याचा अर्थ शुक्राची विदशा न घेता त्याच्या पुढच्या/ मागच्या विदशा तपासू जी सप्तमा (७) ची जोरकस कार्येश असेल.

त्या दृष्टाने पाहता चंद्र हा एकमेव आहे जो सप्तम ( ७) आणि द्वितीय (२) दोन्ही स्थानांचा बळकट कार्येश आहे, 

गुरु – शनी – चंद्र ही साखळी योग्य वाटते आणि हा कालावधी येतो, सप्टेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१६.

या कालावधी सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्टने दिलेल्या कालावधीशी जुळत आहे, जो काही काही महिन्यांचा फरक दिसत आहे तो जन्मवेळेतल्या तफावती मुळे पडला असावा.

कालनिर्णय करताना गोचरीचा कौल घेणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने सप्टेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१६.या आपल्या अपेक्षित कालावधीतले गोचर तपासले. नोव्हेंबरच्या मध्यावरचे गोचर अधिक आश्वासक दिसले. या काळात:

गोचरीचा गुरु कन्येतून भ्रमण करत होता, म्हणजे जातकाच्या सप्तम (७) स्थानातून, त्याची जातकाच्या जन्मस्थ चंद्राशी राशात्मक युती!  विवाहा साठी आणखी काय हवे?

मंदार माझ्याकडे फेब्रुवारी २०२४ मध्ये आला आहे, त्याच्या विवाहा बाबत आपण अंदाज केला आहे तो नोव्हेंबर – डिसेंबर २०१६ चा. आता विवाह झाल्या नंतर अगदी लगेचच घटस्फोटाची पावले उचलली गेली तरी कायदेशीर सोपस्कार पूर्ण व्हायला किमान दोन वर्षे (२०१७-२०१८) तरी लागणारच त्या हिशेबाने घटस्फोट साधारण २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत झाला असण्याची शक्यता जास्त आहे.

आता या पाच वर्षांच्या कालावधीत गुरु महादशाच असणार आहे त्यामुळे आता आपल्याला या कालावधीत येणाऱ्या अंतर्दशा तपासाव्या लागतील. 

या अंतर्दशा अशा आहेत:

Screenshot

बुधाचे कार्येशत्व: ११ / १० / ३, ८ / ४, ७

केतू चे कार्येशत्व: १० / ५ / ४, ७ / —- राशी स्वामी चंद्र: ९ / ७ / २, ९ / ५ दृष्टी रवी: १० / १० / ६ / ६ दृष्टी: शुक्र: १० / ११/ ६ / ३, ८

शुक्राचे कार्येशत्व:  १० / ११ / ६ / ३,८ 

रवीचे कार्येशत्व: १० / १० / ६ / ६ 



घटस्फोटा साठी षष्ठम ( ६ ) आणि दशम (१०) या दोन भावांचा प्रामुख्याने विचार करायचा.

षष्ठम ( ६ ) भावाचे कार्येश ग्रह: रवी आणि शुक्र

दशम (१०) भावाचे कार्येश ग्रह: रवी, मंगळ, शुक्र, केतू आणि गुरु


या सर्वांचा विचार करता शुक्र आणि रवी या दोन अंतर्दशा विवाहाच्या विरोधी दिसतात कारणे हे दोन्ही ग्रह षष्ठम ( ६ ) आणि दशमा  ( १० ) चे ‘अ’ दर्जाचे कार्येश आहेत.

या दोन अंतर्दशांचा. संयुक्त कालावधी डिसेंबर २०२० ते जून २०२४ असा येतो. म्हणजे सुमारे साडे तीन वर्षांचा. 

आता या दोन अंतर्दशा पैकी कोणाची निवड करायची? घटस्फोट या अंगाने विचार करता दोघेही अत्यंत तगडे आहेत, मग यातले कोण? पुन्हा एकदा आपण ‘सेकंडरी प्रोग्रेशन्स – दिनवर्ष’ या पाश्चात्य तंत्राचा वापर करन आणखी काही धागे दोरे हाताला लागतात ते पाहू. 

 
या साडे तीन वर्षांचा मध्य म्हणून मी ०१ सप्टेंबर २०२२ हा दिवस निवडला,

01 सप्टेंबर 2022 या दिवशीचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट खाली दिला आहे.

घटस्फोटाचा विषय आहे म्हणजे शुक्र, सप्तम बिंदू, मंगळ, प्लुटो, शनी या मध्ये काही अशुभ योग होत आहेत का ते तपासले पाहिजे. 

आणि काय आश्चर्य, विवाहाच्या दृष्टीने एक अत्यंत घातक योग तयार होत होता!  प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू आणि जन्मस्थ प्लुटो यांच्या मधला युती योग! या दिवशी प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू १६:१८  वृश्चिकेवर होता, जन्मस्थ प्लुटो १७:२८ वृश्चिकेवर आहे!  प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू अजून ०१:१० अंश पुढे सरकला की दोघांत अगदी तंतोतंत युती होईल.

याचा अर्थ घटस्फोटाची घटना घडायला अजून काही काळ लागणार आहे.

चार्ट अनिमेट करत ०७ सप्टेंबर २०२३ ही तारीख घेतली,



०७ सप्टेंबर २०२३ दिवशीचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट 

आता प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू  आणि जन्मस्थ प्लुटो दोघेही १७:२८ वृश्चिकेवर आहेत, दोघांत अगदी तंतोतंत युती होईल.

सप्टेंबर 2023 च्या सुमारास जातकाचा घटस्फोट झाला असला पाहिजे!

आता या नुसार अंतर्दशा/ विदशा तपासू. 

रवी ची अंतर्दशा, जी ऑगष्ट  २०२३ ते जून  २०२४ अशी होती, ती इथे जुळते. 

रवीच्या अंतर्दशेत रवीचीच विदशा महत्त्वाची ठरेल कारण पुढच्या चंद्र आणि मंगळाच्या विदशा घटस्फोट देणार नाहीत.

गुरु महादशा –  रवी अंतर्दशा – रवी विदशा हा कालावधी १६ ते ३० ऑगस्ट २०२३ असा आहे. 

या काळातील गोचर बघितले तर, गोचरीचा प्लुटो आणि जन्मस्थ शुक्र यांच्यात अंशात्मक युती, जन्मस्थ शुक्र आणि गोचरीचा राहू यांच्यात केंद्र योग. गोचरीचा मंगळ जन्मस्थ युरेनस शी पूर्ण अंशात्मक केंद्र  योग करणार आहे.  


म्हणजे साधारण  १६ ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीतच घटस्फोट झाला असेल.

 
जातकाचा विवाह आणि घटस्फोट या दोन्हींच्या बाबतचा माझा अंदाज नोंद करून ठेवला.

Similar Posts

One Comment

  1. सर , मंदार चा दुसरा विवाह 25 जुन 2025 रोजी झाला आहे .

Leave a Reply to Atul Barve Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *