आदितीच्या बाबतीतला कन्सलटेशन चार्ट इतका स्पष्ट होता की त्यातील महत्वाच्या ग्रहस्थितींची व ग्रहयोगांची नोंद घ्यायला आणि त्यांचा अर्थ लावायला मला पाच मिनीटां पेक्षाही कमी वेळ लागला असेल, हे काम पुर्ण होताच मी आदिती कडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले.
“बोला, काय प्रश्न आहे?”
“माझा संसार मोडला हो..”
आदिती फक्त एव्हढेच बोलू शकली, पुढे फक्त धो धो रडणे होते! मला हे नविन नव्हते, अशा काही केसेस या पूर्वी येऊन गेल्या असल्याने मुळे असे प्रसंग कसे हाताळायचे हे मला चांगले माहिती आहे.
आदितीच्या रडण्याचा जोर किंचित ओसरण्याची वाट पाहीली, अर्थात एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी असलेल्या आदितीला स्वत:ला सावरायला फारसा वेळ लागला नाही. आदिती काहीशी शांत होताच मी प्रश्नोत्तरें चालू केली. अर्थात ‘कंसलटेशन चार्ट’ ने आपले काम ईतके चोख बजावले होते की मला जास्त काही विचारावे लागलेच नाही.
आदितीचा प्रश्न अगदि सरळ आणि स्पष्टच होता: “घटस्फोट कधी मिळेल?”
(घटस्फोटा मागची कारणे काय ते मला विचारावे लागलेच नाही , भाग-१ मध्ये दिलेल्या ग्रहयोगांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर आपल्यालाही ती सहज ओळखता येतील ! आदिती जेव्हा जायला निघाली तेव्हा केवळ एक उत्सुकता म्हणून घटस्फोटाची कारणे जी मी तर्क केला होता तीच आहेत का ते विचारले, त्यावर आदितीने “हो, अगदी हीच कारणें आहेत. पण तुम्ही कसे काय ओळखलेत? ” असा सवाल केला ! )
मी फक्त प्रकरण कोर्टात दाखल झाले आहे का? पोटगी, मुलांची कस्ट्डी, मालमत्ता, क्रिमिनल असे काही आहे का ते विचारले कारण अशी गुंतागुंत असते तेव्हा प्रश्नाचा विचार अनेक अंगाने करावा लागतो. आदितीच्या बाबतीत यातले काही नव्हते. विवाह होऊन अवघी दोन वर्षे तर झाली होती, त्यातही शेवटचे सहा महीने ती विभक्तपणे आपल्या माहेरीच राहात आहे.
आदितीने तीची जन्मपत्रिका सोबत आणली होती पण हा प्रश्न मी प्रश्नकुंडलीच्या माध्यमातूनच सोड्वायचा ठरवले. आदितीला प्रश्नकुंडली व होरारी नंबर विषयी काही सांगणार इतक्यात तीच म्हणाली “प्रश्नकुंडली मांडणार आहात का ? मला माहीती आहे के.पी.ची प्रोसीजर..”
आदिती या आधीच कोणा एका ‘के.पी.’ वाल्या कडे जाऊन आली होती त्यामुळे प्रश्न कुंडली व होरारी नंबर ( तोच जो १ ते २४९ मधला असावा लागतो, तो उत्स्फूर्त पणे सुचलेला असावा, लकी नंबर, जुळवलेला नंबर असा नसावा ईत्यादि ईत्यादि..) याबद्द्ल तीला माहीती होती.
मी फक्त त्या ‘के.पी. वाल्या’ कडे कधी गेली होती ते विचारले, कारण एकच प्रश्न पुन्हा पुन्हा, एकाच किंवा दुसर्या ज्योतिषाला विचारु नये. त्यात काही महिन्यांचे अंतर असावे किंवा दरम्यानच्या काळात त्या प्रश्ना संदर्भात काही नविन घटना घडलेल्या असणे आवश्यक असते.
त्या के.पी. वाल्याने तीला काय सांगीतले होते हे मी विचारायच्या फंदात पडलो नाही, कारण ते त्या व्यक्तीचे अनुमान असणार , मी माझे निष्कर्ष माझ्या स्वत:च्या अभ्यासावरच निश्चित करतो. दुसर्या ज्योतीषा बद्दल किंवा त्याने/तिने केलेल्या भाकितां बद्दल किंवा त्यांच्या ‘कार्यपद्धतीं’ बद्दल कोणतेही मतप्रदर्शन मी करत नाही. हा माझ्या व्यावसायीक नितीमूल्यांचाच एक भाग आहे.
आदितीने नंबर दिला :’७४’.
या नंबरावरुन बनवलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.
प्रश्नकुंडलीतला चंद्र जातकाच्या मनातले विचार / प्रश्न अगदी चोखपणे दाखवतो किंबहुना असेही म्हणता येईल की जर चंद्र प्रश्नाचा संदर्भातल्या भावांचा कार्येश होत नसेल तर ती प्रश्नकुंडली निरुपयोगी समजावी. असे होण्या मागे काही कारणें आहेत:
- जातकाने वेळच चुकीची निवडली, जातकाला आत्ता या क्षणीं काही मार्गदर्शन मिळावे अशी साक्षात नियतीचीच योजना नाही! अशा वेळी जातकाला परत पाठवावे, पुन्हा केव्हातरी त्याच्या प्रश्नासाठी नविन कुंडली मांडता येईल.
- जातकाने होरारी नंबर देताना , आपल्या प्रश्नांवर पुरेसे लक्ष केंद्रित केलेले नसावे. जातकाला ‘प्रश्नकुंडली’ बाबतीत थोडी माहीती देऊन त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करायला सांगता येते.
- जातकाने अगदी सहज म्हणून प्रश्न विचारला असणार, त्या मागे फारसे गांभिर्य नसावे. किंवा टिंगल-टवाळीच्या हेतुने प्रश्न विचारला असेल. थोड्याशा अनुभवाने आणि बर्याचशा सजगतेने ‘खरा जातक ‘ कोण आणि ‘खोटा जातक’ कोण हे कळतेच , मग त्याप्रमाणे कार्यवाही(?) करावी लागते.
- जातकाच्या मनात दुसरेच काहीतरी घोळते आहे, जातकाला आपला प्रश्नाची व्यवस्थित मांडणी करता आलेली नाही. अशा प्रसंगी जातकाला बोलते करुन , प्रश्न नेमका काय हे स्पष्ट करुन घ्यावे व पुन्हा एकदा नविन नंबर मागावा.
जातकाने प्रश्न विचारायची वेळ आणि प्रश्नकुंडलीची वेळ एकच असल्यासच चंद्र प्रश्नाचा रोख बरोबर दाखवतो , पण जर प्रश्न विचारता क्षणीच प्रश्न कुंडली मांडली गेली नसेल तर चंद्र तपासायच्या भानगडीत पडू नका. फक्त प्रश्न वेळेचा चंद्रच काय तो मनाचा आरसा मानता येईल, ईतर वेळीचा नाही.
आदितीच्या बाबतीत तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रुंचे लोट पाहता वरिल सर्व बाबीं तपासायची खरे तर काहीच आवश्यकता नव्हती इतका तिचा प्रश्न तळमळीचा दिसत होता, तरीही आदितीच्या प्रश्नकुंडलीतला चंद्र काय म्हणतो ते जाणुन घेणे औत्सुक्याचे ठरेल, तळमळीने विचारलेला प्रश्न चंद्र कसा बरोबर दाखवतो तेही समजेल.
पण त्या आधी आपण ‘घटस्फोट’ या घटने साठी कोणते ‘भाव’ विचारात घ्यावे लागतात ते पाहूया.
घटस्फोट म्हणजे विवाहविच्छेद, विवाहासाठी आपण २, ७, ११ ही स्थाने विचारात घेतो. मग घटस्फोटाला अगदी याच्या विरुद्धची स्थाने बघितली पाहीजेत , म्हणजे २, ७, ११ ची व्ययस्थाने १ , ६ , १० ही स्थाने. जातका साठी प्रथम स्थानाचे व्ययस्थान , मन:स्तापाचे स्थान आणि जातकाच्या वैवाहीक जोडीदाराचे षष्ठम (६) स्थान असल्याने व्ययस्थान (१२) ही विचारात घ्यावे लागते (विवाह असो वा घटस्फोट,त्यात पती-पत्नी दोघेही एकाच वेळी गुंतलेले असतात तेव्हा जातका बरोबरच त्याचा वैवाहीक जोडीदार विचारात घेणे आवश्यक आहे.). घटस्फोट जेव्हा कायदेशीर पद्धतीने होतो तेव्हा तो एक प्रकारचा न्यायनिवाडाच असतो, म्हणजे काही करार,निकाल, न्यायाधीश हा भाग अपरिहार्य आहे, त्यामुळे त्रितिय (३) स्थानाची (करार मदार, युक्तीवाद, साक्षी-पुरावे,दस्तऐवज) उपस्थिती अनिवार्य आहे तसेच गुंतागंतीच्या प्रकरणात न्यायालय व निकालपत्र महत्वाचे ठरते त्यामुळे नवम स्थान (९) पण विचारात घ्यावे लागते. पोटगी वा अन्य नुकसान भरपाईची मागणी असेल तर अष्ट्म (८) स्थानही सक्रिय असावे लागते. एकदाचा काय तो घटस्फोट व्हावा आणि या त्रासातून सुटका व्हावी अशी जातकाचीच अत्यंत तळमळीची ईच्छा असल्यास ईच्छापूर्तीचे लाभस्थान (११) ही विचारात घ्यावे लागेल.
पण विवाहयोग बघायचा असो वा घटस्फोट, सप्तम (७) हाच प्रमुख भाव समजायचा.
आदितीच्या प्रश्नकुंडलीतला चंद्र काय म्हणतो ?
चंद्र षष्ठ्म (६) स्थानात आहे व लग्नेश (१) आहे, चंद्र शुक्राच्या नक्षत्रात असून, शुक्र दशमात (१०) आहे. शुक्र लाभेश (११) आणि सुखेश (४) आहे.
चंद्र षष्ठ्म (६) स्थानात आहे व लग्नेश (१) आहे, चंद्र शुक्राच्या नक्षत्रात असून, शुक्र दशमात (१०) आहे. शुक्र लाभेश (११) आणि सुखेश (४) आहे.
चंद्राचे कार्येशत्व असे आहे: चंद्र : १० / ६ / ११, ४ / १
या पैकी १०, ६ व १ ही स्थाने विवाहा संदर्भातल्या २ , ७ व ११ या स्थानंची व्ययस्थाने म्हणजेच विरोधी स्थाने आहे. आदितीच्या मनात ‘घ-ट-स्फो-ट’ हा एकमेव ज्वलंत विषय असल्याने चंद्राने ही दुखरी नस अगदी अचूक पकडली आहे !
हा पहा – ‘मनाचा आरसा!’
प्रश्न घटस्फोटाचा आहे, म्हणजे सप्तम स्थान (७) अति महत्वाचे, या स्थानाचा सबलॉर्ड आपल्याला सांगेल, आदितीचा घटस्फोट होणार किंवा नाही.
नियम अगदी सरळ आहे:
सप्तमाचा ( ७ ) सब जर ६ किंवा १२ चा कार्येश असेल आणि त्याच्या त्रितिय (३) स्थानाशी संबंध येत असेल तर घटस्फोटाची शक्यता जास्त असते.
या प्रश्नकुंडलीत सप्तमाचा सबलॉर्ड आहे : गुरु.
गुरु व्ययात (१२) असून षष्ठेश (६) आणि नवमेश (९) आहे. गुरु स्वत:च्याच नक्षत्रात आहे. गुरु वक्री नाही. गुरु चे कार्येशत्व असे आहे: गुरु : १२ / १२ / ६,९ / ६,९
गुरु स्वत: व्ययात असून , मिथुने सारख्या द्विस्वभावी राशीत आहे , स्वनक्षत्री आहे हे या प्रश्ना संदर्भातले अत्यंत महत्वाचे exhibit (सबळ पुरावा) आहे!
गुरु बुधाच्या युतीत आहे, . बुध लाभात (११), व्ययेश (१२) आणि त्रितीयेश (३) ; बुध राहुच्या नक्षत्रात , राहु त्रितिय स्थानात (३) म्हणजे बुधाचे कार्येशत्व असे असेल: बुध: ३ / ११ / – / १२, ३
सप्तमाच्या सबलॉर्डचा बुधाच्या माध्यमातून त्रितिय (३) स्थानाशी प्रथम दर्जाचा संबंध येत आहे. सप्तमाचा सबलॉर्ड गुरु सप्तम (७) , द्वीतीय (२) या स्थानांचा कार्येश होत नाही. म्हणजे पती-पत्नीत मनोमिलन होण्याची शक्यता नाही .उलटपक्षी १२, ६ कार्येशत्व तर विवाहाच्या संपूर्ण विरुद्धच आहे. त्रितिय (३) स्थानाशी संबध त्याला पुष्टी देतो, म्हणजे: आदितीचा कायदेशीर घटस्फोट होण्याची खूप मोठी शक्यता आहे. पती-पत्नी पुन्हा एकत्र नांदायची शक्यता जवळजवळ नाहीच. एकतर घटस्फोट होईल अथवा घटस्फोट न घेता दोघेही विभक्त राहतील.
आता यापैकी नेमके काय होईल हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला आगामी काळातल्या दशा- विदशा- अंतर्दशा काय फळें देणार आहेत ते पाहूया.
मामला घटस्फोटाचा आहे, सध्या पती-पत्नी विभक्त राहताहेत, प्रकरण अजून कोर्टात गेलेले नाही पण आदितीच्या म्हणण्यानुसार लौकरच ती पायरी गाठली जाऊ शकते. घटस्फोटाचे खटले (सहसा) ‘कुटुंब न्यायालयात’ चालवले जातात व पती-पत्नी सह-समतीने ,सामंजस्याने (घटस्फोट घेण्या बाबतीतच !) घटस्फोट मागत असतील आणि इतर काही गुंतागुंत नसेल (उदा. मुलांची कस्ट्डी, पोटगी, मालमत्तेचे वाटप, गुन्हेगारी स्वरुपाची कृत्यें इ.) तर निकाल साधारण पणे वर्षाच्या आतबाहेर लागू शकतो. हे विचारात घेऊन मी साधारणपणे वर्ष-सव्वा वर्षाचा कालवधी तपासायचे ठरवले.
या ठिकाणी मी दोन महत्वाच्या मुद्द्यांची आपल्याला आठवण करुन देतो:
- प्रश्नकुंडली साठी एक कालमर्यादा निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. कारण प्रश्नकुंडलीचा आवाका (कालमर्यादा) काही महिन्यां इतकाच असते, उगाच प्रश्नकुंडली घेऊन त्यावरुन पुढच्या पाच-दहा वर्षाचे किंवा उभ्या आयुष्याचे भाकित करु नयें. प्रश्नकुंडली ही एका विषीष्ठ प्रश्ना साठी तयार केलेली असते , तीला एक कालमर्यादा असते आणि ज्या प्रश्ना साठी ती बनवली त्याचे उत्तर मिळवून झाले की ती त्याक्षणी निरुपयोगी होते म्हणजेच ती ‘वन टाइम युज -डिस्पोजेबल’ अशी असते. प्रश्नकुंडली अगदी जन्मकुंडली सारखी काम करते असा प्रचार काही के.पी. वाले करतात ते मला योग्य वाटत नाही.
- जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते (कोर्टात केस दाखल झालेली असते) तेव्हा त्याच्या निकाला बद्दल कोणतेही भाकित करु नये, असे भाकित करणे हा न्यायालयाचा अवमान ठरतो (contempt of the Hon’ble Court) आणि हा एक गुन्हा असून त्याला तात्काळ शिक्षा दिली जाते हे लक्षात ठेवा!
असो.
आपण आता आदितीच्या प्रश्नकुंडली कडे वळूयात आणि दशा- अंतर्दशां- विदशां चा कानोसा घेऊयात.
प्रश्न विचारते वेळी ‘शुक्रा’ ची दशा चालू होती.
शुक्र दशमात (१०), लाभेश (११) आणि चतुर्थेश (४) ; शुक्र स्वत:च्याच नक्षत्रात, म्हणजे शुक्राचे कार्येशत्व असे असेल: शुक्र: १० / १० / ११,४ / ११,४
शुक्र वक्री शनीच्या अंशात्मक प्रतियोगात! शनी चतुर्थात (४), सप्तमेश (७) आणि अष्टमेश (८) ; शनी गुरुच्या नक्षत्रात , गुरु व्ययात (१२) असून षष्ठेश (६) आणि नवमेश (९) म्हणजे शनीचे कार्येशत्व असे असेल: शनी: १२ / ४ / १२, ६ / ७,८
शुक्राचा सब आहे बुध. बुधाचे कार्येशत्व आपण पाहीलेच आहे: बुध: ३ / ११ / – / १२, ३
शुक्राचे एकंदर कार्येशत्व पाहता (१०), त्याच्या वरची वक्री शनीची दृष्टी (स्वत: शनी १२, ६ च्या माध्यमातून विवाहाच्या विरुद्ध फळें देणार आहे) , शुक्राचा सब ही १२, ३ च्या माध्यमातून विवाहाच्या विरोधीच सुर काढत आहे. तात्पर्य काय तर ही शुक्र महादशा आदितीला महागात पडणार, घटस्फोटाची शक्यता निश्चितच आहे.
शुक्राची ही महादशा नोव्हेंबर २०३० पर्यंत म्हणजे अजून १६ वर्षे चालणार असल्याने आपल्याला ह्या दशेत येणार्या अंतर्दशा –विदशांचा विचार करायलाच पाहीजे.
प्रश्न करते वेळी शुक्राच्या दशेत रवीची अंतर्दशा चालू असून ती २५ मार्च २०१५ पर्यंत असेल, हा कालवधी सुमारे ९ महिन्यांचा आहे, घटस्फोट होणार का नाही याचा निकाल या कालावधीत लागू शकेल पण काही वेळा अशी प्रकरणें लांबतात म्हणून पुढची ही एक अंतर्दशा आपल्याला तपासली पाहीजे, पुढची अंतर्दशा चंद्राची असेल, ती २३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत चालेल. मला वाटते एव्हढा कालावधी पुरेसा ठरेल.
रवी लाभात (११), धनेश (२) ; रवी मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ त्रितिय स्थानात (३) असून पंचमेश (५) आणि दशमेश (१०) म्हणजे रवीचे कार्येशत्व असे असेल: रवी: ३ / ११ / ५ , १० /२
रवी एका विषेषाधीकाराने सप्तमाचा (७) प्रथमदर्जाचा कार्येश होतो! तो कसा?
जरा प्रश्नकुंडलीतल्या सप्तमभावा (७) कडे पहा. कोण आहेत या भावाचे कार्येश? सप्तमभावारंभी शनीची मकर रास आहे म्हणजे शनी भावाधिपती म्हणून सप्तमाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश होतो. सप्तमात कोणताही ग्रह नाही, म्हणजे सप्तमासाठी कोणी ‘अ’ व ‘ब’ दर्जाचे कार्येश नाहीत. शनीच्या नक्षत्रातही कोणताही ग्रह नाही म्हणजे कोणी ‘क’ दर्जाचा कार्येश नाही! याचा अर्थ फक्त शनी एकमेव कार्येश आहे. अशी परिस्थिती येते तेव्हा (आणि तेव्हाच फक्त) शनीच्या उपनक्षत्रातले ग्रह सप्तमाचे ‘क’ दर्जाचे कार्येश होतात, आणि या परिस्थितीत ‘अ’ व ‘ब’ दर्जाचे कार्येश उपलब्ध नसल्याने हे ‘क’ दर्जाचे कार्येशच प्रथमदर्जाचे कार्येश ठरतात! आता हे पाहायचे की असे ग्रह कोणते आहेत ज्यांचा ‘सब’ शनी आहे? वर छापलेला तक्ता पाहीलात तर हे लक्षात येईल की रवी आणि शनी हे दोघे शनीच्या ‘सब’ मध्ये आहेत , थोडक्यात रवी सप्तमाचा (७) चा प्रथम दर्जाचा कार्येश होत आहे!
रवीचा सब शनी आहे, शनीचे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे ते असे: शनी: ७, १२ / ४ / १२, ६ /७,८
रवी अंतर्दशा ७ च्या प्रथमदर्जाच्या कार्येशत्वामुळे रवीच्या अंतर्दशेत घटस्फोट होईल असे मला वाटत नाही. जास्तीतजास्त काय होऊ शकेल? रवीचे त्रितिय स्थानाचे (३ ) कार्येशत्व पाहता त्याच्या कालावधीत घटस्फोटाच्या दृष्टीने काही पावले उचलली जातील. कोर्टात अर्ज (३) दाखल होईल, कागदपत्रांचे खेळ (३) होतील, काही वाटाघाटी (समुपदेशन- counseling) जरुर होतील, कदाचित समुपदेशन किंवा अन्य मध्यस्तीच्या प्रयत्नांमुळे पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतील ( ७, २, ११) असा कयास करता येईल
आतापर्यंत विवाहा साठीचे प्रबळ विरोधी स्थान ‘षष्टम (६)’ स्थान महादशा स्वामी शुक्र, अंतर्दशा स्वामी रवी, शनी व बुध या पैकी कोणीही ‘अ’ दर्जाच्या कार्येशत्वाने दिलेले नाही. त्यामुळे रवीची अंतर्दशा संपे पर्यंत तरी यांचा घटस्फोट होणार नाही, जर यांचा घटस्फोट होणारच असेल तर त्यासाठी ‘षष्टम (६)’ स्थानाचा ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जाचा कार्येश असलेल्या ग्रहाची अंतर्दशा / विदशा यावी लागेल.
आता पुढची चंद्राची अंतर्दशा पाहीली की आदितीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे ते आपल्याला कळेल. चंद्राचे कार्येशत्व आपण पाहीले आहे :
चंद्र : १० / ६ / ११, ४ / १
या पैकी १०, ६ व १ ही स्थाने विवाहा संदर्भातल्या २ , ७ व ११ या स्थानंची व्ययस्थाने म्हणजेच विरोधी स्थाने आहे. चंद्राचा सब आहे रवी (३ ,७/ ११ / ५ , १० /२ ) जो घटस्फोटची प्रक्रिया पूर्ण करायला मदत करणारच आहे . चंद्र हा गुरुच्या (१२ / १२ /६,९ / ६,९ ) व बुधाच्या (३ / ११ / – / १२, ३) प्रतियोगात आहे, म्हणजे चंद्राचे घटस्फोटाच्या दृष्टिकोनातले कार्येशत्व आगीत तेल ओतल्या सारखे अधिकच प्रबळ होत आहे.
म्हणजे चंद्राच्या या अंतर्दशेत आदितीचा घटस्फोट होण्याची फार मोठी शक्यता आहे!
प्रश्न वेळे पासुन सुमारे ९ महिन्यांनी २५ मार्च २०१५ ला चंद्राची अंतर्दशा चालू होऊन ती २३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत म्हणजे सुमारे दीड वर्षे चालणार आहे. घटस्फोटाच्या निवाड्या साठी हा कालावधी पुरेसा आहे.
पण दीड वर्षे हा मोठा कालावधी आहे, आपल्या आणखी सुक्ष्मता आणायची आहे.
आता चंद्राच्या अंतर्दशेत सगळ्याच ग्रहांच्या विदशा येणार मग त्यातून कोणती निवडायची? चंद्राच्याच अंतर्दशेत चंद्राचीच विदशा प्रथम येईल ती अर्थातच प्रबळ दावेदार असेल.
त्यानंतर मंगळाची विदशा येईल. मंगळ त्रितिय स्थानात (३) असून पंचमेश (५) आणि दशमेश (१०), मंगळ चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र स्वत: षष्ठ्म (६) स्थानात आहे वा लग्नेश (१)आहे. म्हणजे मंगळाचे कार्येशत्व असे असेल. मंगळ: ६ / ३ / १ / ५,१०
मंगळाचा सब बुध (३ / ११ / – / १२, ३) आहे . मंगळ षष्टम (६ ) स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे, मंगळाचा नैसर्गिक गुणधर्मच ‘तोड-फोड / मारा-काटा ‘ असा असल्याने चंद्राच्या अंतर्दशेत येणारी मंगळाची विदशा घटस्फोट घडवून आणायची शक्यता जास्त आहे. मंगळाच्या विदशेचा कालावधी आहे १५ मे २०१५ ते २० जुन २०१५.
आता ट्रांसीट्स तपायाचे, ते जुळले नाहीत तर नंतरच्या विदशांचा (राहु, गुरु, शनी ई.) विचार करावयाचा.
आपली दशा –अंतर्दशा –विदशा साखळी शुक्र- चंद्र- मंगळ अशी आहे आणि अपेक्षित कालावधी आहे १५ मे २०१५ ते २० जुन २०१५.
कालवधी वर्षाच्या आतला असल्याने रवीचे गोचर भ्रमण तपासायचे.
१५ मे २०१५ रोजी रवी शुक्राच्या वृषभेत दाखल होईल. वृषभेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्रे आहेत. २६ मे २०१५ रोजी रवी शुक्राच्या राशीत, चंद्राच्या नक्षत्रात दाखल होईल, तो ८ जून २०१५ पर्यंत या नक्षत्रात असेल, आदितीचा घटस्फोट याच १४ दिवसांत होईल. त्यातही रवी जेव्हा मंगळ ( ६ / ३ / १ / ५,१० ) किंवा राहुच्या (३ , ५ , १०) सब मध्ये असेल तेव्हाच निकाल दिला जाईल. मंगळाचीच शक्यता जास्त कारण त्या सुमारासच मंगळ व वक्री बुध अंशात्मक युतीत असतील.
प्रश्नकुंडली बरोबरच आदितीची जन्मकुंडली ही तपासली होती, पण गोपनियतेच्या संकेता मुळे ती इथे देता येणार नाही. पण एक सांगतो, आदितीच्या जन्मपत्रिकेत शुक्र कमालीचा बिघडला आहे, त्यातच शुक्राचा युरेनसशी अगदी अंशात्मक केंद्र योग आहे. शुक्र – युरेनसचे अशुभ योग वैवाहीक जीवन कमालीचे कष्टप्रद करतात आणि दुर्दैवाने त्याचवेळी इतर कुयोग पत्रिकेत असल्यास घटस्फोट / वैधव्या (विधुर अवस्था) पर्यंत मजल जाऊ शकते. असे योग असलेल्या आणि वर लिहले आहेत तशी फळें मिळालेल्या ३००+ व्यक्तींच्या पत्रिका माझ्या संग्रहात आहेत!
युरेनस, नेपचुन व प्लुटो कडे ढुंकून ही न बघणार्या अनेक पारंपरिक / के.पी. ज्योतिषांनी जरा एकदा या तीन ग्रहांचा प्रताप अभ्यासावा, काळजाचा थरकाप होईल.
आदितीचा घटस्फोट २७ मे २०१५ रोजी झाला.
एव्हढच फक्त …… जास्त काही लिहीत नाही….
शुभं भवतु
Very nice & detailed article & also very much informative.
श्री.संतोषजी,
ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिसाद दिलात याबद्दल मी आपला आभारी आहे.
आपला
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
बरेच दिवसांनी परत लिहिण्यास सुरुवात केल्याबद्दल आभार व पुढील लिखाणास शुभेच्छा.
फार सुंदर विश्लेषण व माहिती बद्दल धन्यवाद.
पहिला भाग वाचल्यावर मनात आशा होती कि कहानीत काही twist व सर्व सुरळीत होईल, असो …
अदितीला पुढील आयुष्यात शुभेच्छा.
धन्यवाद,
श्री.अनंतजी,
धन्यवाद,
आपला
सुहास गोखले
खूपच छान.अत्यंत सोप्या वसुटसुटीत भाषेत व सविस्तरपणे आपण लिखाण केलेले आहे. वाचकाला सहजगत्या समजेल अशी आपली भाषा मनाला भावली.असेच लिखाण करून वाचकाचे ज्योतिषशास्त्राविषयीचे प्रेम व आस्था वाढेल असा विश्वास वाटतो.
श्री.शिवाजीराव,
आभिप्राया बदद्ल धन्यवाद. आपल्या सारख्यांच्या या अशा अभिप्रयांमुळेच तर सतत नविन काही लिहण्याची स्फूर्ती मिळत असते.
आपला
सुहास गोखले
अरेरे… 🙁 वाईट वाटल….
आपण explanation नेहमी खूप सविस्तर देता .. त्यामुळे वाचायला मजा येते.. आणि समजते पण…
( माफ करा पण मला एक प्रश्न आहे… उत्तर नाई दिले तरी नो प्रोब्लेम पण )
सर आदिती ताईंची जन्मलग्न कुंडली पण मिळेल का?
कारण याच ताई जर त्यांच्या लग्नाआधी ‘मी हे लग्न करू का? ‘ हा प्रश्न घेऊन आल्या असत्या तर ज्योतिष शास्त्र( by जन्मलग्न किवा प्रश्नाशास्त्र किवा इतर कोणतीही पद्धत ) त्यांची मदत करू शकले असते ना?
श्री. गौरवजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपण माझ्या ब्लॉग चे नियमित वाचक आहात आणि वाचन करुन आवर्जुन प्रतिसाद देणार्या काही मोजक्या वाचकांपैकी एक आहात.
मी माझ्या ब्लॉगवर माझ्या कडे येणार्या जातकाची ‘जन्मकुंडली’ छापू शकत नाजी कारण जन्मकुंडली मांडताना आपल्याला त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मगाव असा सारा तपशील द्यावा लागतो, ही माहीती खासगी असते व त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय तीची खासगी माहीती उघड करणे हा गुन्हा आहे याची मला कल्पना आहे , म्हणूनच माझ्याकडे येणार्यात जातकांच्या जन्मकुंडल्या गोपनियतेच्या संकेतामुळे उघड करु शकत नाही.
जर आदिती लग्ना आधी माझ्या कडे आली असती तर ह्या संभाव्य धोक्या बद्दलची कल्पना तिला देता आली असती. लग्न हे दोघांच्यात होणार असल्याने काहीवेळा जोडीदाराचे ग्रहयोग चांगले बळकट असतील येणार्या संकटाची तीव्रता कमी हऊ शकते. आदितीच्या बाबतीत उत्तम योग असलेल्या मुलाशी तिचे लग्न झाले असते तर त्या मुलाच्या ग्रहयोगांमुळे त्यांचे वैवाहीक जीवन काहिसे त्रासदायक झाले असते पण घस्फोटाची वेळ आली नसती.
शुभेच्छा
सुहास गोखले
सुहास जी, लेख एकदम फर्स्ट क्लास्सच झालाय.
आणि जन्मवेळेची नस (नाहीतर नाळ म्हणा हो) एकदम परफेक्ट पकडलीत.
अगागा! मी पण अशीच एका केपी वाल्याने सुधारून दिलेली जन्मवेळ लागली तर वापरतो.
साधारण माझ्या आजोबांनी नोंदवून ठेवलेली वेळ होती दुपारी २. ३० आणि केपी प्रमाणे आली दुपारी २. २२ त्यांच्या रुलिंग planet चार्ट प्रमाणे.
त्यावरूनच त्यांनी भविष्य वर्तविले परंतु त्यात बरेच काही घडलेच नाहि.
जाउद्या आता पुन्हा जन्मवेळ सुधारणे आले. 🙂
मंगेश शिंदे