‘”पलभर के लिए कोई हमें प्यार कर ले , झूठाँ ही सहीं'”
चिरतरुण देव आनंद आणि स्वप्नसुंदरी हेमामालीनी यांच्या वर चित्रीत केलेले हे ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातले गाणे माझ्या अत्यंत आवडीचे आहे.
माझ्या कडे आलेल्या जातकांशी बोलताना मला पदोपदी ह्या गाण्याची आठवण येत असते. या गाण्यात ‘क्षणभरासाठी का होईना , खोटे खोटे का होईना , माझ्यावर प्रम कर’ असे विनवले जात आहे , माझ्या कडे आलेल्या जातकांची हीच अपेक्षा असते … ‘क्षणभर का होईना, खोटे खोटे का होईना , काहीतरी चांगले भविष्य सांगा’ !
भारतात एखादा जातक ज्योतिषाकडे जातो तो समस्या असतानाच आणि स्वाभाविकच त्याला ‘समस्या सुटेल, ‘ ‘घरबसल्या काम होईल’, ‘ईकड्ची काडी तिकडे सुद्धा न करता नोकरी मिळेल, चपराशाची लायकी नसताना कलेक्टरच्या नोकरीचे नेमणूक पत्र हातात आणुन दिले जावे’ असे ऐकायचे असते . पत्रिकेतले ग्रहमान तसे असेल तर प्रश्नच नाही, अभिषेक बच्चन चे नाहीत का! पण बर्याच वेळा जातकाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात त्याला लाभलेले ग्रहमान यात फार मोठे अंतर असते. एखाद्या प्रश्नाबाबतची ग्रहस्थिती प्रतिकूल असते, अपयशच किंवा अनिष्ट असेच काही पदरात पडणार असते, आता एक ज्योतिषी म्हणून जे काही असेल मग ते अशुभ असले तरीही ते प्रामाणिक पणे सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो. काही ज्योतिषी जातकाला काय वाटेल असा विचार करुन एकतर या अशुभ गोष्टी सांगत नाहीत किंवा सांगीतल्या तरी खूप साखरपेरणी करुन, मुळ मुद्द्याला बगल देतात. यामुळे क्षण दोन क्षण जातकाला हायसे वाटेल पण या अशा पद्धतीने ज्योतिष सांगण्यातून जातकाला कळत नकळत का होईना अंधारात ठेवले जाते आणि त्याचा नंतर जातकालाच मोठा त्रास होणार असतो.
रोग्याला काय वाटेल / तो हे सहन करु शकणार नाही असा विचार करुन एखाद्या डॉक्टर ने रोग्याला झालेला कॅन्सर सारखा दुर्धर रोग लपवून , “काही नाही साधी किरकोळ गाठ तर आहे …” असे सांगीतले तर काय होईल याची कल्पना करा!
जे काही आहे ते स्पष्ट सांगीतले जातक क्षण दोन क्षण नाराज होईल / घाबरेल हे मान्य पण आगामी धोक्याची / संकटाची / अरिष्टाची / अडचणींची आगाऊ कल्पना मिळालेली असल्याने तो कदाचीत चांगली तयारी करुन आत्मविश्वासाने, धैर्याने त्या सगळ्याला सामोरे जाईल, योग्य ती दक्षता घेता आल्याने होणारे नुकसान काही प्रमाणात तरी का होईना तो कमी करु शकेल.
माझा जातकांच्या बाबतीतला आतापर्यंतचा अनुभव असे सांगतो की ,
शुभ भविष्यायावर जातक विश्वासच ठेवत नाही! आणि अशुभ भविष्यावर मात्र त्याचा चटकन विश्वास बसतो.
या मागे आपली मानसिकता कारणीभूत असावी. बहुतेकांचे आयुष्य कष्टात , धकाधकीत . प्रतिकूल परिस्थीतीशी झगडण्यात जात असते , आपल्या आयुष्यात चांगले काही घडतच नाही अशी बहुतेकांची पक्की धारणा असते. दु:खांच्या राशीत सुखाचे क्षण भिंग घेऊन हुडकायला लागतात. तेव्हा अशुभ / प्रतिकूल भविष्य असेल तर ते घडणारच अशी खात्रीच असते म्हणाना. शुभ भविष्याच्या बाबतीत नेमके उलट होते. असे असले तरी ‘अशुभ’ ऐकायची तयारी फार थोड्या जातकांची असते. प्रत्येकाला आपल्या मनासारखे घडावे असे वाटतच असते पण म्हणून ज्योतिषाने भविष्यात नसलेल्या गोष्टी सांगाव्यात अशी म्हणजे :
“पलभर के लिए कोई हमें खुष करले झुठा ही सहीं’ अशी अपेक्षा धरुन ज्योतिषा जाणे चुकीचेच आहे.
ज्या जातकांची अशुभ ऐकायची / स्विकारायची तयारी नाही किंवा असले धक्के ज्यांना मानसिक दृष्ट्या पेलायची तयारी / कुवत नाही त्यांनी या ज्योतिषाच्या भानगडीत न पडलेलेलेच बरे!
काही जण म्हणतात की ज्योतिषाने जातकाची मानसिकता समजून घेऊन , जातकाला पेलेल अशी भाषा वापरत , भविष्य सांगीतले पाहिजे इ. इ. हे सांगायला फार सोपे असले तरी व्यावहारीक पातळी ते करणे जवळजवळ अशक्य असते. एखाद्याच्या मानसिकतेचे इतके झटपट आणि अचूक निदान करायला भल्या भल्या मानसोपचार तज्ञांना सुद्धा जमत नाही , त्यांना ही रोग्या बरोबर दोन – चार सेशन्स घलावावे लागतात तेव्हा कोठे रोग्याच्या मानसिक स्थितीचा थोडा थोडा अंदाज येऊ लागतो. ज्योतिषी आणि जातक यांचा सहवास अवघ्या तास दीड तासाचा असतो , तेवढ्या वेळात आलेल्या जातकाची मानसिकता जाणुन घेणे आणि त्याप्रमाने शब्द योजना करणे शक्य होणार नाही करायचे म्हणले तरी मानसोपचार जसे प्रत्येक सेशन ला हजारच्या घरात फी घेतो (आणि लोक देतात!) तशी फी ज्योतिषाला द्यायला लोक तयार आहेत का? रोग बरा करेन अशी कोणतीही हमी न देणार्या डॉक्टरने मागीतलेली फी बिन तक्रार दिली जाते आणि ज्योतिषाने मात्र ३०० / ४०० रुपयात (शक्यतो फुकटच!) १००% अचुक असे खाडखाड भविष्य सांगावे (आणि भविष्य चुकले तर पैसे परत पण द्यावे!) अपेक्षा धरली जाते. जाते , इथे कोठेतरी चुकते आहे असे नाही का वाटत?
‘सुखी माणुस सोनारा कडे आणि दु:खी माणुस ज्योतीषाकडे‘ ही उक्ती यथार्थ आहे. निदान भारतातल्या लोकांचा बाबतीत तरी ती अगदीच यथार्थ आहे. ज्योतिष बघणे हा प्रकार फक्त भारतातच आहे असे नाही , संपूर्ण जगभर लोक ज्योतिषा कडे जात असतात. पण पाश्चात्यांचा ज्योतिषा कडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र एकदम वेगळा असतो, तिथे फार कमी लोक ‘नोकरी लागत नाही’. ‘लग्न होत नाही’ अशा समस्या घेऊन ज्योतिषाकडे जातात, तिथले जातक ज्योतिष शास्त्र हे केवळ ‘घटना कधी घडेल हे सांगणारे शास्त्र ईव्हेंट प्रेडीक्शन ‘ अशा अत्यंत मर्यादीत अर्थाने वापरत नाहीत. ग्रहस्थितीचा (जन्मपत्रिकतली, गोचरीची, प्रोग्रेशन्सची ) अभ्यास करुन आगामी काळातली ध्येय – धोरणे कशी ठरवायची, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची तयारी कशी व केव्हा करायची, आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेताना ग्रहस्थितीच्या अनुकुलतेचा लाभ कसा, कोठे आणि केव्हा घ्यायचा असा ज्योतिष शास्त्राचा परिपूर्ण आणि सुयोग्य वापर होत असतो…
आपल्याकडेचे ज्योतिषशास्त्र दुर्दैवाने उपाय-तोडग्यांचे दुकान थाटून बसले आहे.
आपल्या कडे मात्र परिस्थितीशी असे दोन हात करण्याची जिद्द फार थोड्याजणां कडे असते, बाकी सगळ्यांना अपेक्षा असते ती एखाद्या चमत्काराची , आणि त्यातुन सुरु होतो तो उपाय तोडग्यांचा आणि बाबा , बुवा, महाराज, स्वामी, बापू, बुवा, माँ, अक्का यांचा किळसवाणा बाजार ..
असो, या लेखात उल्लेख केलेले हे सुंदर गाणे…
चित्रपट : जॉनी मेरा नाम
गायक: किशोरकुमार आणि उषा खन्ना
गीतकार: इंदीवर
संगीतकार: कल्याणजी – आनंदजी
सौजन्य: युट्युब आणि व्हीमीओ
[su_vimeo url=”https://vimeo.com/219703317″ width=”1140″ height=”1100″]
शुभं भवतु
खरं आहे. याही पुढं जाऊन मी म्हणेन की जसं सामान्य ज्ञान प्रत्येकाला असावं, तसंच ज्योतिषशास्त्राचं किमान ज्ञान प्रत्येकाला असावं. स्वतःची कुंडली फार सखोल अभ्यासता नाही आली तरीही किमान कोणत्या कालावधीत काय काम करावं, कोणती दक्षता घ्यावी, यासंदर्भातले अंदाज बांधता येण्याइतपत तरी अभ्यास करून प्रत्येकाने या महान शास्त्राचा सदुपयोग करून घ्यावा. काही विशेष मार्गदर्शन हवे असल्यास सुहासजींसारखे ज्योतिर्विद् परमेश्वरकृपेने आपल्याला लाभलेले आहेतच!
धन्यवाद श्री. प्राणेशजी ,
सुहास गोखले