मधुमेह्याची साखर !

मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेली साखर हे एव्हाना आपल्याला चांगले माहिती झाले असेल.

ही रक्तातली साखर वाढते कशी याची जरा अधिक सुस्पष्ट कल्पना यावी म्हणुन एक आलेख आपल्या समोर मांडत आहे.

मधुमेह नसलेल्या व्यक्तींची रक्त शर्करा सामान्यत: ७० ते ९ या पातळीवर राखलेली असते ही एक आदर्श स्थिती आहे.

आपण जेव्हा काही खातो , मग तो नाष्टा असो की जेवण , त्या अन्नावर पोटात प्रक्रिया होते आणि त्याची साखर बनते , ही नव्याने तयार झालेली साखर मग रक्तात दाखल होते , त्यामुळे रक्तातल्या साखरेच्या पातळीत वाढ होते पण त्याच वेळी आपल्या शरीरातील ‘पॅन्क्रियाज’ नामक ग्रंथीतून ‘इन्शुलिन ‘ नामक संप्रेरकाची निर्मिती पण होते आणि हे ‘इन्शुलीन’ पण रक्तात मिसळले जाते , या ‘इन्शुलीन’ चा वापर करुन आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना साखर पुरवली जाते आणि हळू हळू रक्तात वाढलेल्या ह्या जादाच्या साखरेच पूर्ण निचरा होऊन रक्तातली साखर पुर्ववत आपल्या ७० ते ९० या स्थिर पातळी वर येते.

 


 


निळ्या रंगातला आलेख मधुमेह नसलेल्या व्यक्तीचा तर लाल रंगातला आलेख मधुमेही व्यक्तीचा आहे


सोबतच्या आलेखात पाहीले तर दिसेल की:

.

मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्तातली साखर सुरवातीला ८० ते ९० च्या दरम्यान होती, खाणे झाल्या नंतर ही साखर वाढायला सुरवात झाली, साधारण एका तासात ही साखर तिच्या सर्वोच्च पातळी वर म्हणजे १४० च्या आसपास पोहोचली आणि एव्हाना पेशींनी ‘इन्शुलीन’ च्या मदतीने साखर खेचायला सुरवात केलेली असल्याने ही साखर लगेच कमी पण व्हायला सुरवात झाली. साधारण पणे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ती जवळपास पूर्ववत म्हणजे ८० ते ९० आली सुद्धा, मामला खतम !

मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत रक्तातली साखर सुरवातीलाच १२० ते १४० अशी वाढलेल्या स्थितीत होती ! मधुमेह्याने खाणे झाल्या नंतर ही साखर वाढायला सुरवात झाली, साधारण एका तासात ही साखर तिच्या सर्वोच्च पातळी वर म्हणजे २२५ च्या आसपास पोहोचली . ही कमालीची धोकादायक स्थिती आहे, साखर इतकी वाढणे चांगले नाही ! खाल्या नंतर मधुमेह्याची ही वाढलेली साखर पण कमी व्हायला सुरवात होते जरूर पण मुळात मधुमेह्यामध्ये एकतर पुरेसे ‘इन्शुलीन’ नसते किंवा इन्शुलीन अवरोध’ निर्माण झाल्याने पेशींना ‘इन्शुलीन’ वापरता न आल्याने (काही वेळा ही दोन्ही कारणें एकत्र पण असतात) , साखर कमी होण्याचा वेग कमालीचा मंद असतो! साधारण पणे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ती जवळपास १८० च्या आसपास घुटमळत राहीली, ही देखील एक धोकादायक स्थितीच आहे! मधुमेह नसलेल्या व्यक्तीत साधारण दोन तासात सारे सामसुम होते , पुर्ववत होते पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला , रक्तशर्करा खाण्याच्या आधी होती त्या पातळी वर यायला, चक्क ६ ते ८ तास लागले !

आणि इथे मग होते काय , मधुमेह्याच्या रक्तातली वाढलेली साखर जी साधारण सहा – आठ तासात पूर्ववत होते तशी व्हायच्या आतच मधुमेही पुन्हा काहीबाही खातो, रक्तातली साखर अजून १६० च्या आसपास असताना पुन्हा त्यात नव्या साखरेची भर पडते आणि कमी होऊ पाहणारी रक्तातली साखर पुन्हा एकदा उसळी मारून , एक नवे शिखर गाठते , १६० वर असलेली साखर आता २५० चा टप्पा ओलांडते , काही वेळा तर ही चक्क ३०० ला गवसणी घालते! साखर कमी / पूर्ववत व्हायच्या आतच खाणे घेत राहील्याने एक दुष्टचक्र निर्माण होते !

कोणा एका सेलेब्रिटी आहारतज्ञ बाईंचे ऐकून, एखाद्या मधुमेह्याने दिवसातून (थोडे-थोडे? ) पाच – सहा वेळा खायचे ठरवले तर नेमके काय होऊ शकते याची आपल्याला आता कल्पना आली असेल!

‘दिवसातून फक्त दोन वेळाच खा आणि दोन खाण्यात पाच – सहा तासांचे अंतर ठेवा ‘ हा डॉ.दिक्षीतांचा सल्ला किती योग्य आणि बहुमोल आहे नै का?

शुभं भवतु 

Similar Posts

  • |

    मधुमेहाची लक्षणें – ४

    या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो: १)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात. **** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत…

  • |

    निंदकाचे घर – ६

    या तात्पर्य कथेत जसे त्या श्रीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा ही कौशल्याने उपयोग करुन घेऊन प्रियदर्शीनी व कंपनी दोघांचाही लाभ करुन दिला तसेच एखादा तज्ञ ज्योतिषी जातकाची पत्रिका अभ्यासून जातकाला असेच उत्तम मार्गदर्शन करु शकतो जे ‘विवाह कधी / नोकरी कधी…

  • |

    हशीव फशीव ००२

    शीण : संता बेडूक आणि बंता बेडूक गप्पा मारताहेत.. संता बेडूक: “साला लाईफ मध्ये काय थ्रिलच राह्यला नाय….” बंता बेडूक: “मग ते शास्त्रीबुवाला विचार नी, ते सगले सांगते बघ , तुझा काय होनार, कसा होणार , चोकस मंदि , तेच्या कडे…

  • |

    जातकांचे प्रश्न !

    नुकतेच काही जातकांंनी विचारलेल्या काही शंकांना उत्तरें दिली , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या  दिलेल्या उत्तरांंतच थोडी भर घालून लेख तयार केला आहे. आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात: काही प्रश्नांची उत्तरें ज्योतिषशास्त्राच्या आधारे…

  • |

    नेहाचे लग्न !

    4 फेब्रुवारी 2013, संध्याकाळचे पाच वाजत आले होते , मी मुकेसभाईंची अपॉईंटमेंट आवरण्याच्या प्रयत्नात होतो पण त्याचे आपले संपतच नव्हते – “ते मागच्या टैमाला तू आमच्या गंगापूर रोड चा जागेचा बोलला ना ते 100% बराबर आला, साला आपुन काय काय नाय…

  • |

    लँप पोष्ट – ६

    प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे. आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP…

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *