मन्या पडला पक्का अंधश्रध्दा निर्मुलन वाला, दिसला ज्योतिषी मार टप्पल,घाल वादविवाद. गावात आलेल्या त्र्यंबकेश्वर शास्त्रीबुवांना मन्या काय मोकळेच सोडणार? साळसुदासारखा एक जातक बनून मन्या शास्त्रीबुवांना विचारतो :
“तुम्ही पत्रिका बघुन सर्व भुत भविष्य वर्तमान सांगता ना? मग माझे पण सांगा बघू”
“काय जाणून घ्यायचेय तुला?”
“भविष्यातल्या घटना राहु दे बाजुला आधी घडलेल्या घटना तरी अचुक सांगता येतीत का?”
“विचार”
“सांगा, मला संतती किती?”
“तुझी पत्रिका बघुन सांगतो, तुला दोन अपत्यें आहेत”
“चूक.. चूक.. चूक.. , साफ चूक! शास्त्रीबुवा , मला तर तीन मुलें आहेत!!”
“तस तुम्ही समजता आहात……………”