साखरेचे खाणार त्याला ….

साखरेचे खाणार त्याला ….

मंडळी गेला महीनाभर मी फेसबुक संन्याय घेतला होता , …

त्या वाचलेल्या वेळेचा चांगला सदुपयोग झाला , कारण या महीन्यात मी डायबेटीस म्हणजेच मधुमेह या व्याधी बद्दल वाच वाच वाच वाचले गेले दहा वर्षे मधुमेहाने ग्रस्त असल्याने या व्याधीची चांगली ओळख होतीच पण या महिन्यात मी जे काही वाचले ते चक्क नविन होते !

आत्ता पर्यंत हे कोणीच कसे सांगीतले नाही ? असा प्रश्न मला वारंवार पडत होता..

मग मी जे काही (नविन) वाचले त्यावर प्रमाणे स्वत:वर प्रयोग सुरु केले आणि …

अघटीत घडले !

—-

माझ्या गुल्को मिटर ने जेव्हा 90 शुगर दाखवायला सुरवार केली तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही !

शुगर अशी कमी म्हणजेच एकदम हेल्दी होऊ शकते ? हो नक्की अगदी नक्की ,

माझी कमी व्हायला सुरवात झाली आहे ना !!

मी जे काही वाचले , अनुभव घेतले यावर काही लिहावे असा संकल्प सोडला आहे

“साखरेचे खाणार त्याला ….”

सुमारे 50 भागांची प्रदीर्घ लेखमाला … मराठीतून !!

पण मी जेव्हा असे काही वेगळ्या विषयावर लिहतो त्याला फार कमी वाचकवर्ग लाभतो असा माझा अनुभव असल्याने इतका वेळ आणि मेहेनत खर्च करून लिहावे का? अशी शंका मनात येते आहे ?

आपला काय विचार आहे , आवडेल असे काही वाचायला ?

कॉमेंट मध्ये आपला होकार / नकार कळवा …

शुभं भवतुु 

Similar Posts

  • |

    भविष्य का बघायचे?

    ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते, प्रयत्नांना पर्याय नाही, मात्र या प्रयत्नांना योग्य दिशा देण्या साठी ज्योतिषशास्त्राचा वापर चांगल्या तर्‍हेने करता येतो. आपली बलस्थानें कोणती याचा अंदाज आल्याने त्यांचा कौशल्याने वापर करुन प्रगती करणे शकय होते. कमकुवतपणा वा कमतरता भरुन काढण्यासाठी  प्रयत्न करता…

  • |

    तो भेटेल का?

    प्रश्नशास्त्र अजब आहे ! प्रश्नकुंडलीच्या माध्यामातून ज्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यांची उत्तरें जन्मकुंडलीच्या माध्यमातून स्वप्नात सुद्धा देता येणार नाही ! पण यात एक धोका आहे! उत्तरे मिळतात म्हणून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो . आणि इथे प्रश्नशास्त्राच्या महत्त्वाच्या…

  • |

    माळा वरचा खेळ ! भाग ५

    काही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले, समोर हेड लाईट्स च्या प्रखर झोतात . हो, अगदी रस्त्याच्या मधोमध गाडी समोर दोन्ही हात पसरुन चक्क…. आमचे व्याही , म्हणजेच निरंजनचे सासरे, म्हणजेच प्रणोतीचे वडील, मनोहर पंत उभे होते! काय…

  • |

    धुंद एकांत हा!

    मराठी चित्रपट संगीताच्या इतीहासातले हे एक अप्रतिम गीत! बाबुजी (श्री सुधीर फडके) यांच्या काही अप्रतिम गाण्यां पैकी एक! बाबुजींनी फार सुंदर सुरावट दिली आहे या गाण्याला. गाणे बाबुजींनी सोबत आशाताईंनी गायलेले आहे. पडद्यावर श्री विक्रम गोखले आणि पद्मा चव्हाण यांच्यावर हे…

  • |

    समय तू धीरे धीरे चल…

    मला आवडलेले हे आणखी एक श्रवणीय गीत. सुंदर शब्द , अप्रतिम संगीत आणि आशाताईंचा लाडीक आणि मधाळ स्वर. जोडीला किशोरदां आहेतच पण इथे ते नेहमी प्रमाणेच ‘रेकून’ गायले आहेत, पण दुसरे कोण  होते त्यावेळी हे गाणे पेलू शकणार?  रफी साहेबांच्या जातकुळीतले…

  • |

    कनेक्सन हुई गवाँ रे !

    महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) मध्ये ‘रामा’ नामक युवक रहात आहे. या ‘रामा’ चा मोठा भाऊ ‘शिवा’ मुंबईला नोकरी करतो. रामा आणि शिवा सख्खे भाऊ त्यामुळे ….. रामा आणि शिवा कनेक्टेड आहेत शिवा चा रूम पार्टनर आहे ‘’गोविंदा ‘ आता शिवा…

22 Comments

  1. वा लिहाच, आपल्या अभ्यास पूर्ण लेख मालेने मधुमेह पिडीताना. नक्कीच चांगल मार्गदर्शन होइल.

    आधिच उत्तमन लेखमाले साठी धन्यवाद

  2. नक्की लिहा, मालिका वाचायला उत्सुक आहे. शुभेच्छा.

    1. धन्यवाद श्री दीपकजी

      मालिका लिहणार आहे जरा आपले लक्ष या गरीबावर असू द्या ही विनंती

      सुहास गोखले

  3. फारच आवडेल मधुमेह विषयावरील लेखमाला वाचायला. इथे तहान लागल्यावरच विहीर खोदणार्यांची कमी नाही. तुमच्या लिखाणाची खुपच वाट पाहिल्यावर आज भेट झाली. आनंद वाटला. नवीन वर्षांच्या शुभेच्छा.

  4. मधुमेहावर ज्योतिषशास्त्रीय लेख असेल तर नक्की आवडेल वाचायला…अवश्य लिहा…उत्सुक आहोत !

    1. आरोग्य / वैद्यकीय / रोग या बाबतीत ज्योतिषशास्त्र कमालीचे दुबळे आहे तेव्हा अशा कोणत्याही बाबतीत ज्योतिषशास्त्रा वर विसंबणे कमालीचे धोक्याचे आहे असे निदान माझे तरी मत आहे त्यामुळेच मी वैद्यकीय बाबतीत विचारलेल्या प्रश्नांची ज्योतिषशास्त्रैय अंगाने उत्तरें देत नाही.

      ही लेखमाला फक्त वैज्ञानिक माहीती वर आधारीत आहे यात ज्योतिषशास्त्राचा कोणताही संबंध असणार नाही.

      लेखमाला अवश्य वाचा

      सुहास गोखले

      1. सुहासजी, वैज्ञानिक माहिती तर अवश्य द्याच पण त्याच्या जोडीला ज्योतिषविषयक काही तळटीपा तरी तुमच्यासारख्या जाणत्या ज्योतिषशास्त्री माणसाने द्याव्यात ही अपेक्षा आहे. अर्थात त्याच्या जोडीला तुमचे ते डिस्क्लेमरही ठेवा. म्हणजे काम झाले. आम्ही तुमचे लेखन हे ज्योतिषाच्या अंगानेच बघतो.

        1. धन्यवाद श्री S P Kajarekar जी,

          ज्योतिषशास्त्रीय अंगाने मधुमेहाचा विचार ही आपली सूचना स्वागतार्ह आहे पण एकंदरच वैदयकीय विषयाच्या बाबतीत आपले ज्योतिषशास्त्र कमालीचे तोकडे आहे , पुरेसा अभ्यास / संशोधन या बाबतीत झाले नाही हा भाग तर आहेच पण केवळ 9 ग्रहांच्या माध्यमातून (12 राशी अ‍ॅड करा वाटल्यास !) मनुष्याला होणार्‍या हजारों आजारांची खबरबात घेणे हे ह्या शास्त्राच्या कुवतीचे बाहेरचे असे काही आहे असे मला वाटते, माझ्या कडे (नक्की) मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या सुमारे 500+ पत्रिकां आहेत त्यांचा मी तौलनिक अभ्यास एकदा केला होता पण त्या अभ्यासातून नक्की / ठोस असे कोणतेही अनुमान मला काढता आले नाही कारण ‘मधुमेह’ आणि विषीष्ट ग्रहस्थिती असा कोणताही एक समान असा सुत्र / धागा मला या 500+ पत्रिकांत आढळला नाही. कदाचित माझा अभ्यास कमी पडला असेल किंवा आणखी काही हजार पत्रिका तपासायला हव्या होत्या.

          असो, पण आपल्या सूचनेवर मी नक्की विचार करेन आणि काही माहीती (ज्योतिषशास्त्रीय ) देण्याचा प्रयत्न करेन.

          सुहास गोखले

  5. आजकाल मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. आपण एका खूप महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. आपण लिहिणार म्हणजे खूप महत्वपूर्ण माहिती आम्हाला वाचायला मिळणार आहे म्हणून आनंद झाला. पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहोत.

    1. धन्यवाद श्री अक्षयजी !

      आपल्या सारखे वाचक असतात तेव्हाच तर लेखन करण्याला काही अर्थ असतो, लिहायला सुरवात करतो आहे , बस थोडीशीच प्रतिक्षा !

      आपला

      सुहास गोखले

  6. सुहासजी,

    नववर्षाचा चांगला संकल्प आहे, बर्‍याच लोकांना त्याचा फायदा होईल.
    त्यात तुम्ही स्वत: टेस्ट आणि प्रूव केला असल्यामुळे अनेक जण त्याचा उपयोग घेतील.

    एक चांगला उपक्रम.

    संतोष

  7. Dear Suhas ji nakki liha,.
    Khup madat hoil
    tumche anubhav far enriching astat

    Barech divas tumcha lekh aala nahi. Mala vatale chukun mee swatala unsubscribe tar kele nahi

    lekh lihit chala hee vinanti

    Aankhi ek tumchya astrology class chi vaat baghat aahe.
    2019 cha majha ek sankalp astrology shiknyacha aahe

    Dhanyavad

  8. स्पष्ट बोलतो, माफ करा. तुम्ही खूप वाट बघायला लावता. हे सुद्धा कारण असेल वाचकवर्ग कमी असण्याचा.तुम्ही लिही पर्यंत त्यातील इंटरेस्ट निघून जातो

    1. श्री विनोदजी,

      आपल्या भावना समजू शकतात पण लेखन करणे हा माझा पूर्ण वेळ व्यवसाय नाही, लेखन करून माझे पोट भरत नाही त्यामुळे मला पोटापाण्या साठी इतर बरेच उद्योग करावे लागतात आणि त्याला प्राधान्य हे द्यावेच लागते , या सार्‍या मधून जसा आणि जेव्हा वेळ मिळेल तसे लिहण्याचा माझा प्रयत्ब्न असतो. आपल्याला कदाचित कल्पना नसेल पण जो लेख तुम्ही दोन मिनिटात वाचून संपवता तो लिहण्यासाठी माझे काही तास मोडलेले असतात (मराठीत नुसते टाईप करायचे म्हणजे दोन एक तास मोडता!) आणि रोज असा नवा लेख लिहण्या इतका वेळ माझ्याकडे उपलब्ध नाही.

      तरीही मी जास्तीत जास्त गतीने लिहण्याचा प्रयत्न करेन. राग नसावा.

      सुहास गोखले

Leave a Reply to Santosh Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *