आज आपण पाश्चात्त्य प्रश्नशास्त्रा – होरारी अॅस्ट्रोलॉजी वरच्या काही ग्रंथांची ओळख करून घेऊ
आपल्याला आपल्या प्राचीन पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा कितीही अभिमान असला तरी ‘आमचे चांगले बाकीचे ते वाईट’ असा दुराग्रह नसावा.
पाश्चात्त्यांनीही या शास्त्रात कमालीची प्रगती केली आहे. त्यांच्या मागे आपल्यासारखा ५००० वर्षांचा इतिहास नाही, पराशर, गर्ग, वराहमिहीर त्यांच्या कडे झाले नाहीत, पण संशोधक वृत्ती, बाप दाखव नाहीतर श्रादध घाल अशी रोखठोक पण रास्त विचार सरणी, प्रत्येक गोष्ट ती कुणा ढूढढाचार्याने सांगितली म्हणून जशीच्या तशी न स्वीकारता तर्काच्या कसोटीला घासूनच घ्यायची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखीच आहे. जेव्हा १०००० पत्रिकांचा अभ्यास करून काही विधाने केली जातात (Modern Horary Astrology – Doris Doane ) त्याला महत्त्व द्यायचे का कसलाही आगापिछा नसलेली , हवेत केलेली विधाने पाठ करायची जे ज्याचे त्यानेच ठरवावे.
या यादीतल्या ग्रथांबददल:
विल्यीम लिलीचा ग्रंथ बहुतेक लेखकांनी आधारभूत मानला आहे (जसा आपल्या कडे बृहत पराशरी ) पण त्याचे आंधळे अनुकरण केलेले नाही हे विशेष.
या यादीत मला सर्वात आवडलेला ग्रंथ म्हणजे जॉन फ्रावले यांचा The Textbook Of Horary Astrology , माझ्याकडे या ग्रंथाची खुदद स्वतः: लेखकाने स्वाक्षरी केलेली प्रत आहे याचा मला अभिमान वाटतो.
१०० च्याहून जास्त केस स्टडीज असलेला ‘सिल्हीया डिलाँग’ यांचा ग्रंथ संग्रहात असायलाच हवा , पण दुर्दैवाने तो बाजारात उपलब्ध नाही, क्वचित केव्हा तरी तो जुन्या पुस्तकांच्या विक्री यादीत दिसतो , किंमत १०० डॉलर्स पर्यंत असते. प्रयत्न करून पहा.
आयव्ही जेकबसन गोल्डस्टिन या लेखिकेला मी दैवता समान मानतो, त्यांच्या ‘Simplified Horary Astrology‘ या ग्रंथाने तर आधुनिक होरारी अस्ट्रोलॉजी अभ्यासकांची एक पिढीच घडवली असे म्हणले तर वावगे होणार नाही.
डोरीस डोन यांच्या ग्रंथाचा उल्लेख मी वरती केलाच आहे.ज्योतिषशास्त्रावरच्या विषयात तर्कशुद्ध पध्दतीन कसे लिहितात याचे उदाहरण पाहावयाचे असल्यास ‘Martial Art of Horary.. ‘ हा ली लेहमान यांचा ग्रंथ पाहावा.
सिम्मोनाईट यांच्या ग्रंथाचा मी खास उल्लेख करतो तो अशा साठी की कृष्णमूर्ती पद्धतीचे जनक कै.के एस. कृष्णमूर्ती यांच्या वर या ग्रंथाचा प्रभाव आहे (त्यांनी या ग्रंथाचा तसा उचित उल्लेख आपल्या होरारी अस्ट्रोलॉजी या ६ व्या रीडर मध्ये केला आहे, इथेच कृष्णमूर्तींचे मोठेपण अधोरेखित होते) , सिम्मेनाईट यांनी त्यांच्या ग्रंथात जिथे जिथे एखादा ग्रह असा उल्लेख केला आहे तिथे तिथे कृष्णमूर्ती यांचा ‘सब’ वापरायचा काम फत्ते!
करेन झोण्डाग यांचा छोटेखानी ग्रंथ भारतात सुद्धा मिळतो ३०० रुपयात.
डेरेक अॅपलबी यांचा ग्रंथ ही सुंदर विवेचन करतो, उदाहरणे चपखल आहेत, अभ्यास केल्यास जरूर फायदा होईल.
सगळ्यात कहर करणारा ग्रंथ आहे तो बार्बारा वॅटर्स यांचा , बारा ग्रह ,बारा भाव आणि बारा राशी, पण त्यातूनच त्यांनी इतकी माहिती बाहेर काढून दाखवली आहे की ‘थकक’ होण्याच्याही पलीकडची अवस्था येते. असाच प्रयत्न अल्फी लोव्हे यांच्या ग्रंथातही केलेला बघायला मिळेल.
या यादीत ‘इलेक्शनल अॅस्ट्रोलोजी’ वरचे तीन ग्रंथ आहेत, हे ‘ईलेक्शन’म्हणजे ‘राजकीय निवड्णुकां’ नाहीतर ‘मुहुर्त ‘ आहे. या पाश्चात्य ज्ञानाचा आपल्या नक्षत्रांवर आधारित ‘मुहुर्त’ शास्त्राशी मेळ घालायला काहीच हरकत नाही,उत्तम परिणाम मिळतील.
या यादीतल्या रेक्स बिल यांच्या ‘रुलरशीप बुक’ या ग्रंथाकडे खास लक्ष द्यावे , ही एक प्रकारची ग्रह, भाव, राशी यांच्या कारकत्वाची डिक्शनरी आहे, तुम्ही कोणत्याही पद्ध्तीचा अवलंब करत असला तरी कारकत्व माहीती असायलाच हवी, ‘दालचीनी’ ‘पेट्रोल’ कोणत्या ग्रहाच्या कारकत्वाखाली येते ? डोके लढवण्यात वेळ दवडू नका, रेक्स बिल ने त्यासाठीच तर हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
“हरी हरी , काय काळ आला आहे पहा, घ्या आता या पाश्चात्या कडून आमचेच पवित्र शास्त्र पुन्हा शिकायची वेळ आली का?” असा कुत्सित टोमणाही काही जण मारतील, पण लक्षात घ्या आयुर्वेद , योग, ध्यानधारणा या खास ‘आपल्या’ क्षेत्रात आज ही वेळ जवळजवळ आलेलीच आहे , तीच उद्या ज्योतिष शास्त्राच्या बाबतीत ही येऊ शकेल .
काही जणांना पाश्चात्त्यांचे काही ही नको असेल तर काही जणांना ‘होरारी’ मध्ये फारसा रस नसेल , तरी पण या ग्रंथांत असे काय आहे जे आपल्याला उपयोगी पडू शकेल?
- या ग्रंथांतून पत्रिका विश्लेषणाच्या पद्धती विस्ताराने दिल्या आहेत.
- ग्रहयोगांचा अचूक अर्थ कसा लावायचा ते सांगितले आहे.
- ग्रहांचे बलाबल कसे ठरवायचे ते सोदाहरण स्पष्ट केले आहे.
- टप्प्या टप्प्याने पत्रिकेची उकल कशी करायची, अनेक पर्यायातून योग्य तो पर्याय कसा निवडायचा ते समजावून सांगीतले आहे.
- प्रत्येक ग्रह आपल्याशी कसा बोलतो, त्याचे म्हणणे कसे समजून घ्यायचे याचे विवेचन अतिशय संदररित्या केले आहे.
- ज्योतिषशास्त्राची पायाभूत तत्त्वे सर्वत्र सारखीच पण त्यांचा समोरच्या पत्रिकेत कसा खुबीने वापर करायचा हे यातून शिकायला मिळते.
- जातकाची व त्याच्या प्रश्नाची हाताळणी कशी करावी लागते , त्याच्या भावभावनांचा कसा सन्मान करायचा असतो यांचे सुंदर मार्गदर्शन यातून मिळते. (खास करुन जॉन फ्रावलेंचा ग्रंथ)
मला वाटते भारतीय ज्योतिष असो वा के.पी. वा पाश्चात्त्य, हे सर्व ज्ञान ज्योतिर्विदाला असलेच पाहिजे ना?
शुभं भवतु
यादीत 26 ग्रंथ आहेत, यादी कोणत्याही विविक्षीत क्रमाने नाही.
|
Books on (western) Horary Astrology |
||
|
Title |
Author |
|
|
1 |
Christian Astrology Part III |
William Lilly |
|
2 |
Simplified Horary Astrology |
Ivy M Goldstein-Jacobson |
|
3 |
Text book of Horary Astrology |
John Frwaley |
|
4 |
Rulership Book |
Rex Bill |
|
5 |
Horary at its best |
Alphee Lavoie |
|
6 |
Modern Horary Astrology |
Doris Doane |
|
7 |
Martial Art of Horary Astrology |
J Lee Leehman |
|
8 |
Horary Reference book |
Anne Ungar, Lillian Huber |
|
9 |
Electional Astrology: The Art of Timing |
Joann Hampar |
|
10 |
Handbook of Horary Astrology |
Karen Zondag |
|
11 |
Timings of Events: Electional Astrology |
Bruce Scofield |
|
12 |
Brotherhood of Light |
C C Zain |
|
13 |
Doctorine of Horary Astrology |
John Gadbury |
|
14 |
Horary Astrology Rediscovered |
Olivia Barclay |
|
15 |
Horary Astrology |
Derek Appleby |
|
16 |
Horary Astrology Plain and Simple |
Anthon Louis |
|
17 |
Horary Astrology & the Judgment of Events |
Barbara Watters |
|
18 |
Horary Astrology |
Joseph Simmonite, John Story |
|
19 |
The Real Astrology |
John Frwaley |
|
20 |
The Real Astrology Applied |
John Frwaley |
|
21 |
Sports Astrology |
John Frwaley |
|
22 |
Doctrine of Horary Question |
John Gadbury |
|
23 |
Horary Astrology- Re-examined |
Barbara Dunn |
|
24 |
Electional Astrology |
Vivian Robson |
|
25 |
Lose this book and Find it with Horary |
Alphee Lavoie |
|
26 |
Art of Horary Astrology in Practice |
Sylvia Delong |

sir pl tell marathi books
शिवकुमारजी ,
पाश्चात्य होरारी वर मराठीत एकही पुस्तक नाही, नाही म्हणायला शांतारम केणी यांच्या ‘ज्योतिष सागर’ या ग्रंथात होरारी वर एक प्रकरण आहे ते पाश्चात्य होरारी पद्ध्तीवर आहे. हा ग्रंथ आऊट ऑफ प्रिंट असल्याने मिळणे अवघड आहे , तरी प्रयत्न केल्यास मिळू शकेल . वेदिक व कृष्णमुर्ती पद्धतीच्या होरारी वर अनेक ग्रथ उपलब्ध आहेत त्याची यादी मी याच ब्लॉग वर दिली आहे , ती नजेरे खालून घालावी अशी विनंती.
धन्यवाद
सुहास
thank u sir ji
sir mala prashna kundali cha abhyas karanyasathi kahi marathi books sanga
Dear Sir,
May I ask you to give information about the publishers of the various books you have listed above to enable me to enquire about them at appropriate sources?
Regards,
Madhusudan V. Panwalkar
श्री. मधुसुदनजी,
धन्यवाद.
मी ग्रंथांची नावे दिली आहेत. ती नावे वापरुन सर्च (अमेझॉन, अॅबे बुक्स ) केलात तर आपल्याला सर्वच माहीती मिळेल.
शुभेच्छा
सुहास