ह्ये घेटलं !

बोस साऊंड्लिंक २ , ब्लू टूथ स्पीकर !

मस्त आवाज आहे, खोली दणाणून सोडतयं बेणं , इतक्या छोट्या नरड्यातूण ह्ये इतका मोठ्ठा आवाज म्हणजे आक्रितच म्हणायचे , पण असे आसले तरी . फुल्ल डीजे साऊंड सोडला तरी गला फाटत नाय… आवाज शेवट पत्तुर ते सु-सपष्ट का म्हणतात ना तस्सा राहतोय .. (अबे, छोड ना यार,  अभी क्या बच्चे की जान लेगा क्या ? ) 

ढुम ढुम ढुम बेस  झ्यॅक वाजतोया , आता मला जरा जादाच टाईट्ट , ते कंट्रोल्ड बेस का म्हणत्यात ना त्ये लागतयंं , ते नसले तरी  ह्ये बेणं काय कमी नाsssssय , येकदा का   भिंतीला ख्येटूणश्याण ठिवलं की चक्क वरली आणि खाल्ली दोनी नोट्स लागत्याती , मोजुन घेयाच्या सायेबानु ,  कमी नाय की जास्त नाय (नंतर तक्रार नाय पायजेलाय !) … 

हां… आता जराशान वरल्या अंगाच्या पट्ट्या कमी कणदार लाग्त्याती पन आता त्येव्हढ चालायचच  …

कुटे ह्ये तर कुटे माझी ३ लाखाची फुल कॅडेन्स सिस्टीम !! आता तेच्या तुलनेत ह्ये कमी वाटणारच …

बढिया , बढिया … जिओ मेरे लाल !

जय हो !

Similar Posts

  • |

    दिया जलाकर आप बुझाया ..

    मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉं (जिथे गाण्यांची नावे निळ्या अक्षरात आहेत त्याच  गाण्याच्या यु ट्यूब लिंक्स आहेत , क्लिक करा आणि त्या गाण्याचा आस्वाद घ्या !) ‘संगीत’ या सारखा भारदस्त शब्द वापरा किंवा साध्या सोप्या भाषेत ‘गाणे-बजावणे ‘ म्हणा, वट्टात ते जे काही असेल…

  • |

    मर्कटलीला !

    मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्‍या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना…

  • |

    हशीव फशीव ००३

    प्रत्येक राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो, वागायची एक पध्दत असते, आता हेच बघा ना , एका इंटरव्हू साठी बरेच जण आलेत, त्यात सर्व राशींचे लोक असणारच पण ओळखता येतेय कोण कोणत्या राशीचा ते? मेष: “साला काय घोळ घालताय, फटाफटा इंटरव्हू घेऊन…

  • |

    नोकरी मिळेल का?

    मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही  प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे  नुकत्याच  एका सभासदाने  विचारलेल्या प्रश्नाला मी  उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी…

  • |

    Evangeline Smith Adams – 2

    “मॅडम, माफ करा पण तुम्ही आमचा वेळ बरबाद करत आहात, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही. सॉरी” हताश मनाने बाई हॉटेलच्या बाहेर आल्या. नकार मिळालेले हे कितवे हॉटेल असावे हे आता मोजायच्या पलीकडे होते.. पुढे चालू …   या लेखमालेतले पहीला…

  • |

    भविष्यात डोकावताना

    आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, पण हे जाणुन घेताना बर्‍याच वेळा ज्योतिषाकडून जातकाच्या काही अवाजवी अपेक्षा  असतात, तसेच ज्योतिष शास्त्रा बद्दल बरेचसे गैरसमजही असतात! उदा: चांगले , अनुकूल असेच भविष्य कानावर पडावे. आपल्याला ज्या घटना घडाव्यात असे…

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *