ये धुआँ सा कहाँ से उठता है |

सायबानू,  ही कव्हर इमेज आणि आजची स्टूरी यांचा काय पण  संबंध नाsssय,  त्या   ‘नानू’ (दांबीस!) ला एकदाचा ‘आत’ टाकला हे पाहून मला परमानंद झाला आहे. त्याच्या केविलवाण्या चेहऱ्यावर जाऊ नका, ब्येने फार मोठा दूध घोटाळा करून रायले होते, एक ना एक दिवस असे ‘आत’ जाणारच होते!  


आता स्टूरी चे म्हणाल तर, त्याचे काय झाले मंडली…

असाच एका टायमाला, एक ह्ये भला थोरला नामचीन ज्योतिषी भेटला, हे  अस्ले नामचीन लोक्स माझ्याच राशीला का येतात हे कोडे मला अजूनही उलगडले नाय!

हा  नामचीन बंदा ‘पारंपरिक’ वाला होता, फार तोरा दाखवत होता, फाड फाड ‘वराह मिहिर’ त्यात नवमांशाचा तडका  आणि वरतून ‘अष्टकवर्ग ’ भुरभुरलेले असे जंक्शन काम होते सायबांचे, इकडे मी बापडा सगळ्या पद्धती आपापल्या अंगाने बरोबरच आहेत, सगळ्यातले जे चांगले आहे ते स्वीकारायचे आणि वेळ वखुत पाहून त्यातले योग्य ते वापरायचे ह्या विचाराचा. 

शेवटी जेव्हा कालनिर्णयावर चर्चा आली तेव्हा हा बाप्या हडबडला, इतका वेळ चाललेली शुष्क पोपटपंची एकदम थंडावली,  थोडी फिरकी घ्यावी म्हणून आणखी डिवचले आणि हा सुरमा भोपाली यकदम उसळून, वस्सकन अंगावर येत  म्हणाला.

“असे म्हणता? मग मी एक कालनिर्णय करायला सांगतो, तो अचूक करू  शकलात तर मानले तुम्हाला..”

मी जरा साळसूदपणाचा आव आणत म्हणालो,

“अब्बूजान, रेहेम करो, काय कू बच्चे की जान ले रहे हो”

“आता का पळता?”

“द्येवानू, मी कुठे पळतोय वो, फकस्त माझ्या औकातीत राहून बोलतोय जी ”

“मग इतका वेळ बोललात ते काय होते?”

“त्ये आपले उगाच, 



“ते दिल की आवाज वगैर सोडा, एका महिलेची पत्रिका देतो, तिचा विवाह झाला आहे पण तो केव्हा हे सांगू शकाल? “

“जनाब,

असला कालनिर्णय करणे फारसे कठीण नाही, लेकिन गुस्ताख़ी मुआफ हुजूर, अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. उगाच कोणाही तिर्रमखा ने उठावे आणि माझी परीक्षा घ्यावी इतका मी ‘स्वस्त (cheap)’ नाही. मी मेहनत जरूर करेन पण त्याचा योग्य मोबदला मिळत असेल तरच- 

या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी: 

या तीनही पद्धतींचा एकत्रित वापर केला आहे,  हो मला या तीनही पद्धती चांगल्या अवगत आहेत! आणि मी किती साळसूद आहे ते सांगायला नक्को! 

जातकाची निरयन पत्रिका शेजारी दिली आहे.


पत्रिकेवर वरवर नजर टाकली आणि लक्षात आले की हा प्रश्न का विचारला गेला असावा. 


सप्तमेश गुरु वक्री अवस्थेत तृतीय स्थानात युरेनसच्या पूर्ण अंशात्मक युतीत , शुक्र युरेनसच्या प्रतियोगात , मंगळ अष्टमात, रवी  – बुधाच्या राश्यात्मक युतीत, चंद्र – नेपच्यून प्रतियोग ५ अंशात. वक्री शनी – मंगळ राश्यात्मक प्रतियोग २ – ८ स्थानांतून, रवी – शनी प्रतियोग, शुक्र – शनी योग! 

शनी- मंगळ प्रतियोग , शुक्र – युरेनस प्रतियोग आणि चंद्र – नेपच्यून प्रतियोग या अशुभ योगां बद्दल मी या पूर्वी बरेच लिहले आहेत त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही.

पत्रिकेतली  वक्री गुरु तृतीय स्थानात युरेनसच्या पूर्ण अंशात्मक युतीत ही स्थिती तितकीच अशुभ आणि लक्षवेधी आहे, पत्रिकेत  गुरु चतुर्थ आणि सप्तम स्थानाचा अधिपती असल्याने या स्थानांच्या बाबतीत एखादे विचित्र फळ मिळतेच  असा अनुभव आहे.चतुर्थ आणि सप्तम म्हणजे संसार -गृहग्रहस्थी – विवाह- वैवाहिक जीवन – वैवाहिक जोडीदार म्हणजे या क्षेत्रात जातक कमनाशिबी असण्याची मोठी शक्यता शिवाय गुरु संतती कारक असल्याने  ह्या योगाच्या प्रभावाने संततीच्या बाबतीत काही समस्या खास करून  संततीचा अभाव असण्याची मोठी शक्यता दिसते. 

पत्रिकेतल्या या ग्रहस्थितीचा विचार केल्यास लक्षात येते की विवाह / वैवाहिक जीवनाच्या बाबतीत काही समस्या आहेत. विवाह न होणे, विवाहास मोठा विलंब, वैवाहिक जीवनात कमालीचे असमाधान,  वैधव्य / घटस्फोट अशा अनेक शक्यता असू शकतात. 

महिलेचा जन्म 1983 वर्षी आधुनिक काळातला म्हणजे विवाह योग्य वय साधारण 24 पासून पुढे असणार. म्हणजे  विवाह 2008 नंतर झाला असण्याची मोठी शक्यता. 

एक साधारण असा अंदाज आल्यामुळे सरळ पाश्चात्त्य तंत्राचा आधार घेणे सोयीस्कर  ठरेल.

जातकाचा सायन पद्धतीचा चार्ट शेजारी दिला आहे. 


जातकाचा विवाह वयाच्या 25 च्या नंतर  झालेला असावा हे गृहीत धरल्याने, मी 01 जानेवारी 2008 चा प्रोग्रेस्ड चार्ट तयार केला, तो शेजारी दिला आहे.

सेकंडरी प्रोग्रेशन्स च्या अंगाने पाहिले तर विवाह सुचवणारे बरेच योग आहेत, पण परिणामकारकतेचा विचार केला तर शुक्राचेच योग प्रमुख मानले जातात त्या पाठोपाठ गुरु चे योग फलदायी ठरतात. म्हणून मी प्रथम हेच योग तपासायचे ठरवले. 

  1. प्रोग्रेस्ड शुक्र 4 कर्के वर आहे तो 20 कर्के वर आला की त्याचा जन्मस्थ दशम बिंदू शी युती योग होईल, हा एक आश्वासक विवाह योग आहे.
  2. प्रोग्रस्ड सप्तम बिंदू  14 वृषभेवर आहे तो 5 मिथुनेवर आला की त्याचा जन्मस्थ शुक्राशी युती योग होतो,  हा पण एक आश्वासक विवाह योग आहे.
  3. जन्मस्थ गुरु वक्री असल्याने त्याचा प्रोग्रेस्ड सप्तम बिंदूशी योग किंवा प्रोग्रेस्ड गुरु चा जन्मस्थ सप्तम बिंदू शी योग जातकाच्या उभ्या आयुष्यात होण्याची सुतराम शक्यता नाही. 

अगदी बारकाईने बघितले तर इतरही विवाह सूचक योग असू शकतील पण ते इतके जोरकस नाहीत, अशा लहान सहान योगांचा विचार करायला नको.

म्हणजे वर उल्लेख केलेले शुक्राचे दोन योगच विवाहाच्या दृष्टीने विचारात घेण्या जोगे आहेत.

प्रोग्रस्ड सप्तम बिंदू आणि  जन्मस्थ शुक्राशी युती एक आश्वासक विवाह योग असला तरी तो 2033 मध्ये अंशात्मक होईल त्याचा काहीच उपयोग नाही कारण जातकाचा विवाह 2024 च्या आधीच झालेला आहे.

2008 चा प्रोग्रेस्ड चार्ट  पुढे पुढे नेता शुक्राचा दुसरा योग, प्रोग्रेस्ड शुक्र – जन्मस्थ दशमबिंदू युती योग अंशात्मक होईल हे तपासले असता असे दिसते की जानेवारी 2023 च्या जवळपास प्रोग्रेस्ड शुक्र आणि जन्मस्थ दशम बिंदू अगदी पूर्ण अंशात्मक युतीत येत आहेत.

हा योग नि:संशय विवाह सूचक आहे शिवाय हा योग होत असतानाच,  जन्मस्थ शुक्र आणि प्रोग्रेस्ड रवी अंशात्मक युतीत आहेत, हा योग देखील विवाहाला अत्यंत पोषक आहे. प्रोग्रेस्ड ‘पार्ट ऑफ मॅरेज (Mr)  बिंदू आणि जन्मस्थ चंद्र  अंशात्मक योगात आहेत, जन्मस्थ ‘पार्ट ऑफ मॅरेज (Mr)  बिंदू आणि प्रोग्रेस्ड रवी देखील, अंशात्मक योगात आहेत, तसेच प्रोग्रेस्ड गुरु आणि जन्मस्थ चंद्र अंशात्मक योगात आहेत, हे  सर्व पूरक योग विवाहाच्या दृष्टीने  शुभ सूचक आहेत. 

आता या अनुमानाला पारंपरिक पद्धतीने कितपत दुजोरा मिळतो ते पाहू. 

आपला अपेक्षित कालावधी आहे डिसेंबर 2022- जानेवारी 2023, या कालावधीत जातकाला: 

शनी महादशा, रवीची अंतर्दशा आणि शनि किंवा बुधाची विदशा चालू असेल. 

शनी स्वतः: विवाह साठी काहीसा तटस्थ म्हणता येईल असा आहे म्हणजे शुभ नाही आणि अशुभ ही नाही असा.

रवी ची अंतर्दशा (मे 2022 ते एप्रिल 2023) सप्तम स्थानाला पोषक आहे, रवी मंगळाच्या माध्यमातून द्वितीय स्थाना ला काहीशी बळकटी देत आहे. 

शनी तटस्थ असल्याने शनीची विदशा फलदायी ठरणार नाही पण नंतरची बुधाची विदशा ( 10 डिसेंबर 2022 – 28 जानेवारी 2023) , द्वितीय आणि सप्तम स्थानाची समर्थक असल्याने ही बुध विदशा फलदायी ठरली असावी!

गुरु  – शनी डबल ट्रांसिटचा विचार घेतला तर दिसते की:

1 डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत गुरु मीनेतून भ्रमण करता होता म्हणजे जातकाच्या सप्तम भावातून, आणि शनी मकरेतून भ्रमण करत होता म्हणजे जातकाच्या पंचम भावातून आणि गोचरीच्या या शनीची तिसरी दृष्टी जातकाच्या सप्तम स्थानावर महंजे गुरु – शनी चे हे संयुक्त गोचर भ्रमण जातकाच्या पंचम आणि सप्तम भावावरून होत होत हे अगदी नि:संशय विवाह सूचक आहे! कालावधीतच गोचरीचा शुक्र जातकाच्या पंचम भावातून आणि गोचरीचा मंगळ जातकाच्या भाग्य स्थानातून भ्रमण करत होता ही दोन्ही गोचर भ्रमाने शुभ आहेत.

या साऱ्याचा विचार करून मी त्या ‘सुरमा भोपाली’ ला सांगितले:

सुरमा भोपाली च्या चेहऱ्यावर एखादी भुताटकी बघितल्या सारखे भाव होते…

मला हे काही नवीन नाही!

Similar Posts

2 Comments

  1. आपलं सेकंडरी प्रोग्रेशन्स च्या बाबतीतलं ज्ञान अघाध आहे. सेकंडरी प्रोग्रेशन च्या बाबतीत काही बेसिक पुस्तके आम्हास सांगावीत म्हणजे आम्हाला थोडाफार अभ्यास चालू करता येईल. खूपच आवाहन आव्हानात्मक. आपल्या अघाध ज्ञानास सलाम.

    1. धन्यवाद.

      अशी एक पोष्ट लिहायला किती मेहनत करावी लागली असेल याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. मी अशा पोष्ट करत असतो, त्यामागे माझा मोठेपणा सिद्ध करायचा हेतू नाही , मला त्याची गरज ही नाही. केवळ या शास्त्राचा प्रचार करायला ही पोष्ट लिहली आहे. एका चांगल्या, उपयुक्त तंत्राची ओळख करून देण्याच्या हेतूने पोष्ट लिहली आहे,

      ज्ञानाच्या प्रसार व्हावा या माझ्या कार्याला, ही पोष्ट शेअर करून आपणही थोडा हातभार लावू शकला असता ना? ‘Share’ वर एक साधे माऊस क्लिक, काम झाले असते पण तुम्ही इतकी लहानशीम कृती करून शकला नाहीत! का? हा माझ्यावरचा राग आहे का ? आपण ज्योतिष विषयात रुची दाखवलतो हे लोकांना सांगण्याची लाज वाटते का? पोष्ट शेअर करा, व्हिडीओ शेअर करा अशी अगदी कळकळीची विनंती करून देखील तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आला आहात. मग आता कोणत्या अधिकारात पुस्तकांची यादी मागत आहात? हा असा एकतर्फी व्यापार मी का करू?

      शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *