एक भयंकर घटना

गेल्या मे महिन्यातला किस्सा आहे. एका वयोवृद्ध ज्योतिर्विदाची आणि माझी अगदी योगायोगानेच भेट झाली. हे ज्योतिर्विद श्री रामकृष्णा (नाव बदलले आहे) तेलंगणात वास्तव्य असलेले अत्यंत अभ्यासू, तज्ञ ज्योतिषी, वय 85 चालू पण तब्बेत अजूनही खणखणीत, आजही या वयात सकाळी आठ ते रात्री आठ सतत ज्योतिष मार्गदर्शन करतात. ते स्वतः: ‘नक्षत्रपद्धती’ चे अगदी कट्टर म्हणता येईल असे, प्रत्यक्ष के.एस. कृष्णमूर्ती कडून ‘नक्षत्र पद्धती’ चा धडा गिरवणारे जे काही मोजकेच ज्योतिषी हयात आहेत त्या पैकी हे एक. 

अर्थात ‘नक्षत्र पद्धती’ वाल्यांचे सर्व दोष पण यांच्या अंगात ठासून भरलेले होते  हे वेगळे सांगायला नको. मला त्यांच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासातून काही शिकता आले तर बघायचे होते पण त्यांचे घोडे फक्त आणि फक्त ‘के एस के आणि सब लॉर्ड’ वर अडले होते, नक्षत्र पद्धती पेक्षाही चांगल्या, अचूक पद्धती या जगात अस्तिवात आहेत हे त्यांना मंजूरच नव्हते, मी अनेक उदाहरणे, दाखले देत होतो पण काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते.

त्या अवस्थेत मी त्यांच्या कडून काही शिकता येते का या प्रयत्नांत होतो, पण चर्चेची गाडी ‘नक्षत्र पद्धती’ वरुन इतर ज्योतिषतंत्रांवर वर आणणे महा मुश्किल होते.

मध्येच ते उसळले आणि म्हणाले.

“ही घे पत्रिका, एका महिलेची आहे, ही महिला पंधरा वर्षांची असताना हिच्या जीवनात एक भयंकर घटना घडली आहे, सांगू शकतोस नेमके काय झाले असावे?”

“जन्म तपशील द्या, मी नक्की प्रयत्न करतो”

‘शाब्बास, मला वाटले तू नाही म्हणशील, इतर अनेक तज्ञ ज्योतिषी जसे पळून गेले तसा पळून जाईल , कर प्रयत्न, बघूया जमते का ते!”

त्यांनी दिलेला जन्म तपशील :

या महिलेची पारंपरिक पद्धतीने केलेली जन्मपत्रिका सोबत दिली आहे.

अर्थात अशा प्रकाराच्या आव्हानाला पारंपरिक पद्धतीने उत्तर देता येत नाही असा माझा अनुभव असल्याने मी माझ्या सरावाच्या आणि भरवशाच्या वेस्टर्न पद्धतींचा वापर करायचे ठरवले त्यानुसार केलेली सायन पत्रिका शेजारी दिली आहे.

जातकाच्या वयाच्या 15 व्या वर्षी घटना घडली आहे, घटनेची नक्की तारीख माहिती नाही, म्हणून मी जातकाला पंधरावे वर्ष सुरू झाले तिथून सुरवात करायचे ठरवले, त्या नुसार 1 जानेवारी 2009 चा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट तयार केला



चार्ट पाहताच मी हादरलो!

कारण हा चार्ट चक्क विवाह योग  दाखवत होता!  

श्री रामकृष्ण म्हणाले होते ‘एक भयंकर घटना ‘ !! विवाह एक एक भयंकर घटना कशी काय?

पण वयाच्या 15 व्या वर्षी विवाह कसा होऊ शकेल ? आजच्या काळात हे अशक्य आहे! पण ज्या अर्थी एक भयंकर घटना असे वर्णन केले आहे म्हणजे या जातकाला फूस लाऊन / पळवून नेऊन, जबरदस्तीने विवाह लावला गेला असणार आणि म्हणूनच ती एक एक भयंकर घटना मानली जात असावी ! 

फसवणूक ही शक्यता असल्याने माझी  नजर स्वाभाविकच चंद्र – नेपच्यून जोडी कडे गेले. तसे योग नजीकच्या काळात होणार ही होते!

चार्ट चे टायमिंग थोडे थोडे पुढे नेत गेलो आणि मला तो इव्हेंट अगदी बरोबर पकडता आला, हा तो नेमक्या इव्हेंटचा प्रोग्रेस्ड चार्ट:

जन्मस्थ शुक्र आणि जन्मस्थ युरेनस हे दोघेही प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू च्या योगात आहेत, त्याचा वेळी प्रोग्रेस्ड चंद्र  जन्मस्थ नेपच्यून च्या योगात आहे.

मी उत्तर दिले :

85 वर्षांचे वयाचे,अत्यंत अनुभवी, गाढे अभ्यासक जेव्हा वयाची तमा न बाळगता चक्क माझे पाय धरू लागले तेव्हाच मी ओळखले …………

Similar Posts

12 Comments

  1. सर आम्ही सेकंडरी प्रोग्रेशन साठी फार उत्सुक आहोत.

    1. सध्यातरी क्लास घेणे शक्य होणार नाही. धन्यवाद आणि शुभेच्छा

      सुहास गोखले

  2. good example for serious students of astrology.
    those interested in practice sessions should definetely look for such cases.

  3. एलन लिओचे प्रोग्रेस्ड होरोस्कोप म्हणून पुस्तक आहे हे समजले.त्याबदंदल थोडी माहिती मिळाली.त्यामुळे मला पण इंटरेस्ट निर्माण झाला ही पद्धत शिकायला हवी म्हणून. आपण तसे छान उदाहरण दिले आहे, धन्यवाद सर.

  4. Khupach chan sir, bhavishyat kadhi class ghenar asal tar mi interested ahe.
    Tumhi patrika baghun margdarshan karta ka

    1. सध्यातरी क्लास घेणे शक्य होणार नाही. पुढे मागे क्लास घेतला तर त्याबद्दल आपल्याला कळवेन.

      मी ज्योतिष विषयक मार्गदर्शन करतो (व्हॉट्स अप/ इमेल) , मी ‘प्रश्न’ काय आहे त्यावर मानधनाचे ठरवतो, साधारण रंज रु ५०० ते रु १५०० / प्रति प्रश्न असते.

      धन्यवाद आणि शुभेच्छा

      सुहास गोखले

  5. Sir very nice and informative case study. Just to let u know that I have started practicing secondary progressing method.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *