असे जातक येती … १

समोर खुर्चीत बसली  होती एक ‘अंबक्का’ , खुर्चीत मावत नव्हती!

“तो  ‘विकि’  कित्ती गोड आहे , त्याच्याशी माझे लग्न होईल का ते सांगा!”

“हा ‘विकि’ कोण?”

“आहे असाच… मला फार फार फार फार फार फार आवडतो”

“तुमचे प्रेम आहे का?”

“सध्या नै , पण नंतर होणार आहे!”

“हे कसे काय?”

“असेच”

“मग तुमचे प्रेम सुरु झाल्यावर विचार ना प्रश्न, आत्ताच घाई का करतेस?”

“तुम्हाला नै कळणार ही प्रेमाची भानगड”

“म्हणजे काही भानगड पण आहे का?”

“तसे नै हो, अजून काहीच झालेले नाही”

“मग , काही तरी झाल्यावरच बोलूयात ना आपण”

“हो पण विकि शीच लग्न होणार असेल पुढे जाण्यात मतलब नै का?”

एकतर्फी प्रेमाचा मामला आहे हे उघडच दिसतच होते, मी सहसा अशा प्रश्नांची उत्तरें देत नाही. पण मुलगी माझ्या एका चांगल्या मित्राच्या ओळखीतून आलेली होती, नाही म्हणता आले नाही.

प्रश्न कुंडलीने ही स्थिती अगदी बरोबर दाखवली होती (एकतर्फी का असेना , पोरगी त्या विकी वर मनापासुन प्रेम करत असावी)  , अर्थात त्या मुलाशी हिचे काही जमणार नव्हते , ग्रहयोग इतक्या पराकोटीचे विरुद्ध होते की बस्स! मी साफ सांगीतले ….

“तुझे हे प्रेम एकतर्फी आहे असे दिसतेय, ह्या विकीशी साधा ‘आँखो ही आँखो में इशारा’ सुद्धा होणार  नाही,  विवाह तर फार लांबची गोष्ट!”

त्या मुलीने क्षणभर माझ्याकडे रोखून पाहीले आणि म्हणाली…

“मला माहीतेय , तुम्ही पत्रिका न बघताच केवळ माझ्याकडे बघून हे विधान केले असणार”

“मी जे बोलतोय ते पत्रिकेचा पूर्ण अभ्यास करुन , तुला बघून मी मत बनवले नाही, तू फोन करुन विचारले असतेस तरी हेच उत्तर मिळाले असते”

“ समजा, मी ‘बिपाशा बसू’ असते तर तुमचे उत्तर हेच असते का?”

“पण तू बिपाशा बसू नाहीस”

“पण तसे समजयाला काय हरकत आहे”

“पण असे का म्हणून समजायचे?”

“त्याने तुमच्या उत्तरात फरक नै का पडणार?”

“माझे आई, तू पहील्यांदा बिपाशा बनून ये , पुन्हा प्रश्न विचार, मी तुला साक्षात ‘शाहरुख’ मिळवून देतो..”

“शाहरुख चे लग्न झालेय”

“त्याचे लग्न झालेले नाही असे समजायला काय हरकत आहे”

….

Similar Posts

  • |

    अशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३

    ‘डॉक्टर ’ चा अंदाज (का नेम ?) चुकल्याने ज्योतिषीबुवा हडबडले, खरे तर अगदी सुरवातीलाच पत्रिकेवर वर-वर ची नजर टाकून एखाद्याचे शिक्षण / व्यवसाय सांगून तोंडघशी पडून घ्यायची काहीच गरज नव्हती. कारण इतक्या अपुर्‍या माहीतीवर आणि पत्रिकेचा फारसा अभ्यास न करताच असले…

  • |

    माया जाल!

    होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे. अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत…

  • |

     एक भयंकर घटना

    गेल्या मे महिन्यातला किस्सा आहे. एका वयोवृद्ध ज्योतिर्विदाची आणि माझी अगदी योगायोगानेच भेट झाली. हे ज्योतिर्विद श्री रामकृष्णा (नाव बदलले आहे) तेलंगणात वास्तव्य असलेले अत्यंत अभ्यासू, तज्ञ ज्योतिषी, वय 85 चालू पण तब्बेत अजूनही खणखणीत, आजही या वयात सकाळी आठ ते…

  • |

    नोकरी मिळेल का?

    मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही  प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे  नुकत्याच  एका सभासदाने  विचारलेल्या प्रश्नाला मी  उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी…

  • |

    ‘विल्स’ ही ‘विल्स’ होती !

    ‘विल्स’ ही ‘विल्स’ होती ! बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल ! बाकी…

  • |

    परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* १६ मार्च २०२४ ची…

6 Comments

  1. तुम्हाला नवीन ‘व्यक्ती आणि वल्ली’ लिहायला काहीच हरकत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *