उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १
फार फार म्हणजे शेकडो वर्षा पूर्वीची ही कथा आहे. गोदावरीच्या तीरावर , एका अरण्यात स्वामी नुस्केलाल बाबांचा आश्रम होता, बाबा मोठे तपस्वी होते , अध्यात्म , धर्मशास्त्र , तत्वज्ञान, योग शास्त्र , आयुर्वेद, अर्थशास्त्र .. त्यांना सगळ्या शास्त्रांचे ज्ञान होते ….
