साधी सुधी मार्टिनी

आपण  हे ढोसलेत का  ? साधी सुधी मार्टिनी

एकदम सोपी , चिअरफुल …. ट्राय करणार ?

मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती !

साहीत्य:

  1. ८०  मिलि जीन  ( नवशिक्यां साठी )  किंवा ८० मिली  वोडका (पहुंचे हुए इन्सानों के लिए !)
  2. २० मिलि व्हाईट व्हेरमॉथ वाईन  ( हलकी , फळे  /पाने / रुट्स / झाडाच्या सालीं इत्यादींचा स्वाद असलेली वाईन)
  3. ६ बर्फाचे क्युब्स
  4. ३ – ४ हिरवी ऑलिव्ह फळें

कृती:

  1. स्वच्छ धुवुन , कोरडा केलेला (आणि रिकामा ) मार्टीनी गिलास फ्रिज मध्ये गारे गार व्हायला ठेऊन द्या .
  2. किमान पाचेक मिण्टं तरी गिलास गार गार झाला पायजे असे बघा.
  3. .जीन /  वोडका आणि व्हेरमॉथ वाईन एका  कॉकटेल शेकर मध्ये (हल्लू हल्लू !) घ्या,  त्यातच बर्फ़ाचे ६ तुकडे सोडा (पुन्हा हल्लू हल्लू  !) , आणि सुमारे अर्धा मिनीट शेक करा किंवा हलक्या हाताने ढवळा.
    मला विचाराल तर ‘हलक्या हाताने ढवळणे ‘ चांगले , असे केल्याने बर्फाचे पाणी होत नाही आणि ते पाणी मिसळले जाऊन ड्रिंक सपक / फिके होणार नाही !
  4. ( दोन्ही येक येक डाव करुनशान बघा , आणि ठरवा आपल्याला काय सुट होते ते !)
  5. आता फ्रिज मधला गारे गार गिलास बाहेर काढा आणि शेकर मधले चैतन्य पेय (फक्त चैतन्य पेय , बरफ नाही घ्यायचा )  गिलासात अल्ल्लाद पणे ओता.
  6. वरतून सजावटी साठी हिरवी आलिव्ह फळे वापरा , फटूत दावल्या प्रमाणे.

लग्गेच  ढोसा , थांबू नका , गरम मार्टीनी चांगली लागत नाsssssssssय !

Similar Posts

  • |

    संधी !

      (ही कथा मी 2006 साली ‘मनोगत’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली होती, माझ्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोयी साठी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देत आहे. ही कथा 1960 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत आहे. मला ज्या व्यक्ती कडून हा प्रसंग कळला ती…

  • |

    नब्बे (९०) वाले बाबा !

    पाव्हणं, हे ‘नब्बे याने की ९०’ आणि ‘आपली वो वाली 90’ यकदम वायले वायले बर्का , गोंधळ करून घ्येऊ नक्का. तसे आपल्याला दोन्ही ‘नब्बे’ सारखेच (ये हुई ना बात!),  पण बसणार्‍याचा उगाच (गोड) गैरसमज होवू नये म्हणून आधीच खुलासा टाकून ठ्येवलेला…

  • |

    माया जाल!

    होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे. अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत…

  • |

    अस्सा पुतळा सुरेख…

    भारतातल्या कोणत्याही  गावात शहरात जा , अनेक बेढव पुतळे  जागोजागी  दिसतील.. पुतळे कशाला लागतात हा मोठ्या वाद – विवादाचा विषय आहे , क्षणभर  तो बाजूला ठेऊया. पुतळा उभा करायचाच असेल  तर  तो अशा पद्धतीनेही  उभा करता येईलच की, नमुन्या दाखल  हे…

  • |

    डबल परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* ०५ फेब्रुवारी २०२४, रात्रीचे…

  • |

    शक्याशक्यता !

    ( या फटू चा आणि लेखाचा काहीही संबंध नाही ,  फटू  आवडला म्हणूण डकवला आहे. फटू इंटरनेट वरुन उचलला आहे हे वेगळे सांगायला नको !) नुकतेच एका जातकाने विचारलेल्या काही शंकांना उत्तर दिले , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर…

10 Comments

  1. कडक. वीकेंड जोरात चालु झालेला दिसतोय. व्होड्काचा चाहता नाही मी पण कधी ट्राय करीन रेसीपी.

    1. श्री. हिमांशुजी

      मार्टीनी च घेतली नाही का व्होडका वाली मार्टीनी घेतली नाय .. काय ह्ये राव .. त्ये कै नै लगूलग़ ट्राई माडी आण्णा..

      (आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)

      सुहास गोखले

      1. आम्ही बियरचे चाहते. अजुन कोवळे वय आहे ना. मधुन मधुन मार्गारीटा किंवा मोहीतो चा आस्वाद घेतो.

        1. हिमांशुजी, मस्त ! सुरवात होणे महत्वाचे ! (पण ते बियर चे घरी म्हैतैय का ? खळ्ळ खट्याक ची भिती असते !)

          सुहास गोखले

      2. म्हन्जे काय….आपले लपवुन छपवुन काय नाय…बायकोमान्य असते सगळे

        1. हिमांशु , ह्ये एक बरां करतां तुमी… बायकूक समदा संगीतलेनी की काय तरास नाsssssssssssय … रवळनाथांन तुका समजुतदार बाईल दिली आसांत .. पर तू येकलाच पी हां … तेका ह्ये अस्ला काय देवूक नाय… ते बरा दिसत नाssssssय , काय समजलेनी ?

          सुहास गोखले

  2. Solid Post on Friday evening – now weekend is started 🙂

    Ideally, vodka martinis should be stirred, not shaken.
    James Bond Style – Shaken not Stirred is better for regulars, Cheers.

    -Anant

    1. श्री. अनंताजी

      स्टीर केले तर बर्फाचे पाणी होत नाही व ड्रिंक डायल्यूट होत नाही असा फंडा आहे पण..पण… शेक केले की स्पिरीट्स मोकळे होतात, त्यात हवा मिसळली गेल्यामुळे ‘स्पार्क’ (बबल) येतात, काहीतरी केमिकल् लोच्या होतो त्याने ड्रिंक ची खुमारी वाढते !! दोन्ही येकेक डाव करुण पाहा ..फिल दि डिफरान्स …

      (आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)

      सुहास गोखले

  3. आम्हाला यातलं काही कळत नाही सुहास जी , पण as a medicine म्हणून किरकोळ शरीरयष्टी असेल तर तब्बेत सुधारण्यासाठी कोणती प्यावी हे जर सांगाल काय ?

    1. श्री. स्वप्नीलजी,

      हे असले काहि ‘तब्बेत सुधारण्या साठी नै … !” , पण एक निखळ आनंद घेण्यासाठी आहे हे !

      सुहास गोखले

Leave a Reply to Himanshu Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *