साधी सुधी मार्टिनी

आपण  हे ढोसलेत का  ? साधी सुधी मार्टिनी

एकदम सोपी , चिअरफुल …. ट्राय करणार ?

मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती !

साहीत्य:

  1. ८०  मिलि जीन  ( नवशिक्यां साठी )  किंवा ८० मिली  वोडका (पहुंचे हुए इन्सानों के लिए !)
  2. २० मिलि व्हाईट व्हेरमॉथ वाईन  ( हलकी , फळे  /पाने / रुट्स / झाडाच्या सालीं इत्यादींचा स्वाद असलेली वाईन)
  3. ६ बर्फाचे क्युब्स
  4. ३ – ४ हिरवी ऑलिव्ह फळें

कृती:

  1. स्वच्छ धुवुन , कोरडा केलेला (आणि रिकामा ) मार्टीनी गिलास फ्रिज मध्ये गारे गार व्हायला ठेऊन द्या .
  2. किमान पाचेक मिण्टं तरी गिलास गार गार झाला पायजे असे बघा.
  3. .जीन /  वोडका आणि व्हेरमॉथ वाईन एका  कॉकटेल शेकर मध्ये (हल्लू हल्लू !) घ्या,  त्यातच बर्फ़ाचे ६ तुकडे सोडा (पुन्हा हल्लू हल्लू  !) , आणि सुमारे अर्धा मिनीट शेक करा किंवा हलक्या हाताने ढवळा.
    मला विचाराल तर ‘हलक्या हाताने ढवळणे ‘ चांगले , असे केल्याने बर्फाचे पाणी होत नाही आणि ते पाणी मिसळले जाऊन ड्रिंक सपक / फिके होणार नाही !
  4. ( दोन्ही येक येक डाव करुनशान बघा , आणि ठरवा आपल्याला काय सुट होते ते !)
  5. आता फ्रिज मधला गारे गार गिलास बाहेर काढा आणि शेकर मधले चैतन्य पेय (फक्त चैतन्य पेय , बरफ नाही घ्यायचा )  गिलासात अल्ल्लाद पणे ओता.
  6. वरतून सजावटी साठी हिरवी आलिव्ह फळे वापरा , फटूत दावल्या प्रमाणे.

लग्गेच  ढोसा , थांबू नका , गरम मार्टीनी चांगली लागत नाsssssssssय !

Similar Posts

  • |

    ह्ये घेटलं !

    बोस साऊंड्लिंक २ , ब्लू टूथ स्पीकर ! मस्त आवाज आहे, खोली दणाणून सोडतयं बेणं , इतक्या छोट्या नरड्यातूण ह्ये इतका मोठ्ठा आवाज म्हणजे आक्रितच म्हणायचे , पण असे आसले तरी . फुल्ल डीजे साऊंड सोडला तरी गला फाटत नाय… आवाज…

  • |

    ती गेली तेव्हा… (भाग – २)

    ……. नाही जाणार मी, लोक बोलतील, बघा एव्हढा जवळचा मित्र गेला पण हा आला नाही .. म्हणू देत लोकांना काय म्हणायचे ते, मला पाहावणार नाही तो परब असा चितेवर जळताना.. परब कसा गेला इतक्या लवकर ? माझ्या पेक्षा चारच तर वर्षाने…

  • स्वागतम् !

    नमस्कार, मित्रांनो, माझ्या या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे ! या ब्लॉग वर मी माझे ज्योतिष विषयक अनुभव लिहणार आहे, तसेच काही माहितीपर लेख, केस स्टडीज (या केस स्टडी ला मराठीत काय म्हणतात हो?)  ज्योतिषाच्या अभ्यासकांसाठी ‘ओळखा पाहू’ …. आणि बरेच काही. तुम्हाला…

  • |

    पंछी बनू उडके फिरु ..

    मी विज्ञानवादी आहे पण विज्ञानाला आजपर्यंत आकलन न झालेल्या अशा काही गोष्टी या विश्वात आहेत / असू शकतात असे मी मानतो. मी स्वत: अत्यंत शास्त्रशुद्ध (विज्ञाननिष्ठ पद्धतीने) अत्यंत आधुनिक पद्धतीने, फास्ट ट्रॅक ध्यान रोज करतो, अक्षरश: पाचव्या मिनिटाला मी ‘थेटा स्टेज’…

  • |

    हम होंगे कामयाब !

    मी दोन अत्यंत प्रतिष्टीत अशा ‘होरारी अस्ट्रॉलॉजी’ ग्रुप्सचा सदस्य आहे. सध्या हे दोन्ही ग्रुप्स ‘फेसबुक’ च्या माध्यमातुन चालवले जात आहेत. अर्थातच हे दोन्ही ग्रुप ज्योतिष अभ्यासकांसाठी आहेत (फुकट ज्योतिषाची खिरापत ईथे वाटली जात नाही !) . अधुन मधुन आम्ही काही क्वीझ…

  • |

    डबल परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* ०५ फेब्रुवारी २०२४, रात्रीचे…

10 Comments

  1. कडक. वीकेंड जोरात चालु झालेला दिसतोय. व्होड्काचा चाहता नाही मी पण कधी ट्राय करीन रेसीपी.

    1. श्री. हिमांशुजी

      मार्टीनी च घेतली नाही का व्होडका वाली मार्टीनी घेतली नाय .. काय ह्ये राव .. त्ये कै नै लगूलग़ ट्राई माडी आण्णा..

      (आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)

      सुहास गोखले

      1. आम्ही बियरचे चाहते. अजुन कोवळे वय आहे ना. मधुन मधुन मार्गारीटा किंवा मोहीतो चा आस्वाद घेतो.

        1. हिमांशुजी, मस्त ! सुरवात होणे महत्वाचे ! (पण ते बियर चे घरी म्हैतैय का ? खळ्ळ खट्याक ची भिती असते !)

          सुहास गोखले

      2. म्हन्जे काय….आपले लपवुन छपवुन काय नाय…बायकोमान्य असते सगळे

        1. हिमांशु , ह्ये एक बरां करतां तुमी… बायकूक समदा संगीतलेनी की काय तरास नाsssssssssssय … रवळनाथांन तुका समजुतदार बाईल दिली आसांत .. पर तू येकलाच पी हां … तेका ह्ये अस्ला काय देवूक नाय… ते बरा दिसत नाssssssय , काय समजलेनी ?

          सुहास गोखले

  2. Solid Post on Friday evening – now weekend is started 🙂

    Ideally, vodka martinis should be stirred, not shaken.
    James Bond Style – Shaken not Stirred is better for regulars, Cheers.

    -Anant

    1. श्री. अनंताजी

      स्टीर केले तर बर्फाचे पाणी होत नाही व ड्रिंक डायल्यूट होत नाही असा फंडा आहे पण..पण… शेक केले की स्पिरीट्स मोकळे होतात, त्यात हवा मिसळली गेल्यामुळे ‘स्पार्क’ (बबल) येतात, काहीतरी केमिकल् लोच्या होतो त्याने ड्रिंक ची खुमारी वाढते !! दोन्ही येकेक डाव करुण पाहा ..फिल दि डिफरान्स …

      (आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)

      सुहास गोखले

  3. आम्हाला यातलं काही कळत नाही सुहास जी , पण as a medicine म्हणून किरकोळ शरीरयष्टी असेल तर तब्बेत सुधारण्यासाठी कोणती प्यावी हे जर सांगाल काय ?

    1. श्री. स्वप्नीलजी,

      हे असले काहि ‘तब्बेत सुधारण्या साठी नै … !” , पण एक निखळ आनंद घेण्यासाठी आहे हे !

      सुहास गोखले

Leave a Reply to स्वप्नील Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *