आणखी एक शुक्र – युरेनस, शुक्र नेपच्यून अशुभ योगाची पत्रिका.
स्त्री जातक, 25 जुलै 1995, दुपारी 02:45, कल्याण (महाराष्ट्र)

- शुक्र – युरेनस आणि शुक्र – नेपच्यून हे दोन्हीही अंशात्मक प्रतियोग
- वक्री शनी – मंगळ जवळपास अंशात्मक प्रतियोग.
- जोडीला चंद्र – वक्री शनी केंद्रयोग आहेच (यशवंत आणि गुणवंत?)
घटस्फोट अर्थातच झालेला आहे. नवरा व्यसनी आणि बाहेरख्याली होता.
चंद्र – मंगळ केंद्रयोग आहे म्हणून असेल कदाचित जातक MA मानसशास्त्र असून, त्याच क्षेत्रात काउन्सेलर म्हणून काम करत आहे.
लग्नात गुरु – प्लुटो युती आहे , सामान्यत: ही युती किंबहुना गुरु – प्लुटो संबंध (खास करून गोचरीने अथवा प्रोग्रेशनसने) येतात तेव्हा जातकाला मोठा आर्थिक लाभ (काही वेळा तर अगदी छप्पर फाडके म्हणतात तसा!) मिळतो, जातकाला मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे, जातकाला तिच्या आत्याची मोठी संपत्ती (रियल इस्टेट आणि कॅश !) मृत्यूपत्र द्वारे मिळाली आहे!
आणखी एक निरीक्षण: जातक कमालीची लठ्ठ आहे! (का?)
होमवर्क:
- या पत्रिकेतला पंचमातला वक्री शनी काय स्टुरी सांगतोय?
- विवाह कधी झाला असेल?
- घटस्फोट कधी झाला असेल?
- नवरा बाहेरख्याली होता हे पत्रिकेत दिसते का?
- जातकाला मोठा आर्थिक लाभ केव्हा झाला असेल?
- गुरु- प्लुटो योगावर एक लहानसा निबंध लिहा.
या महिलेचा विवाह मे 2021 मध्ये झाला आहे.

या महिलेचा घटस्फोट जून 2023 मध्ये झाला आहे

मार्च 2026 मध्ये ह्या महिलेला अचानक पणे तिच्या आत्याची बरीच मोठी इस्टेट मृत्युपत्र द्वारे प्राप्त झाली, अर्थात त्यासाठी जातकाला कायदेशीर लढाई करावी लागली आणि टप्प्या टप्प्यात इस्टेट मिळाली, सगळ्यात मोठा हिस्सा मार्च 2026 मध्ये मिळाला, अजूनही सुमारे 100 ग्राम सोन्याच्या दागिन्यांचा (रु 15 लाख!) एक दावा पेंडिंग आहे

हे असले प्रश्न ‘सब लॉर्ड’ थिअरीने सुटत नाहीत आणि दशा पद्धतीही बऱ्याचं वेळा अपयशी ठरते. सेकंडरी प्रोग्रेशन्स सारखे अचूक तंत्र वापरणे आवश्यक आहे.
