माया जाल!

होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे.

अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत तळमळीने विचारणे अत्यावश्यक असते, ही तळमळ नसेल म्हणजे उगाच उत्सुकता म्हणून,  दिसला ज्योतिषी मार टप्पल या हेतूने किंवा प्रश्ना संदर्भात काहीही घडले तरी जातकावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असे प्रश्न, वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नतर प्रश्न विचारणे ( ही यादी तशी बरीच मोठी होऊ शकते) अशातला प्रकार असेल तर प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्य होते.

जातकाने पुरेशा तळमळीने प्रश्न विचारलेला आहे हे कसे ठरवायचे? जातकाची तळमळ मोजायचे कोणतेही मीटर उपलब्ध नाही, ज्योतिषाने आपल्या अनुभवाचा आणि संभाषण कौशल्याचा वापर करून ‘तळमळ’ आहे का नाही हे ठरवावे. हा भाग असा शिकवून येणार नाही, या साठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत जरूर पण त्याबद्दल आत्ता काही लिहीत नाही कारण तो एक वेगळ्या मोठ्या लेखाचा विषय होऊ शकतो. 

जातकाला प्रश्ना बाबत आत्यंतिक तळमळ असेल तर प्रश्न नेमका अशा वेळेला विचारला जातो की त्या क्षणाची पत्रिका क्षणार्धात सगळे चित्र आपल्या समोर उभे करते, यालाच आपण ‘रॅडिकल चार्ट’ म्हणतो. असा चार्ट असेल तर जातकाच्या प्रश्नाचे उत्तर अगदी उठावदार पणे आपल्या समोर येते.

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही होरारी केस स्टडी. 

राजेश ने एका आर्थिक गुंतवणुकी संदर्भात माझ्याशी संपर्क साधला होता. राजेश त्या गुंतवणुकी बद्दल अगदी भरभरून बोलत होता, इतका की मलाही त्यात गुंतवणूक करा असे त्याने सुचवले! ज्या व्यक्ती कडे ही गुंतवणूक होणार होती त्या व्यक्ती बाबत ही राजेशचा अगदी नको इतका विश्वास दिसत होता.


राजेशचा प्रश्न होता “मी XXXX व्यक्ती कडे गुंतवणूक करू का? यात कोणता धोका/ नुकसान तर होणार नाही”


“राजेश तुला माहिती आहे ना, अशा प्रकारच्या गुंतवणुकी नेहमीच धोकादायक ठरत आल्या आहेत, जेव्हा Something is too good to be true, then it is”

“मान्य आहे असे प्रकार होतात पण या खेपेला मी पूर्ण माहिती घेतलीय, रिसर्च केलाय , प्रमोटर xxxx बद्दल मला पूर्ण भरवसा आहे, एकदम नेक व्यक्ती आहे, फसवणार नाही. YY YYYY सारखी सेलिब्रिटी व्यक्ती यात पैसे गुंतवत आहे ती असा भरवसा असल्या शिवाय का?”

आता राजेशला कसे समजावायचे की हे सेलेब्रेटी आणि त्यांचे एंडोर्समेंट हा मार्केटिंगचा भाग असतो, ते एक नाटक / दिखावा असतो, लोकांना भुलवण्यासाठी. 

मी विचारले…

“जर तुला इतका भरवसा आहे तर मग ‘गुंतवणूक करू का’ असा प्रश्न तरी का विचारतोस, करून टाक गुंतवणूक”

“सरजी, मला पूर्ण खात्री आहे ही गुंतवणूक सणसणीत रिटर्नस देणारच पण त्याचे काय आहे मागे दोन वेळा मोठे फटके बसलेत तेव्हा या खेपेला जरा सावध आहे आणि म्हणूनच तुम्हाला विचारतो आहे, जरा बघता का ग्रहताऱ्यांचा कौल काय आहे? “

“ठीक आहे आता तू म्हणतो आहेस तर बघूया ग्रहतारे काय सुचवत आहेत ते”



राजेशचा प्रश्न मला पूर्णपणे समजला त्या क्षणाचा चार्ट ( होरारी चार्ट) तयार केला जो खाली दिला आहे. 

पत्रिकेत सिंह लग्न २३ अंशांवर आहे, म्हणजे लग्नेश रवी राजेशचे प्रतिनिधित्व करेल. चंद्र अर्थातच प्रश्नकर्त्याचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतो. लग्नात इतर कोणताही ग्रह नाही. 

राजेशचा पैसा द्वितीय ( २ ) स्थानावरून पहायचा, इथे बुधाची कन्या रास आहे, अर्थातच धनेश बुध राजेशच्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल. द्वितीय स्थानात केतू आहे पण छाया ग्रहांना प्रतिनिधी म्हणून घेण्याची प्रथा नाही.

राजेश ज्या व्यक्ती कडे आर्थिक गुंतवणूक करणार आहे ती व्यक्ती सप्तम ( ७ ) स्थानावरून पहायची, सप्तमावर शनीची कुंभ रास आहे, सप्तमात शनी आणि चंद्र  आहेत, चंद्र जातकाचा प्रतिनिधी असल्याने त्याचा विचार आता नाही त्यामुळे सप्तमेश शनी हा एकच ग्रह त्या परक्या व्यक्तीचा प्रतिनिधी असेल.

त्या परक्या व्यक्तीचा पैसा अष्टमा ( ८ ) वरुन पाहायचा, अष्टमावर गुरूची मीन रास आहे, अष्टमात राहू आणि नेपच्यून आहेत पण या दोघांचाही प्रतिनिधी म्हणून विचार करता येणार नाही त्यामुळे अष्टमेश गुरु त्या परक्या व्यक्तीचा पैसा दाखवेल.

पत्रिकेत सप्तमात ( ७ ) शनी आहे, अशी स्थिती असताना काही ज्योतिषी ‘चार्ट रॅडिकल नाही’ असा शिक्का मारून पुढचे अनालायसिस करत नाहीत. हे तितकेसे बरोबर नाही, ही स्थिती केवळ एक वॉर्निंग आहे असे समजून जरा जास्त काळजी घेऊन काम करावे. पत्रिकेचा डेटा बरोबर एंटर केला गेला आहे का? सॉफ्टवेअर ची सेटिंग्ज योग्य आहेत ना? ज्योतिषाची स्व:ताची मन:स्थिती स्थिर आहे ना? याची खातरजमा करुन मगच कामाला सुरवात करावी.

जातकाने “मी  XXXX व्यक्ती कडे आर्थिक गुंतवणूक करू का?” असा प्रश्न विचारला असला तरी बऱ्याचं वेळा असे दिसते की अशी गुंतवणूक आधीच केलेली असते आता त्या गुंतवणुकीचे काय होणार हा खरा प्रश्न असतो. पण लोकांना आपला मूर्खपणा असा स्वता:हून कबुल करायचा नसतो म्हणून भाषा बदलून/ माहिती लपवून, आडवळणाने प्रश्न विचारले जातात.

राजेश अशी गुंतवणूक आधीच करून बसला आहे का? ह्या बद्दलचा काही खुलासा पत्रिकेच्या माध्यमातून होतो आहे का?

बुध जो राजेशच्या पैशाचा प्रतिनिधी आहे त्याचा आणि त्या परक्या व्यक्तीशी (शनी) अथवा त्या परक्या व्यक्तीच्या पैशा बरोबर (गुरु) यांच्यात योग होऊन गेलेले असले पाहिजेत. पण असे कोणतेही योग नजीकच्या काळात झालेले नाहीत.

पण बुध (राजेशचा पैसा) आणि शनी (परकी व्यक्ती) यांच्यात अवघ्या ३ अंशात लाभ योग होणार आहे, आणि बुध (राजेशचा पैसा) आणि गुरु (परक्या व्यक्तीचा पैसा) या दोघां मध्ये ही ४ अंशात नव पंचम योग होणार आहे. याचा अर्थ , राजेश ने अद्याप गुंतवणूक केलेली नसली तरी लौकरच तो अशी गुंतवणूक करणार आहे किंबहुना अशी गुंतवणूक करायचे त्याने ठरवलेच आहे! आता मी हे असे का म्हणतो? याचे कारण चंद्र (राजेश) सप्तम ( ७ )  स्थानातच आहे जे त्या परक्या व्यक्तीचे आहे, म्हणजे त्या परक्या व्यक्तीने राजेशला चांगंलीच भुरळ घातलेली आहे असे दिसते. चंद्र (राजेश) हा शनी( परकी व्यक्ती) च्या युतीतून बाहेर पडला आहे म्हणजे या दोघांत काही बोलणी झाली असणार, इतकेच नव्हे तर काही करार सुद्धा झालेला असणार कारण शुक्र आणि चंद्र (राजेश) यांच्यात नुकताच केंद्र योग होऊन गेला आहे आणि शुक्र तृतीयेश आहे, करार मदाराचा प्रतिनिधी आहे. स्वतः शनी (परकी व्यक्ती) स्वतः:च्याच घरात बळकट आहे आणि रवी (राजेश) पंचम ( ५ ) स्थानात आहे जे स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीचे आहे. 

Similar Posts

4 Comments

  1. सुहास जी,
    तुमचे लेखन पुन्हा सुरू झाले ही एक छान गोष्ट २०२६ मध्ये झाली. असेच लिहित रहा. मी तसा तुमच्या ब्लॉगचा जुना वाचक आहे. मराठीत भविष्य या विषयावर सोप्या पण मार्मिक शब्दात लिहिणारे बोटावर मोजण्याइतके आहेत (एका बोटावर). त्यातही धोंडोपंत यांचा ब्लॉग आता बघता येत नाही.
    अनंत शुभेच्छा आणि धन्यवाद !

    1. धन्यवाद मनीषजी,

      आपला अभिप्राय वाचून आनंद झाला.

      कोविड काळात माझे लेखन बंद झाले ते झाले, अर्थात कोविड हे एक निमित्त ठरले प्रत्यक्षात लिखाणाला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहून सगळा उत्साह निघून गेला होता. आपण जो लेख काही मिनिटांत वाचून संपवता तो लेख लिहण्या मागे माझी तासांची मेहनत असते. या ब्लॉग्ज लिखाणातून मला ना पैसा मिळतोय ना प्रसिद्धी, केवळ माझ्या कडे असलेली माहिती, माझे अनुभव यांचा थोडा फार का होईना लाभ इतरांना व्हावा इतकाच हेतू मनात ठेऊन मी लिहीत असतो. या लेखनाकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे ही बाब मात्र खरी.

      पूर्वी माझ्या या वेबसाईट ला दिवसाला २०० पेक्षा जास्त ( महिन्यात साधारण ५०००+) व्हिजीटर्स असायचे , ती संख्या रोडावत आता महिन्याला ४०० इतकी खाली घसरली आहे, एकूणच फेसबुक, इन्स्टा, यू ट्यूब , व्हॉट्स अप च्या तडाख्यात वेबसाईट (ब्लॉग्ज) अडगळीत टाकले गेले आहेत.

      तरीही जसा वेळ मिळेल तसे थोडेफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. ही वेबसाईट फक्त जिवंत ठेवायचा खर्च महिन्याला रु ५०० इतका आहे (डोमेन नेम + होस्टिंग चा खर्च) ही पदरमोड करून मी हा उपक्रम चालू ठेवत आहे, आपल्या सारख्या वाचकांनी असेच प्रेम दिले तर नवीन लेखन करायला उमेद मिळेल.

      पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार.

  2. १) जातकाचे धनस्थान हे प्रॉफिट लॉस दाखवतात. धनस्थानाचा रुलर बुध हा 7 डिग्री मध्ये मंगळाशी युती योग करत आहे. मंगळ हा पाप ग्रह आहे तो जातकाच्या पंचम स्थानात आहे त्यामुळे जातकाचे बँक अकाउंट फ्रिज झाले आहे.
    २) पोलीस सायबर सेल सहाव्या स्थानावरून तर सायबर क्राईम हे 12 वे स्थानावरून आणि एफ आय आर कोर्ट केस हे सातव्या स्थानावरून पाहतात. सहाव्या स्थानात जातकाच्या पापग्रह प्लुटो बसलेला आहे. बाराव्या स्थानाचा रुलर चंद्र हा प्लुटोशी 7 डिग्री मध्ये लाभ योग करत आहे. तसेच प्लुटो हा scheat (२९ डिग्री)असल्याने तो फार डेंजरस झालेला आहे. मंगळ पाप ग्रह हा पाच डिग्री मध्ये प्लुटोशी युती योग करत आहे. यावरून जातकाला सायबर क्राईम सेल ची नोटीस व एफ आय आर झालेला आहे.

  3. बुध मंगळ युती होणार आहे ( पंचम स्थानात ) पंचम स्थान — legal / illegal . मंगळ हा देखील पोलीस केसचा कारक.

    बुध राहू नवपंचम ( राहू — फसवेगीरीचा कारक )

    बुध मंगळ युती होताना , बुध ( राजेशचा पैसा ) आणी शनी यांच्यात लाभ योग ( शनी — police cases. सातवे स्थान — law suits

Leave a Reply to Manish Nehete Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *