घटस्फोट – २

1990 नंतर जन्म झालेल्या आणि घटस्फोट झालेल्या 200 महिलांच्या पत्रिकांचा अभ्यास जवळपास पूर्ण झाला आहे. या पत्रिकांत असे काय आहे जेणे करून यांना घटस्फोटा सारख्या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले?

या बाबतीतले काही प्राथमीक निष्कर्ष मी या आधीच्या पोष्ट मध्ये मांडले होते. आता सर्वच पत्रिकांचा अभ्यास जवळजवळ पूर्ण झाला असून मी काढलेल्या प्राथमिक निष्कर्षाला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे.

घटस्फोटाला कारणीभूत ठरणारे ग्रहयोग:

1) शुक्राचे युरेनस बरोबरचे अंशात्मक योग: युती, केंद्र आणि प्रतियोग.
2) शुक्राचे नेपच्यून बरोबरचे अंशात्मक योग: युती, केंद्र आणि प्रतियोग.
3) शनीचे मंगळा बरोवरचे अंशात्मक योग: युती, केंद्र आणि प्रतियोग.

काहीश्या कमी प्रमाणात :

4) शुक्राचे शनी बरोबरचे अंशात्मक योग: युती, केंद्र आणि प्रतियोग.
5) चंद्राचे शनी बरोबरचे अंशात्मक योग: युती, केंद्र आणि प्रतियोग.

त्याच बरोबर:

6) सप्तम स्थान कमालीचे दूषित असणे
7) सप्तमेश बिघडलेला असणे

सर्व 200 पत्रिकांत या पैकी किमान 3 तरी योग आढळले आहेत.

शुक्र – युरेनस आणि शुक्र – नेपच्यून योगानं बद्दल मी विस्ताराने लिहीत आहे, ते मी माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करेन किंवा त्यावर व्हिडिओ तयार करेन ( वेळ मिळाला तर!)

शुक्राच्या या योगानंतर नंबर लागतो तो मंगळ – शनी योगाचा. मोठा विदारक आणि काहीसा निर्घृण असा योग आहे.

कारण तो पूर्णपणे भिन्न स्वभाव आणि ऊर्जा असलेल्या दोन ग्रहांना एकत्र आणतो. मंगळ हा इच्छा, उत्कटता, पुढाकार, धाडस आणि ठामपणे कृती करण्याची क्षमता दर्शवतो तर शनी हा जबाबदारी, शिस्त, संयम, मर्यादा आणि दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतिनिधित्व करतो. आणि संधर्ष इथेच निर्माण होतो.

एका जोडीदाराला स्वतःला रोखले जात आहे किंवा सतत टीका केली जात आहे असे वाटल्याने निर्माण होणारी निराशा. राग थेट व्यक्त करण्यात अडचण येणे, ज्यामुळे मनात कटुता किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंध किंवा विवाहा मध्ये विलंब अथवा विविध अडथळे येणे. लैंगिक गरजा किंवा जवळीक व्यक्त करण्याच्या पद्धतींमध्ये विसंगती असणे. एका जोडीदारावर दुसऱ्या पेक्षा अधिक जबाबदाऱ्या पडणे.

या साऱ्यांचा वैवाहिक जीवनावर अत्यंत अनिष्ट असा परिणाम होतो आणि बऱ्याच वेळा याचे पर्यवसान ‘घटस्फोटा ’ मध्ये होते.

वैवाहिका जीवनातल्या अशुभ फळा बरोबरच : गंभीर स्वरूपाचे , असाध्य असे आजार, मोठे भीषण अपघात ( उंचावरुन पडणे, यंत्राशी निगडीत अपघात , स्फोटक पदार्थाचे अपघात , अग्नीपासुन धोका )

जर शनी- मंगळ पापग्रहांच्या कुयोगात असल्यास ( यूजअल सस्पेक्ट : युरेनस) खूनशी कृत्यें घडतात. सातात परिस्थितीशी दोन हात करावे लागतात, सगळी ताकद या झगडण्यातच वाया जाते.

तापट आणि हुकूमशाही प्रवृत्ती असतेच (अपवाद जवळजवळ नाहीच) . राग बेफाम असतो, स्वत:चा हट्ट पुरा करण्यासाठी कोणतेही टोकाचे पाऊल उचलले जाते. .

बोलण्या वागण्यात सातत्य नसते. कधी भरपूर काम तर कधी मोठा आळस. कधी अत्यंत खुनशी तर कधी शांत , प्रेमळ , कधी कडक शिस्त ट्रे कधी का,अळीची बेफिकिरी असा स्वभावाचा लहरी पणा असतो. मोठा निग्रही स्वभाव, दुसर्‍याच्या तंत्राने हे लोक कधीही चालणार नाहीत. क्षुल्लक बाबीं मध्येही साऱ्या जगाशी वैर धरण्याची वृत्ती दिसून येते.

अर्थात एका अशुभ योगा वरून असे टोकाचे निष्कर्ष काढणे धोक्याचे ठरेल याची स्पष्ट जाणीव इथे करून देतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *