“बापाचा सल्ला”

रात्रीची वेळ होती. परसोत्तमभाई — एक नामांकित राजस्थानी व्यापारी . खोलीतल्या मंद दिव्याच्या प्रकाशात अत्यंत एकाग्रतेने दुकानाचा रोजचा हिशेब लिहीत होते.

यांचा सात वर्षांचा मुलगा, जिग्नेश, दबकत दबकत खोलीत आला. बापू रोज रात्री इथे बसून तासनतास काय लिहीत असतात ही उत्सुकता त्याला कित्येक दिवसां पासून होती. आज त्याने धीर एकवटला आणि विचारलेच…

“बापू, एक विचारू?”

हिशेबाच्या वहीवरून नजर वर करत परसोत्तमभाईंनी विचारले,

“काय रे बेटा?”

“तुम्ही रोज वहीत काय लिहीत असता?”

“अरे, हा आपल्या दुकानाचा रोजचा हिशेब आहे. ज्या दिवशीचा हिशेब त्याच दिवशी पूर्ण करायचा, त्याशिवाय झोपायचे नाही — हा आपल्या घराण्याचा नियम आहे. ही वही त्या हिशेबाचीच आहे. “

“अच्छा! दरवर्षी लक्ष्मीपूजनाला आपण ज्या वहीची पूजा करतो ती हीच वही का?”

“हो बेटा, दरवर्षी आपण नव्या वहीची पूजा करूनच वापरायला सुरुवात करतो. अरे ही साधी वही नाही तर साक्षात लक्ष्मी आहे आपल्या साठी आणि हिशेब लिहणे ही लक्ष्मी मातेची पूजा समज “

“मग आधीच्या वर्षांच्या वह्यांचे काय होते बापू?”

“त्या आपण अगदी जिवापाड जपून ठेवतो. आपल्याकडे अशा दीडशे-दोनशे वह्या सुरक्षित आहेत.”

“दीडशे-दोनशे?!” जिग्नेशचे डोळे विस्फारले.

“हो! मी लिहिलेल्या, तुझ्या आजोबांनी लिहिलेल्या, तुझ्या पणजोबांनी आणि त्यांच्याही आधीच्या पिढ्यांनी लिहिलेल्या. आपल्या तळघरात त्या सगळ्या व्यवस्थित सांभाळून ठेवल्या आहेत. चल, तुला दाखवतोच आज.”

बाप-लेक तळघरात उतरले. तळघराच्या एका कोपऱ्यात एक उंच माळा होता. त्या माळ्यावर वर्षानुवर्षांच्या १५०-२०० वह्या अत्यंत शिस्तबद्ध रीतीने रचून ठेवल्या होत्या.

“बापू, मी त्या वह्या जवळून बघू?” जिग्नेशने उत्सुकतेने विचारले.

“का नाही बेटा! आज ना उद्या हे सगळे तुलाच तर सांभाळायचे आहे. जा, वर माळ्यावर जा आणि बघ.”

“पण मी इतक्या उंचावर कसा जाणार?”

“हे काय, इथे शिडी लावली आहे ना? तिच्यावरून जा वर.”

जिग्नेश लगबगीने शिडीवरून माळ्यावर चढला. बाळबोध उत्सुकतेने तो त्या जुन्या-पुराण्या वह्या पाहत राहिला. लहान मूल ते, त्याला त्यातले काय कळणार? थोड्या वेळाने इकडेतिकडे बघून तो खाली यायला निघाला. पण बघतो तर काय… ज्या शिडीवरून तो वर चढला होता, ती शिडी गायब!

“बापू, शिडी कुठे गेली?” त्याने खाली पाहत विचारले.

“बेटा, मीच ती बाजूला काढून ठेवली” परसोत्तमभाई शांतपणे म्हणाले.

“का बापू?”

“अशीच… मजा म्हणून!”

“हे काय बापू? आता शिडीच नाही तर मी खाली कसा येऊ?” जिग्नेश घाबरला.

“त्यात काय एवढे? तिथूनच खाली उडी मार.”

“बापरे! किती उंच आहे हे! मी उडी मारली तर मला लागेल ना?”

“कसे लागेल? मी खाली उभा आहे ना? बिनधास्त उडी मार, मी तुला झेलतो. तुला काहीही होणार नाही!”

बापाच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून जिग्नेशने माळ्यावरून खाली उडी मारली. पण… परसोत्तमभाईंनी त्याला झेललेच नाही! ऐनवेळी ते चार पावले मागे सरकले. जिग्नेश जोरात जमिनीवर आदळला, त्याचा पाय मुरगळला आणि वेदनेने तो रडू लागला.

वेदनेच्या भरात कळवळत तो ओरडला,

“बापू, तुम्ही हे काय केलेत? आधी शिडी काढून घेतली, नंतर उडी मार झेलतो म्हणालात आणि ऐन वेळी बाजूला झालात?”

परसोत्तमभाई त्याच्या जवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाले,

“मी हे मुद्दाम केले बेटा.”

“पण का बापू?” रडवेल्या स्वरात जिग्नेशने विचारले.

“कारण आज तुला आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा शिकवायचा होता.”

“कोणता धडा?”

परसोत्तमभाईंचा आवाज गंभीर झाला,

“बेटा, पहिली गोष्ट ही लक्षात ठेव — जीवनात किंवा व्यवसायात कुठेही प्रवेश करताना, आपला परतीचा मार्ग आधीच हेरून ठेवायचा असतो. तो मार्ग कायम सुरक्षित आणि आपल्या स्वतःच्या नियंत्रणात राहील याची दक्षता घ्यायची असते. तू ज्या शिडीने वर चढलास, तो तुझा परतीचा मार्ग होता. पण वर गेल्यावर वह्या बघण्याच्या नादात तू त्या मार्गाकडे लक्षच दिले नाहीस. तू डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवलास. मी शिडी काढून घेईन असा संशयही तुझ्या मनात आला नाही. परिणामी, तुझा परतीचा मार्ग नष्ट झाला आणि तू संकटात अडकलास.”

“बेटा, लक्षात ठेव… धंद्यात विश्वास ठेवावा, पण नियंत्रण कधीही दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही, कारण बाजारात आपली शिडी कोण कधी काढून घेईल, हे सांगता येत नाही.”

थोडं थांबून ते पुढे म्हणाले,

“दुसरी चूक म्हणजे, ‘आपला बाप आपल्याला खाली झेलेलच’ या अंधविश्वासावर तू थेट उडी मारलीस. पण मी तुला झेलले नाही आणि तुला मार बसला.”

जिग्नेशच्या डोक्यावरून हात फिरवत परसोत्तमभाई शेवटी म्हणाले,

———————

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *