इसापनीती आणि शेअर बाजार – १

इसापनीती आणि शेअर बाजार

शेअर बाजार शिकण्यासाठी आपण चार्ट पाहतो…Candlestick patterns पाहतो…Moving Averages, RSI, Fibonacci, Support, Resistance पाहतो,

पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो—

शेअर बाजाराचा सर्वात मोठा Indicator चार्ट वर नसतो… तो आपल्या डोक्यात असतो!

तो म्हणजे— मानवी स्वभाव.

जग बदलले…

बाजार बदलले…

तंत्रज्ञान बदलले…

पण…

माणूस बदलला नाही. माणसाचा स्वभाव बदलला नाही…

दोन हजार वर्षांपूर्वी इसापने माणसाच्या स्वभावावर कथा लिहिल्या होत्या

लोभ…

भीती…

अहंकार…

अधीरता…

आणि मूर्खपणा…

आजही तेच सगळे आहे.

आणि म्हणूनच कदाचित दोन हजार वर्षांपूर्वी इसापने सांगितलेल्या गोष्टी आजही शेअर बाजारात तितक्याच लागू पडतात.

फरक एवढाच— फक्त जंगल बदलले आहे.

तेव्हा कोल्हा कावळ्याला फसवत होता…

आज जरी मार्केट तुम्हाला फसवत नसले तरी तुमचे स्वतःचे मन तुम्हाला फसवत असते.

पूर्वी जंगलात कोल्हा, कावळा, ससा आणि कासव होते…

आज त्याच जंगलात बुल्स आहेत, बेअर्स आहेत, शार्क आहेत आणि व्हेल्स पण आहेत.

पूर्वी नव्हते असे नवे प्राणी आहेत…

ट्रेडर्स, बिग इनव्हेस्टर्स, फायनानसियला इन्स्टिट्यूट्स, बँकस आणि यु ट्यूबर्स , इन्स्टाग्रामर्स, टेलिग्राम कॉल प्रोवायडर्स नामक वायरस देखील आलेत.

चला तर मग पाहूया— इसापनीती आणि शेअर बाजार

इसापच्या काही कथा आणि त्यातून मिळणारे ट्रेडिंग चे धडे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *