माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
4 फेब्रुवारी 2013, संध्याकाळचे पाच वाजत आले होते , मी मुकेसभाईंची अपॉईंटमेंट आवरण्याच्या प्रयत्नात होतो पण त्याचे आपले संपतच नव्हते – “ते मागच्या टैमाला तू आमच्या गंगापूर रोड चा जागेचा बोलला ना ते 100% बराबर आला, साला आपुन काय काय नाय…
…………. संज्या म्हणत होता म्हणजे त्याला कुठून तरी कळले म्हणे…ती त्या धटींगणा बरोबर पंजाबात भटींड्याला असते.. छातीत कळ उठली … संज्या दात काढत म्हणतो कसा.. धटींगण आणि भटिंडा कसे रिदमीक वाटतेयं … संज्याचा राग नाही आला तेव्हा … तिची बातमी तर…
हा किस्सा माझा मित्र प्रकाश याने खूप वर्षापूर्वी सांगितला होता, तो आठवला की आजही धमाल हसायला येते. त्याचे झाले असे… प्रकाश त्यावेळी ‘फिलिप्स’ च्या इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स च्या वॉरंटी सर्व्हिस विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होता होता. एकदा ‘मंदार’, हा प्रकाशच्या हाताखाली…
‘प्रॉक्झी’ प्रश्न : ज्योतिषाला कोणीही कोणाच्याही वतीने प्रश्न विचारू शकतो, ‘हरवलेल्या व्यक्ती’ संदर्भातला प्रश्न मात्र कायमच दुसर्याच व्यक्तीला विचारावा लागतो, कारण हरवलेली व्यक्ती स्वत:च ‘मी सापडेन काय’ असा प्रश्न कसा विचारू शकेल ? हा एक अपवाद वगळता बाकी सर्व प्रश्न कोणीही…
मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना…
जातक: “महाराज, जरा पत्रिका बघून सांगता का, फार त्रास बघा डोकया ला.” ज्योतिषी: तुझे नाव महादू, बरोबर ? जातक: होय. ज्योतिषी: बायकोचे नाव शेवंता, वय ३२. जातक: अगदि बरोब्बर! ज्योतिषी: दोन मुले , चंदू वय ७ , रमेश वय ५ जातक:…
सुहास जी मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो, खूप छान लिहिता आपण , माहिती आणि मनोरंजन एका साथ . असेच लिहित रहा. आपण ब्लॉगवर मराठीसाठी कोणते फोन्ट (Font) वापरता ? मलाही मराठीतून लिहायचे आहे.
श्री. राकेशजी,
आपण माझ्या ब्लॉग वर लिहलेली प्रतिक्रिया वाचून समाधान वाटले.
आपल्यासारख्या चाहत्यांच्या प्रतिसादावर तर हा ब्लॉग टिकून आहे. असेच कळवत राहा,
कॉम्प्युटर वर मराठी आता फार सोपे झाले आहे. आपण मायक्रसॉफ्ट च्या वेबसाईट वरुन Marathi Indic 3 ही लहानशी युटीलीटी डाऊड्लोड करुन ईस्टॉल करा bhshaindia.com , मग आपण कुठेही म्हणजे सर्व मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स , सर्व वेबसाईट्स, फेसबुक कुठेही डायरेक्ट मराठीत मजकूर लिहू शकता व सर्वांना तो वाचता येतो कारण हे सर्व आता युनिकोड मध्ये आहे . आपल्या संगणकावर मंगल नावाचा मराठी फॉन्ट् आधीपासूनच असेल, मी एरियल युनिकोड एम एस हा फॉन्ट वापरतो, अपराजिता नावाचा एक सुंदर मराठी फॉन्ट आहे.
आपण प्रयत्न करुन बघा काही अडचण आल्यास संपर्क साधा.
कळावे लोभ असावा ही विनंती.
आपला ,
सुहास गोखले